Homeदेश-विदेशशिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाजपला कॅन्सरचे निदान करणारे भावनिक पत्र...

शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाजपला कॅन्सरचे निदान करणारे भावनिक पत्र Marathi News


शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील “माझा आजार कॅन्सरकडे गेला, तरीही भाजपसाठी मृत्यूशी झुंज दिली, आता नगरपालिकेसाठी एकटे का सोडलात?”, असा भावनिक गौप्यस्फोट शहाजी बापू पाटील यांनी केलाय. सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाजपवर मोठा भावनिक आरोप केलाय. ते गंभीर आजारातून बरे होत असताना भाजप नेत्यांनी आपल्याला एकटे पाडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यात वितुष्ट आल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शहाजी बापू पाटील यांचे विधान महत्वाचे मानले जाते.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

‘मृत्यूच्या दारातही भाजपसाठी प्रचार’

2024 च्या लोकसभा निवडणुकीत मी गंभीर आजारपण सोडून भाजप उमेदवाराच्या प्रचारात उतरलो. डॉक्टरांनी तात्काळ ऑपरेशनचा सल्ला दिला होता, पण भाजपच्या उमेदवाराला म्हणजेच मोहिते-पाटील घराण्याला विजय मिळवून देण्यासाठी तीन महिने उपचार पुढे ढकलले. प्रचार करून त्यांनी तब्बल 15 हजार मतांचे लीड मिळवून दिल्याचेही त्यांनी सांगितले.

‘उपचार घेतले असते तर कॅन्सर टळला असता’

“मी निवडणुकीतून माघार घेऊन वेळेत उपचार घेतले असते, तर आजार कॅन्सरपर्यंत गेला नसता. पण पक्षाच्या विनंतीला मान देऊन मी मृत्यूशी झुंज दिली. आता एका नगरपालिका निवडणुकीसाठी मला एकटे का सोडले?”, असा प्र्

सांगोला नगरपालिकेत भाजपची वेगळी आघाडी

आगामी सांगोला नगरपालिका निवडणुकीत भाजपने शिवसेना (शिंदे गट) सोबत न जाता राष्ट्रवादी (अजित पवार), रिपाइं (रामदास आठवले) आणि इतर छोट्या पक्षांना एकत्र करून स्वतंत्र आघाडी उभी केली आहे. यामुळे शहाजी बापू यांना डावलल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे भावनिक आवाहन

“भाजपचा शब्द कधीच मोडला नाही. मी जीवावर उदार होऊन पक्षासाठी लढलो. आता सांगोल्यात माझ्यावर झालेल्या अन्यायाचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा,” अशी आर्त हाक शहाजी बापूंनी दिली आहे.

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

सांगोला तालुक्यातील जुन्या सहकाऱ्याला डावलल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. ही भावनिक आवाहनाची पोहोच मुख्यमंत्री आणि पक्षश्रेष्ठींपर्यंत होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न : शहाजी बापू पाटील यांनी भाजपवर नेमका काय आरोप केला आहे?

उत्तर : त्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत कॅन्सरसारख्या गंभीर आजारात असतानाही त्यांनी उपचार पुढे ढकलून भाजप उमेदवाराला १५ हजार मतांचे लीड मिळवून दिले. आता सांगोला नगरपालिका निवडणुकीत भाजपने त्यांना एकटे सोडून दुसऱ्या आघाडीला पाठिंबा दिला, म्हणून त्यांना मोठा विश्वासघात झाल्याची भावना आहे.

प्रश्न : शहाजी बापू यांनी उपचार का पुढे ढकलले?

उत्तर : डॉक्टरांनी तात्काळ ऑपरेशनचा सल्ला दिला होता, पण भाजपच्या विनंतीवरून आणि मोहिते-पाटील घराण्याच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी त्यांनी तीन महिने उपचार थांबवले. ते म्हणतात, वेळेत उपचार घेतले असते तर आजार कॅन्सरपर्यंत गेला नसता.

प्रश्न : सांगोला नगरपालिका निवडणुकीत भाजपची भूमिका काय आहे?

उत्तर : भाजपने शिवसेना (शिंदे गट) आणि शहाजी बापूंना बाजूला ठेवून राष्ट्रवादी (अजित पवार गट), रिपाइं (रामदास आठवले) आणि इतर छोट्या पक्षांसोबत स्वतंत्र आघाडी उभी केली आहे. यामुळेच शहाजी बापू यांनी “मला एकटे पाडले” असा भावनिक आरोप केला आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

28 नोव्हेंबरचे टॅरो राशिभविष्य: कुंभ राशीच्या लोकांच्या रखडलेल्या पदोन्नतीला मंजुरी मिळेल, कन्या राशीच्या लोकांसाठी...

0
11 तासांपूर्वीकॉपी लिंकशनिवार, 28 नोव्हेंबर रोजी कुंभ राशीच्या सरकारी कर्मचाऱ्यांना रखडलेल्या बढती आणि थकीत भत्त्यांना मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. मकर राशीच्या ज्या...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना उच्च पद मिळण्याचे योग, तर कन्या राशीच्या लोकांना प्रमोशन...

0
बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना उच्च पद किंवा मोठी प्रशासकीय जबाबदारी मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. सरकारी कंत्राटे आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित...

एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! – श्री. शॉन क्लार्क

0
‘कॉप-३१’ जागतिक हवामान परिषदेत भारतीय शिष्टमंडळातर्फे भारताचा आध्यात्मिक संशोधन दृष्टिकोन सादर ‘पर्यावरण जाणीव चळवळ’ : एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! - श्री. शॉन...

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!