Homeदेश-विदेशकुत्रा चावल्याने झालेल्या मृत्यूच्या कुटुंबीयांना 5 लाखांची नुकसानभरपाई, जखमींना 5000 रुपये

कुत्रा चावल्याने झालेल्या मृत्यूच्या कुटुंबीयांना 5 लाखांची नुकसानभरपाई, जखमींना 5000 रुपये


कुत्रा चावण्याची भरपाई: भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणाऱ्या घटनेत वाढ झालीय. भारतात दरवर्षी साधारण 20-25 लाख लोकांना कुत्र्याचा चावतो. यापैकी 20 हजार ते 25 हजार लोक रेबीजमुळे मृत्यू पावतात. महाराष्ट्रात 2023-24 मध्ये सुमारे 2.5 ते 3 लाख कुत्रा चावण्याच्या घटना नोंदवल्या गेल्या.  पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या शहरांत सर्वाधिक प्रकरणे आहेत.रेबीजमुळे दरवर्षी 150-200 मृत्यू होतात. 5-15 वर्षापर्यंतच्या लहान मुलांना याचा सर्वाधिक धोका असतो. सकाळी-सायंकाळी फिरायला जाणारे ज्येष्ठ नागरिक, रस्त्यावर खेळणारी किंवा काम करणारी मुलांना याचा धोका असतो. कर्नाटक सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय घेतलाय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

कर्नाटक सरकारने भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आता कुत्रा चावल्याने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला थेट 5 लाख रुपये भरपाई मिळणार आहे. जखमी व्यक्तींना 5000 रुपये मदत मिळेल, त्यात 3500 रुपये थेट पीडिताला तर 1500 रुपये उपचारासाठी सुवर्ण आरोग्य ट्रस्टला दिले जातील.

कोणत्या जखमांसाठी भरपाई मिळेल?

त्वचेत खोल छिद्र पडणे, मोठ्या जखमा, शरीरावर काळेनिळे डाग किंवा एकाच वेळी अनेक चावा घेतल्यास ही भरपाई लागू होईल. ही योजना फक्त भटक्या कुत्र्यांच्या चाव्यांसाठी आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

कर्नाटकपाठोपाठ तामिळनाडूत चिंता

2024 मध्ये तामिळनाडूत आतापर्यंत 5.25 लाख कुत्रा चावण्याच्या घटना घडल्या आणि रेबीजमुळे 28 जणांना जीव गमवावा लागला, अशी माहिती काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी दिली.कुत्र्यांवर प्रेम करणे चांगले, पण लोकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन भटक्या कुत्र्यांचे लसीकरण व नसबंदी करणे गरजेचे असल्याचेही ते पुढे म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाचे कठोर आदेश

देशभरात भटक्या कुत्र्यांची समस्या वाढत असताना सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना मोठा दणका दिलाय. शाळा, रुग्णालये, बस स्थानके, रेल्वे स्टेशन, क्रीडांगण यांसारख्या सार्वजनिक ठिकाणांहून सर्व भटक्या कुत्रे तात्काळ हटवावेत, असे आदेशात म्हटले आहे. भटक्या कुत्र्यांचा वावर असलेल्या ठिकाणी कुंपण घालावे आणि पकडलेल्या कुत्र्यांना त्या भागात परत सोडू नये. नसबंदी-लसीकरणानंतर त्यांना श्वानगृहात ठेवावे. आदेश न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांना वैयक्तिक शिक्षा होईल, असा इशारा न्यायालयाने दिला आहे.

भरपाईचा उद्देश काय?

कुत्रा चावण्याच्या घटनांची गंभीरता आणि पीडित कुटुंबांना तात्काळ आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना आणल्याचे कर्नाटक सरकारने म्हटलंय. यामुळे उपचाराचा खर्च भागेल आणि मृताच्या कुटुंबाला दिलासा मिळणार आहे. कर्नाटक सरकारने भरपाई देऊन यासाठी पुढाकार घेतलाय. तर सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांवर कठोर नियंत्रण आणण्याचे आदेश दिले आहेत. आता सर्व राज्यांना ही समस्या गांभीर्याने घेऊन तात्काळ उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न : भारतात आणि महाराष्ट्रात किती लोकांना दरवर्षी कुत्रा चावतो आणि रेबीजमुळे किती मृत्यू होतात?

उत्तर : भारतात दरवर्षी २०-२५ लाख लोकांना कुत्र्याचा चावतो, त्यापैकी २०,००० ते २५,००० लोक रेबीजमुळे मृत्यू पावतात. महाराष्ट्रात २.5 ते ३ लाख चावण्याच्या घटना घडतात आणि रेबीजमुळे १५०-२०० लोकांचा बळी जातो.

प्रश्न : कुत्रा चावला तर लगेच काय करावे? किती लस घ्याव्या लागतात?

उत्तर : सर्वप्रथम जखम १५-२० मिनिटे साबण-पाण्याने चांगली धुवा. ताबडतोब सरकारी दवाखान्यात जा. Anti-Rabies Vaccine चे ४ डोस (दिवस ०, ३, ७ आणि २८ व्या दिवशी) घ्यावे लागतात. कुत्रा खूप आक्रमक असेल तर Anti-Rabies Serum ही इंजेक्शनही लगेच घ्यावे. वेळेत उपचार केल्यास १००% जीव वाचतो.

प्रश्न : भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवण्यासाठी सरकार काय करत आहे?

उत्तर : सर्वोच्च न्यायालयाने शाळा, रुग्णालये, बसस्टँड, रेल्वे स्टेशन येथून भटक्या कुत्रे हटवण्याचे आणि तेथे कुंपण घालण्याचे आदेश दिले आहेत. ABC प्रोग्राम (पकडणे-नसबंदी-लसीकरण-सोडणे) चालू आहे. कर्नाटक सरकारने मृत्यू झाल्यास ५ लाख आणि जखमींना ५,००० रुपये भरपाई देण्याची योजना सुरू केली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!