मोठ्या प्रमाणावर टाळेबंदी: बदलते तंत्रज्ञान आणि एआयचा शिरकाव यामुळे जगभरातील मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. अमेझॉन, फ्लिपकार्ट, टीसीएस अशा मोठ्या कंपन्यांमधील कपातीच्या बातम्या आपण ऐकल्या असतील.यात आता आणखी एका जागतिक संघटनेचीभर पडली आहे. कोणती आहे ही कंपनी? किती कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर येणार गदा? सविस्तर जाणून घेऊया.
जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHOने पुढील वर्षाच्या अर्ध्यापर्यंत त्यांच्या जागतिक कामगार दलात मोठी कपात करण्याची घोषणा केलीय. रॉयटर्सच्या बातमीनुसार, जून 2026 पर्यंत 2371 पदे निकमी होतील. जानेवारी 2025 मध्ये संघटनेच्या एकूण 9401 कर्मचाऱ्यांपैकी ही कपात जवळपास एक चतुर्थांश आहे. ही कपात केवळ पर्मनंट पदांपुरती मर्यादित नसून तात्पुरते कर्मचारी आणि सल्लागारांनाही कामातून काढून टाकण्यात आले आहे. यामुळे संस्थेची रचना आता पूर्णपणे बदललेली दिसू शकते.
आर्थिक संकटाचं कारण काय?
अमेरिका WHO मधून बाहेर पडली हे या कपातीमागचे मुख्य कारण मानले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने जानेवारी 2025 मध्ये हा निर्णय घेतला, ज्यामुळे संघटनेच्या एकूण निधीतील 18 टक्के हिस्सा गमावला गेला. अमेरिका हा WHO ची सर्वात मोठा आर्थिक मदत करणारी देश होता. या निर्णयामुळे संघटनेचे अनेक प्रकल्पे थांबले आणि व्यवस्थापन पथकातील अर्धे पदेही रिकामी झाली. कागदपत्रांनुसार ही घट 22 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते.
बजेटमध्ये अब्जावधींची तूट
2026-27 च्या अर्थसंकल्पात WHO ला 1.06 अब्ज डॉलर्सची कमतरता भासत आहे, जी एकूण बजेटच्या एक चतुर्थांश इतकी आहे. मे महिन्यात अंदाजित 1.7 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत ही रक्कम कमी असली तरी आव्हानात्मक आहे. मात्र, वाटाघाटींमधून 1.1 अब्ज डॉलर्सचा अतिरिक्त निधी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे संघटनेला त्यांची संसाधने आणि कार्यक्षेत्र पुन्हा ठरवावे लागत आहे. प्रवक्त्याने सांगितले की, रिकामी पदांमुळे कर्मचारी संख्या आणखी घटेल.
प्रमुखांचा कर्मचाऱ्यांना भावनिक संदेश
WHO चे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रातून भावनिक संदेश दिलाय. हे वर्ष संघटनेच्या इतिहासातील सर्वांत कठोर असल्याचे ते पत्रात म्हणाले. सांगितले. ही कपात म्हणजे वेदनादायक पण अपरिहार्य पाऊल असल्याचे ते म्हणाले. आम्ही आपल्या कामाची आणि संसाधनांची पुनर्रचना करत आहोत, असे कपातीमागचे कारण त्यांनी दिले. ही प्रक्रिया संपल्यावर WHO नव्या रूपात मजबूत होईल आणि जागतिक आरोग्याच्या लढ्यात सक्रिय भूमिका बजावेल, असे ते म्हणाले.
संघटनेचं भविष्य काय?
या कपातीमुळे WHO च्या जागतिक आरोग्य मिशनवर परिणाम होणार आहे. पण संघटना नव्या निधीसाठी प्रयत्नशील आहे. हा बदल कायमस्वरूपी असून, तात्पुरती पदेही कमी होत आहेत. तरीही वाटाघाटींमधील अतिरिक्त निधीमुळे तूट भरून निघू शकते असे डब्ल्यूएचओने सदस्य देशांना दिलेल्या सादरीकरणात म्हटलंय. या कपातीमुळे जागतिक आरोग्य क्षेत्रात मोठे बदल घडणार आहेत. ज्यामुळे इतर देशांना अधिक जबाबदारी घ्यावी लागणार आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
१. WHO मध्ये एवढी मोठी कर्मचारी कपात का होत आहे?
उत्तर: अमेरिकेने जानेवारी २०२५ मध्ये WHO मधून माघार घेतली. अमेरिका हा संघटनेच्या एकूण बजेटचा सुमारे १८ टक्के निधी देणारा सर्वात मोठा देश होता. त्यामुळे २०२६-२७ च्या बजेटमध्ये १.०६ अब्ज डॉलर्सची मोठी तूट निर्माण झाली. ही तूट भरून काढण्यासाठी आणि संघटनेचे काम नव्याने आकार देण्यासाठी जून २०२६ पर्यंत २,३७१ म्हणजे जवळपास २५ टक्के कायमस्वरूपी पदे बंद करण्यात येत आहेत.
२. WHO मधून किती कर्मचारी बाहेर पडतील आणि ही कपात केव्हा पूर्ण होईल?
उत्तर: जानेवारी २०२५ मध्ये WHO कडे एकूण ९,४०१ कर्मचारी होते. जून २०२६ पर्यंत २,३७१ कायमस्वरूपी पदे बंद होतील, म्हणजे सुमारे २२-२५ टक्के कपात होईल. याशिवाय अनेक तात्पुरते कर्मचारी आणि सल्लागारांनाही आधीच कामावरून काढण्यात आले आहे.
३. WHO चे प्रमुख टेड्रोस यांनी कर्मचाऱ्यांना काय संदेश दिला?
उत्तर: टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “हे वर्ष WHO च्या इतिहासातील सर्वात कठीण वर्षांपैकी एक आहे. ही कपात खूप वेदनादायक आहे, पण ती अपरिहार्य आहे. आम्ही आमचे काम आणि संसाधने पुन्हा आकार देत आहोत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर WHO नव्या स्वरूपात अधिक मजबूत होऊन पुढे जाईल.”





















