आजचा सोन्याचा दर: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घट होताना दिसत आहे. मात्र आज सोन्याच्या दरात मोठे उलटफेर होताना दिसत आहेत. आज सोन्याचे दर पुन्हा एकदा महागले आहेत. काय आहेत आजचे दर जाणून घेऊयात.
दिवाळीपासून सोन्याच्या दरात सातत्याने घट होताना दिसतेय. ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोन्याच्या दरात घट होत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आज सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटनांमुळंही सोन्याच्या दरांवर परिणाम होत आहे. अमेरिकेच्या बाजारपेठेत सर्वाधीक चर्चा होतेय ते फेडरल रिझर्व्हची शेवटची पॉलिसी मिटिंगबाबत चर्चा होताना दिसतेय. गुंतवणुकदारांना आशा आहे की, येत्या काही दिवसांत व्याज दरातील कपातीबाबत संकेत मिळू शकतात.
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,200 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1,24,860 रुपयांवर स्थिरावले आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,100 रुपयांनी सोनं महागलं आहे त्यामुळं प्रतितोळा सोनं 1,14,450 रुपयांवर पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 900 रुपयांची वाढ झाली असून 93,640 रुपये प्रतितोळावर स्थिरावली आहे.
आजचा सोन्याचा भाव काय?
– 10 ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,14,450 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,24,860 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 93,640 रुपये
– 1 ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 11,445 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 12,486 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 9,364 रुपये
– 8 ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 91,560 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 99,888 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 74,912 रुपये
– मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर? (Today Gold Rate in Mumbai Pune)
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,14,450 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,24,860 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 93,640 रुपये





















