Homeमहाराष्ट्रPune Bhor Nagar Panchayat Municipal Council Election Eknath Shinde Candidate Enters Ajit...

Pune Bhor Nagar Panchayat Municipal Council Election Eknath Shinde Candidate Enters Ajit Pawar NCP


नगर पंचायत नगरपरिषद निवडणूक: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी केलेले अर्ज मागे घेण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. स्थानिक निवडणुकींच्या आधी सुरु असलेल्या पक्षांतरावरुन सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य रंगल्यानंतर आता महाराष्ट्रात एका ठिकाणी सत्तेत असलेले शिंदेंची शिवसेना अजित पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात आमने-सामने आली आहे. विशेष म्हणजे शिंदेंच्या सेनेनं स्थानिक नगरपालिका निवडणुकीसाठी दिलेला उमेदवारच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पळवला आहे. त्यामुळे या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे. नक्की हे प्रकरण घडलंय कुठे आणि झालंय काय पाहूयात…

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

नेमकं घडलं काय?

पुण्यातील भोर नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीतील संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नितीन सोनवले यांनी अचानक अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सोनवले यांनी अजित पवारांच्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने हा निर्णय शिंदे गटाला मोठा धक्का मानला जातोय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी जाहीर झालेली असतानाही सोनवलेंनी पक्ष बदलल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

लढत थेट भाजपा विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी

आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रवेशानंतर सोनवले शिवसेनेकडून दाखल केलेला अर्ज मागे घेणार असून राष्ट्रवादीसाठी सक्रिय भूमिका बजावणार आहेत. भोरमध्ये भाजपचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रवेशानंतर भाजपचे वजन वाढले आहे, तर राष्ट्रवादीनेही आपले स्थान सातत्याने टिकवून ठेवले आहे. या घडामोडीनंतर शिवसेनेची समीकरणे ढवळून निघत असून लढत आता जवळजवळ भाजपाविरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट असणार आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांत सुरू असलेली उमेदवार खेचाखेच, फोडाफोड आणि अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र होत आहेत या संघर्षाचा पुढील राजकीय परिणाम काय होईल याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

नक्की वाचा >> …तर राज्यातील सर्व निवडणुका रद्द होणार? दिल्लीतून येणार सगळ्याचं पक्षांचं टेन्शन वाढवणारी बातमी?

भाजपा विरुद्ध शिंदेंची शिवसेना

भाजपाने ठाणे-डोंबिवली भागात शिंदे सेनेच्या प्रभावी स्थानिक नेत्यांना पक्षात घेतले. विशेषतः डोंबिवलीतील माजी नगरसेवक राजू शिंदे यांचा भाजपात प्रवेश झाल्याने शिंदे गट संतापला. शिंदे गटाला वाटते की, भाजपा त्यांच्या बालेकिल्ल्यात (ठाणे-कल्याण-डोंबिवली) जाणीवपूर्वक शिंदे सेनेचे कार्यकर्ते-नेते फोडत आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला शिंदे गटातील अनेक मंत्री (उदय सामंत, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर आदी) हजर राहिले नाहीत. हा थेट बहिष्कार मानला जात आहे. काही मंत्री थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि नाराजी बोलून दाखवली.

नक्की पाहा हा व्हिडिओ >> ‘अजित पवार सगळ्यांचा…’, गुलाल उधळत BJP आमदारपुत्राचं थेट उपमुख्यमंत्र्यांना चॅलेंज! Video नं खळबळ

शिंदे, फडणवीस काय म्हणाले?

या नाराजी नाट्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी, “हा बहिष्कार नाही, मंत्री माझ्यासोबत होते किंवा प्रचारात व्यस्त होते,” असं सांगितलं. मात्र त्याचवेळी त्यांनी फडणवीसांशी चर्चा केली आणि दोन्ही पक्षांनी एकमेकांचे नेते-कार्यकर्ते फोडणार नाही असा तोंडी करार केल्याची माहिती समोर आली. या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, “आधी शिवसेनेने आमचे अनेक नेते घेतले होते, आता आम्ही घेतोय तर तक्रार कशाला?” असा सवाल केला. मात्रा त्यानंतर फडणवीसांनी प्रकरण मिटवले आणि ‘कुबड्या (बाहेरचा आधार) नको’ असा संदेश दिला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!