Homeमनोरंजनयुवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांचे त्यांच्या आयुष्याबद्दल धक्कादायक विधान, मी मरायला...

युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांचे त्यांच्या आयुष्याबद्दल धक्कादायक विधान, मी मरायला तयार आहे


योगराज सिंह हे धक्कादायक विधान: भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग हे विविध कारणांमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असतात. योगराज सिंग हे स्वतः माजी क्रिकेटर आहेत आणि सध्या कोच म्हणून सुद्धा काम करतात. मात्र त्यांनी एका मुलाखतीत स्वतःच्या आयुष्याबाबत काही खुलासे करून त्याविषयी दुःख व्यक्त केलं आहे. द विंटेज स्टूडियो सोबत बोलताना योगराज सिंग यांनी मी मरणासाठी तयार आहे आणि देवाने मला लवकर त्याच्याकडे असं म्हणत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला. त्यांनी म्हंटले की हे दुःख मी अनेकवर्ष मनात ठेवलं. संभाषणादरम्यान, त्यांनी सांगितलं की ते अन्नासाठी अनोळखी लोकांवर अवलंबून राहून कंटाळले आहेत आणि आता ते मरण्यास तयार आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

युवराज आणि त्याची आई मला सोडून गेले… :

योगराज सिंग यांनी मुलाखतीत बोलताना सांगितलं की, ‘जीवनाच्या एका वळणावर जेव्हा युवराज आणि त्याची आई शबनम हे मला सोडून गेले तेव्हा मला खूप धक्का बसला. ही घटना अतिशय भयानक होती. योगराज सिंग पुढे म्हणाले की ज्या स्त्रीसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आणि तारुण्य समर्पित केले होते ती स्त्री त्यांना सोडून जाऊ शकते यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. तेव्हा बरंच काही उध्वस्त झालं’.

जेवणासाठी दुसऱ्यांच्या जीवावर राहावं लागतंय :

माजी क्रिकेटर योगराज सिंग यांनी म्हंटले की, आता त्यांना जेवणासाठी अनोळखी व्यक्तींवर अवलंबून राहावं लागतंय. कधी एकावर तर कधी दुसऱ्यांवर. पण त्यांनी कधीच कोणाला त्रास दिला नाही. पुढे योगराज सिंग म्हणाले की त्यांचं जीवन आता पूर्ण झालंय आणि ते आता मरण्यासाठी तयार आहेत. देवाला जेव्हा वाटते तेव्हा ते त्यांना त्यांच्यासोबत घेऊन जाऊ शकतो’.

योगराज सिंग यांची कारकीर्द :

योगराज सिंग हे भारताचे माजी क्रिकेटपटू आहेत. त्यांनी 1 कसोटी सामना व 6 एकदिवसीय सामने (ODI) भारतासाठी खेळले. पहिल्या श्रेणी क्रिकेटमध्ये (Domestic cricket) त्यांची कारकीर्द अधिक प्रभावी होती. हरियाणा संघाकडून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. दुखापतीमुळे त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द लवकर संपुष्टात आली. क्रिकेटनंतर योगराज सिंह यांनी मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांनी 100 पेक्षा जास्त पंजाबी चित्रपटांत काम केलं आहे. क्रिकेटमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी क्रिकेट प्रशिक्षक म्हणून काम सुरू केले. ते स्थानिक पातळीवर तरुण क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देतात.

योगराज सिंग यांचा पहिला विवाह शबनम कौर यांच्याशी झाला. शबनम कौर पासून त्यांना युवराज सिंग आणि झोरावर सिंग अशी दोन मुलं आहेत. युवराज सिंग हा भारताचा दिग्गज क्रिकेटर आहे. योगराज सिंग यांनी  शबनम कौर यांना घटस्फोट देत दुसरा विवाह सतवीर कौर यांच्यासोबत केला.  दुसऱ्या पत्नीकडून त्यांना अमरजोत कौर आणि विकटोर सिंग अशी दोन मुलं आहेत.

हेही वाचा : मानेला पट्टा, हाताला सलाईन; कॅप्टन शुभमनला डिस्चार्ज, पण Viral Video पाहून चाहते चिंतेत

वारंवार विचारले जाणारे प्रश्न:

योगराज सिंह अलीकडे का चर्चेत आहेत?
योगराज सिंह यांनी एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत भावनिक विधानं केली आणि ते मरणासाठी तयार असल्याचं सांगितल्यामुळे ते चर्चेत आले.

योगराज सिंह यांनी मरणासाठी तयार असल्याचं का म्हटलं?
त्यांनी सांगितलं की आता ते अन्नासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत असल्याने आणि जीवनात खूप दुःख अनुभवल्याने ते मानसिकरित्या थकले आहेत.

युवराज सिंह आणि त्यांच्या आईबाबत योगराज सिंह यांनी काय म्हटलं?
त्यांनी सांगितलं की जीवनाच्या एका टप्प्यावर युवराज आणि त्याची आई शबनम यांनी त्यांना सोडून गेलं, आणि ती घटना त्यांच्यासाठी भयानक होती.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

28 नोव्हेंबरचे टॅरो राशिभविष्य: कुंभ राशीच्या लोकांच्या रखडलेल्या पदोन्नतीला मंजुरी मिळेल, कन्या राशीच्या लोकांसाठी...

0
11 तासांपूर्वीकॉपी लिंकशनिवार, 28 नोव्हेंबर रोजी कुंभ राशीच्या सरकारी कर्मचाऱ्यांना रखडलेल्या बढती आणि थकीत भत्त्यांना मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. मकर राशीच्या ज्या...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना उच्च पद मिळण्याचे योग, तर कन्या राशीच्या लोकांना प्रमोशन...

0
बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना उच्च पद किंवा मोठी प्रशासकीय जबाबदारी मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. सरकारी कंत्राटे आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित...

एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! – श्री. शॉन क्लार्क

0
‘कॉप-३१’ जागतिक हवामान परिषदेत भारतीय शिष्टमंडळातर्फे भारताचा आध्यात्मिक संशोधन दृष्टिकोन सादर ‘पर्यावरण जाणीव चळवळ’ : एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! - श्री. शॉन...

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!