Homeमनोरंजनदोन वर्षांपूर्वी हार्ट अटॅक आलेल्या सुश्मिता सेनची अँजिओप्लास्टी पूर्ण शुद्धीत करण्यात आली

दोन वर्षांपूर्वी हार्ट अटॅक आलेल्या सुश्मिता सेनची अँजिओप्लास्टी पूर्ण शुद्धीत करण्यात आली


अभिनेत्री सुश्मिता सेन हिचा देश-विदेशात आजही मोठा चाहतावर्ग आहे. ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकल्यापासून ते आजपर्यंत सुश्मिताने आपल्या सौंदर्याने, फिटनेसने आणि व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली आहे. ४९ वर्षांची असली तरी तिच्या फिटनेसकडे पाहून अनेक तरुण अभिनेत्रीही आश्चर्यचकित होतात. मात्र, एवढ्या फिटनेसनंतरही, 2023 मध्ये तिला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने सर्वांना धक्का बसला. स्वतः सुश्मितालादेखील या घटनेवर विश्वास ठेवणे अवघड झाले होते.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

हार्ट अटॅक आल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तत्काळ अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. बहुतेक रुग्ण या प्रक्रियेत बेशुद्ध केले जातात; मात्र सुश्मिताने पूर्ण शुद्धीत राहून अँजिओप्लास्टी करून घेतली. नुकत्याच दिलेल्या दिव्या जैन यांच्या मुलाखतीत सुश्मिताने या धक्कादायक अनुभवाबद्दल सविस्तर माहिती दिली. ती म्हणाली ‘अँजिओप्लास्टी करताना मी बेशुद्ध व्हायचं नाही असं ठाम सांगितलं होतं. माझ्यातला कंट्रोल फ्रीक स्वभाव मला बेशुद्ध राहू देत नाही. डॉक्टरांशी बोललात तर ते सांगतील की त्या क्षणी माझ्याकडे किती धैर्य होतं.’

ती पुढे म्हणाली ‘हृदयविकाराचा झटका येणं आणि त्यातून वाचणं… हा निवडीचा प्रश्न होता. मी बेशुद्ध पडून झोपायचं की शुद्धीत राहून परिस्थितीचा सामना करायचा. मी शुद्धीत राहण्याचा निर्णय घेतला. कारण बेशुद्ध राहून जागीच न होण्याची भीती मला जास्त वाटत होती.’

सुश्मिता सांगते की संपूर्ण अँजिओप्लास्टी प्रक्रियेदरम्यान ती डॉक्टरांशी बोलत होती ‘मला काय चाललंय ते स्वतः पाहायचं होतं. वेदना खूप होत्या, पण मला त्याची तयारी होती. मी डॉक्टरांना सतत म्हणत होते की ‘लवकर करा, मला सेटवर जायचं आहे.’ माझी टीम जयपूरमध्ये माझी वाट पाहत होती.’ अभिनेत्रीने शूटिंगशी असलेल्या तिच्या जबाबदारीबद्दलही भाष्य केले. ‘आपण एखाद्या शोची मुख्य व्यक्तिरेखा असतो तेव्हा 500 लोकांची रोजीरोटी आपल्यावर अवलंबून असते. ते सर्व माझ्यासाठी काळजी करत होते, पण मलाही त्यांच्या कामाची चिंता होती. शूट थांबलेलं असणं हीसुद्धा मोठी जबाबदारी आहे.’

या सर्व प्रसंगानंतरही सुश्मिताने पुन्हा काम सुरू करण्याचा निर्धार दाखवला. ‘डॉक्टर माझ्यावर रागावत होते, कारण मी सतत बोलत होते आणि घाई करत होते. त्या धक्क्यातून सावरायला मला 15 दिवस लागले. शेवटी मी ‘आर्या’ सीरिजचं शूट पूर्ण करू शकले.’ फिटनेस, मानसिक ताकद आणि कामाबद्दलची तिची निष्ठा यामुळे सुश्मिताचे चाहते पुन्हा एकदा तिच्या धैर्यावर मोहित झाले आहेत. सुश्मिताची ही कहाणी आज हजारो महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न
सुश्मिता सेनला हार्ट अटॅक कधी आला होता?
2023 साली सुश्मिताला हृदयविकाराचा झटका आला होता.

अँजिओप्लास्टीदरम्यान सुश्मिता शुद्धीत का होती?
तिने डॉक्टरांना बेशुद्ध न करण्यास सांगितलं होतं. तिला परिस्थितीवर नियंत्रण ठेवायचं होतं आणि काय चाललंय ते स्वतः पाहण्याची इच्छा होती.

हार्ट अटॅकनंतर सुश्मिताने कामावर परत कधी केली?
सुमारे 15 दिवसांनी तिची प्रकृती सुधारल्यानंतर तिने ‘आर्या’ सीरिजचं शूट पुन्हा सुरू केलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

28 नोव्हेंबरचे टॅरो राशिभविष्य: कुंभ राशीच्या लोकांच्या रखडलेल्या पदोन्नतीला मंजुरी मिळेल, कन्या राशीच्या लोकांसाठी...

0
11 तासांपूर्वीकॉपी लिंकशनिवार, 28 नोव्हेंबर रोजी कुंभ राशीच्या सरकारी कर्मचाऱ्यांना रखडलेल्या बढती आणि थकीत भत्त्यांना मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. मकर राशीच्या ज्या...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना उच्च पद मिळण्याचे योग, तर कन्या राशीच्या लोकांना प्रमोशन...

0
बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना उच्च पद किंवा मोठी प्रशासकीय जबाबदारी मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. सरकारी कंत्राटे आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित...

एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! – श्री. शॉन क्लार्क

0
‘कॉप-३१’ जागतिक हवामान परिषदेत भारतीय शिष्टमंडळातर्फे भारताचा आध्यात्मिक संशोधन दृष्टिकोन सादर ‘पर्यावरण जाणीव चळवळ’ : एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! - श्री. शॉन...

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!