Homeमहाराष्ट्रमुंबई ते अलिबाग 10 मिनिटांत रेवस कारंजा ब्रिज मुंबईजवळील आणखी एक सागरी...

मुंबई ते अलिबाग 10 मिनिटांत रेवस कारंजा ब्रिज मुंबईजवळील आणखी एक सागरी मार्ग


मुंबई ते अलिबाग 10 मिनिटात रेवस कारंजा ब्रिज : मुंबईते अलिबाग हा सध्या दोन तासांचा प्रवास आहे. मात्र, हाच  2 तासांचा प्रवास फक्त 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे. मुंबईजवळ आणखी एक सागरी मार्ग  बांधला जाणार आहे.  मुंबई-एमएमआर प्रदेशात वाहतूक सुलभ करण्यासाठी अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू आहेत. मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा देशातील सर्वात लांब मुंबई ट्रान्सहार्बर सी लिंक ब्रिज उघडल्यानंतर, रायगड जिल्ह्यात किनारी संपर्क वाढवण्याचे काम आता सुरू आहे. धरमतरजवळील खाडीवर रेवस-करंजा पुलाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे, ज्यामुळे मुंबई ते अलिबाग प्रवास सोपा होणार आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

2.04 किमी लांबीचा हा पुल असेल. सुरुवातीला एमएसआरडीसीने 2,079  कोटी रुपयांचा हा प्रकल्प सादर केला होता.   परंतु कालांतराने त्याची किंमत 42.56 टक्क्यांनी वाढली आहे. पुढील तीन वर्षांत पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.  20.04 किमी लांबीच्या या पुलामुळे अंतर 50 किमीने कमी होईल. रायगड जिल्ह्यातील किनारी शहर असलेल्या अलिबागला जाण्यासाठी मुंबईहून नवी मुंबई, पनवेल आणि पेण मार्गे अंदाजे 120 किमी रस्त्याने प्रवास करावा लागतो. रेवस आणि कारंजा दरम्यान 2.04 किमी लांबीच्या समुद्री पुलाच्या बांधकामामुळे, मुंबईहून एमटीएचएल आणि नवाशेवा मार्गे अलिबागचे अंतर जवळजवळ निम्म्याने कमी होणार आहे.

सध्या, रेवस आणि कारंजा दरम्यान सुमारे 70 किमी अंतर पार करण्यासाठी सुमारे दोन तास लागतात. या समुद्री पुलाच्या बांधकामामुळे, रेवसहून करंजा येथे फक्त 10 मिनिटांत पोहोचता येते. सध्या रेवस आणि कारंजा दरम्यान फेरी सेवा चालतात, परंतु त्यामध्ये चारचाकी वाहने बसत नाहीत. पावसाळ्यात, खराब हवामानामुळे फेरी सेवा विस्कळीत होतात.
अलिबाग ते जेएनपीटी दरम्यानचे अंतर 25 किमीने कमी होणार आहे. एकदा समुद्री पूल रेवस आणि कारंजा यांना जोडला की, अलिबागहून जेएनपीटीला सहज पोहोचता येईल. या पुलामुळे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि अलिबागमधील रस्ते अंतर अंदाजे 55 किमीवरून फक्त 30 किमीपर्यंत कमी होईल. याव्यतिरिक्त, नियमित वाहनचालकांना मुंबई आणि अलिबागमधील जड वाहतुकीपासून मुक्तता मिळेल. सध्या, मुंबईहून अलिबागला थेट प्रवास करण्यासाठी रो-रो सेवा उपलब्ध आहेत, परंतु त्या खूप महाग आहेत.

रायगड जिल्ह्यातील राज्य महामार्ग क्रमांक 4 वर हा चार पदरी पूल बांधला जाईल. 29.50 मीटर रुंदीच्या या पुलावर वाहने ताशी 80  किमी वेगाने प्रवास करू शकतील. त्याच्या दोन्ही बाजूला 1.5 मीटर रुंदीचा पादचाऱ्यांसाठीचा पदपथ देखील असेल. कारंजामध्ये 5.13 किलोमीटर लांबीचा अप्रोच रोड बांधला जाईल, तर रेवसमध्ये 1.17 किलोमीटर लांबीचा रस्ता स्टिल्टवर बांधला जाईल.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न 1: रेवस-करंजा समुद्री पुलाचे बांधकाम कधी सुरू होणार आहे?
उत्तर: रेवस-करंजा समुद्री पुलाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे.

प्रश्न 2: हा पुल किती लांबीचा असेल?
उत्तर: हा पुल 2.04 किमी लांबीचा असेल.

प्रश्न 3: या पुलामुळे मुंबई ते अलिबाग प्रवास किती कमी होणार आहे?
उत्तर: या पुलामुळे मुंबई ते अलिबाग प्रवास 2 तासांवरून 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

28 नोव्हेंबरचे टॅरो राशिभविष्य: कुंभ राशीच्या लोकांच्या रखडलेल्या पदोन्नतीला मंजुरी मिळेल, कन्या राशीच्या लोकांसाठी...

0
11 तासांपूर्वीकॉपी लिंकशनिवार, 28 नोव्हेंबर रोजी कुंभ राशीच्या सरकारी कर्मचाऱ्यांना रखडलेल्या बढती आणि थकीत भत्त्यांना मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. मकर राशीच्या ज्या...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना उच्च पद मिळण्याचे योग, तर कन्या राशीच्या लोकांना प्रमोशन...

0
बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना उच्च पद किंवा मोठी प्रशासकीय जबाबदारी मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. सरकारी कंत्राटे आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित...

एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! – श्री. शॉन क्लार्क

0
‘कॉप-३१’ जागतिक हवामान परिषदेत भारतीय शिष्टमंडळातर्फे भारताचा आध्यात्मिक संशोधन दृष्टिकोन सादर ‘पर्यावरण जाणीव चळवळ’ : एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! - श्री. शॉन...

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!