Homeमहाराष्ट्रRadha Shortest Buffalo Guinness Record Ceremony | 'राधा' म्हशीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये...

Radha Shortest Buffalo Guinness Record Ceremony | ‘राधा’ म्हशीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद!: जगातील सर्वात बुटकी म्हैस; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शेतकरी त्रिंबक बोराटे यांचा सन्मान – Solapur News

जगातील सर्वांत बुटकी म्हैस म्हणून मलवडी (ता. माण) येथील शेतकरी व पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या ‘राधा’ नावाच्या पाळीव म्हशीची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाल्याबद्दल सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

.

या सोहळ्याच्या निमित्ताने शेतकरी व पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या मलवडी येथील निवासस्थानी भेट देऊन या ठेंगण्या- ‘राधा’ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये मध्ये नोंद झाल्याबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सन्मान केला.

शेतकरी हे निसर्गाच्या आव्हानांवर मात करून, कठोर परिश्रम आणि चिकाटीने पशुधनाच्या मदतीने शेती करतात, ज्यामुळे सर्वांसाठी अन्न उपलब्ध होते, म्हणून ते नेहमीच कौतुकास्पद आहेत. विविध कारणांमुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, तरीही ते आपलं काम चिकाटीने करत राहतात. शेतकरी व पशुपालक त्रिंबक बोराटे यांनी या वेगळ्या अशा राधा या म्हशीचा योग्य प्रकारे सांभाळ करून तिला संपूर्ण जगामध्ये एक वेगळं स्थान मिळवून दिल आहे ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. त्याबद्दल शेतकरी त्रिंबक बोराटे व त्यांचे चिरंजीव अनिकेत बोराटे यांचा देखील या सन्मान सोहळ्यात गौरव करण्यात आला.

त्रिंबक बोराटे यांच्या घरच्याच मुऱ्हा म्हशीच्या पोटी जून २०२२ मध्ये ‘राधा’चा जन्म झाला. ‘राधा’ दोन-अडीच वर्षांची झाल्यावर तिच्या उंचीत बदल होत नसल्याचे बोराटे यांच्या लक्षात आले. त्यानंतर बोराटे यांचा कृषी पदवीधर मुलगा अनिकेत याने ‘राधा’ला कृषी प्रदर्शनात सहभागी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला कोणीच त्याला प्रतिसाद दिला नाही. डिसेंबर २०२४ मध्ये सोलापूर येथील सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात पहिल्यांदा ‘राधा’ने सहभाग घेतला. अन् ‘राधा’चा सर्वत्र बोलबाला सुरू झाला. त्यानंतर पुसेगावचे सेवागिरी, कर्नाटकातील निपाणी यांसह एकूण १३ कृषी प्रदर्शनांत खास आकर्षण म्हणून ‘राधा’ला निमंत्रित करण्यात आले.

२४ जानेवारी २०२५ रोजी राधा” ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली परभणी येथील कृषी प्रदर्शनानंतर अनिकेत बोराटे यांनी राधाच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड साठी प्रयत्न सुरू केले २८ ऑक्टोबर २०२५ रोजी राधाची जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन तात्या काळे, भारतीय जनता पार्टी स्थानिक स्वराज्य संस्था सातारा जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशील दादा कदम, युवानेते सिद्धार्थ गुंडगे, मलवडी गावचे मा.सरपंच दादासाहेब जगदाळे, परकंदी गावचे सरपंच बाळासाहेब कदम, उद्योजक दुर्योधन सस्ते, माजी पंचायत समिती सदस्य कुमार मगर, दशरथशेठ बोराटे, दादा सुरेश जगदाळे यांच्यासह आदी मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

28 नोव्हेंबरचे टॅरो राशिभविष्य: कुंभ राशीच्या लोकांच्या रखडलेल्या पदोन्नतीला मंजुरी मिळेल, कन्या राशीच्या लोकांसाठी...

0
11 तासांपूर्वीकॉपी लिंकशनिवार, 28 नोव्हेंबर रोजी कुंभ राशीच्या सरकारी कर्मचाऱ्यांना रखडलेल्या बढती आणि थकीत भत्त्यांना मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. मकर राशीच्या ज्या...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना उच्च पद मिळण्याचे योग, तर कन्या राशीच्या लोकांना प्रमोशन...

0
बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना उच्च पद किंवा मोठी प्रशासकीय जबाबदारी मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. सरकारी कंत्राटे आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित...

एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! – श्री. शॉन क्लार्क

0
‘कॉप-३१’ जागतिक हवामान परिषदेत भारतीय शिष्टमंडळातर्फे भारताचा आध्यात्मिक संशोधन दृष्टिकोन सादर ‘पर्यावरण जाणीव चळवळ’ : एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! - श्री. शॉन...

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!