Homeमनोरंजनदिवसातून कितीवेळा कॉफी प्यावी? जाणून घ्या नाहीतर...

दिवसातून कितीवेळा कॉफी प्यावी? जाणून घ्या नाहीतर…


दिवसातून कितीवेळा कॉफी प्यावी? जाणून घ्या नाहीतर…

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

दिवसातून किती वेळा कॉफी प्यावी : साधारणपणे सगळेचजण थकवा घालवण्यासाठी किंवा फ्रेश वाटावं यासाठी दिवसातून कितीतरी वेळा कॉफी पित असतात. कॉफी पिण्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. अयोग्य वेळेस आणि जास्त प्रमाणात कॉफी पिल्यास ती आरोग्यास हानिकारक ठरू शकते. आयुर्वेदानुसार कॉफीमुळे शरिरातील पित्त आणि वात वाढण्याची शक्यता असते. उपाशी पोटी कॉफीचे सेवन केल्याने शारिरीक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. शिवाय सगळ्यांच्या शरिरावर  वेगवेगळे परिणाम होतात. त्यामुळे कॉफीचे सेवन कोणी, कधी आणि कितीवेळा करावे हे माहित असणे आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार ज्यांना गॅस, पित्त, उच्च रक्तदाब आणि झोप न येणे अशा समस्या असतील त्यांनी कॉफीचे सेवन कधीच करू नये. याउलट ज्यांना कफ किंवा कामामध्ये लक्ष केंद्रित करण्यास समस्या जाणवत असतील तसेच सतत आळस जाणवत असेल त्यांनी कॉफीचे सेवन करण्यास हरकत नाही.

कॉफी पिण्याचे फायदे :

कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत. काही अभ्यासानुसार कॅफिनयुक्त कॉफी प्यायल्याने नैराश्याचा धोका कमी करण्यास मदत होते. कॅफिन मेंदूला उत्तेजित करते, ज्यामुळे एकाग्रता, सतर्कता आणि स्मरणशक्ती सुधारते. काही संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की, कमी प्रमाणात कॉफी पिल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. शिवाय तोंड, घसा आणि पचनसंस्थेच्या कर्करोगापासून संरक्षण होते. कॉफीमधील कॅफिक अॅसिड नावाचे अँटिऑक्सिडंट त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करते. एवढेच काय तर वजन कमी करण्यासही कॉफी फायदेशीर ठरते.

कॉफी पिण्याचे तोटे :

योग्य प्रमाणात कॉफीचे सेवन केल्यास ती फायदेशीर ठरते. पण जास्त प्रमाणात कॉफी पिल्यास निद्रानाश होऊ शकतो किंवा झोपेच्या इतर समस्या उद्भवू शकतात. कॉफीमध्ये असलेले आम्ल आणि कॅफिन पोटातील आम्लाचे उत्पादन वाढवतात. यामुळे अॅसिडिटी, पोटदुखी, मळमळ आणि पोटात जळजळ होऊ शकते. शरिरात कॅफिनचे प्रमाण वाढल्याने अस्वस्थता आणि चिंता वाढते. हृदयाची गती वाढून रक्तदाबही वाढू शकतो.

कॉफीचे सेवन करताना कोणती काळजी घ्यावी :

1. सकाळी उपाशी पोटी कॉफी पिऊ नये.

2. संपूर्ण दिवसात फक्त एक कप कॉफी प्यावी.

3. कॉफी पिल्यानंतर थोडावेळ चालावे.

4. कॉफीमध्ये कमी साखर घाला आणि चवीनुसार वेलची पूड घाला.

5. कॉफी बनवण्यासाठी रोस्टेड कॉफी पावडरचा वापर करा.

१. दिवसातून किती वेळा कॉफी प्यावी?
उत्तर: संपूर्ण दिवसात फक्त एक कप कॉफी प्यावी. जास्त प्रमाणात पिल्यास निद्रानाश, अॅसिडिटी किंवा चिंता वाढू शकते.

२. कोणी कॉफीचे सेवन करू नये?
उत्तर: आयुर्वेदानुसार ज्यांना गॅस, पित्त, उच्च रक्तदाब किंवा झोप न येणे अशा समस्या असतील त्यांनी कॉफी कधीच पिऊ नये.

३. कॉफी पिण्याचे मुख्य फायदे काय आहेत?
उत्तर: कॉफीमुळे एकाग्रता वाढते, नैराश्याचा धोका कमी होतो, टाइप २ मधुमेहापासून संरक्षण मिळते, त्वचा निरोगी राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

28 नोव्हेंबरचे टॅरो राशिभविष्य: कुंभ राशीच्या लोकांच्या रखडलेल्या पदोन्नतीला मंजुरी मिळेल, कन्या राशीच्या लोकांसाठी...

0
11 तासांपूर्वीकॉपी लिंकशनिवार, 28 नोव्हेंबर रोजी कुंभ राशीच्या सरकारी कर्मचाऱ्यांना रखडलेल्या बढती आणि थकीत भत्त्यांना मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. मकर राशीच्या ज्या...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना उच्च पद मिळण्याचे योग, तर कन्या राशीच्या लोकांना प्रमोशन...

0
बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना उच्च पद किंवा मोठी प्रशासकीय जबाबदारी मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. सरकारी कंत्राटे आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित...

एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! – श्री. शॉन क्लार्क

0
‘कॉप-३१’ जागतिक हवामान परिषदेत भारतीय शिष्टमंडळातर्फे भारताचा आध्यात्मिक संशोधन दृष्टिकोन सादर ‘पर्यावरण जाणीव चळवळ’ : एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! - श्री. शॉन...

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!