Homeमनोरंजनमारुतीच्या 'या' बेस्ट सेलर कारमध्ये तांत्रिक बिघाड; कंपनीने परत बोलवले 39,000 युनिट्स

मारुतीच्या ‘या’ बेस्ट सेलर कारमध्ये तांत्रिक बिघाड; कंपनीने परत बोलवले 39,000 युनिट्स


मारुती सुझुकी ग्रँड विटारा रिकॉल: भारतात सातत्याने नवनवीन एसयुव्ही कार लाँच होत आहेत. बाजारात या एसयूव्ही कारची क्रेझदेखील पाहायला मिळतेय. या दरम्यान देशातील सर्वात मोठी कार कंपनीने त्यांची लोकप्रिय ग्रँड एसयुव्हीचे 39,000हून अधिक युनिट्स रिकॉल केले आहेत. रिकॉल म्हणजे या युनिट्समध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यानंतर कार परत मागवल्या आहेत. कंपनीकडून या कारमधील तांत्रिक दुरुस्ती केल्यानंतर ग्राहकांना परत दिल्या जातील.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL)ने  म्हटलं आहे की, 9 डिसेंबर 2024 ते 29 एप्रिल 2025 दरम्यान लाँच करण्यात आलेल्या ग्रँड विटारा एसयुव्हीमध्ये फ्युल गेज दिसणाऱ्या सिस्टममध्ये काही तांत्रिक बाबी आढळल्या होत्या. कंपनीनुसार, स्पीडोमीटर असेंबलीमध्ये असलेले फ्यूल लेव्हल इंटिकेटर आणि वॉर्निंग लाइट कधीकधी फ्युल लेव्हल किती आहे याचा इंडिकेटर नीट दाखवत नव्हतं. ज्यामुळं वाहन चालकांना टँकमध्ये किती इंधन आहे याबाबत योग्य माहिती मिळत नव्हती. रिकॉलमध्ये ग्रँड विस्ताराचे 39,506 युनिट्सचा समावेश आहे.

मारुती सुझुकीने म्हटलं आहे की, ज्यांना ही तांत्रिक अडचण आली आहे त्या वाहनांच्या मालकांनी कंपनी किंवा त्यांच्या अधिकृत डिलरशी संपर्क करावा. ग्राहकांना त्यांच्या घराजवळ असलेल्या सुझुकी वर्कशॉपमध्ये बोलवण्यात येईल. तिथे टेक्निशियन तपासणी करतील आणि गरज पडल्यास दुरुस्ती करण्यात येईल. दुरुस्तीचा विनाशुल्क असणार आहे. कंपनीने याला प्रिकॉशनेरी स्टेप म्हणत ग्राहकांना वेळीच संपर्क करण्यास सांगितलं आहे. जेणेकरुन ते सुरक्षित ड्रायव्हिंग करु शकतील.

भारतातील ऑटो कंपन्या गेल्या काही वर्षांपासून स्वेच्छिक रिकॉल कोडअंतर्गंत सेफ्टी आणि कॉलिटीबाबत सतर्क झाले आहेत. रिकॉल हा त्याचाच एक भाग आहे.

मारुती सुझुकीने अलीकडेच एसयुव्ही पोर्टफोलिओची गती वाढवली आहे. जेणेकरुन प्रिमीयम आणि हायग्रोथ सेगमेंटमध्ये पकड मजबूत करु शकतील. टोयोटोसोबतमिळून डेव्हलपर ग्रँड विटारा कंपनीची फ्लॅगशिप कॉम्पॅक्ट एसयूव्ही रेंजपैकी एक आहे. यात स्ट्राँग-हायब्रिड पावरट्रेन, ऑन व्हील ड्राइव्ह ऑप्शनसोबतच मॉर्डन फिचर्सदेखील मिळणार आहेत.

किंमत आणि मायलेज

मारुती सुझुकीने अलीकडेच जीएसटी रिफॉर्मनंतर ग्रँड विस्ताराची किंमत 1,07,000 रुपयांपर्यंत कपात केली आहे. आता 10.77 लाख रुपयांपासून सुरू होऊन टॉप मॉडेलसाठी 19.72 लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनीचा दावा आहे की, याच्या पेट्रोल व्हेरियंट 21.11 किमी प्रतिलीटर आणि सीएनजी व्हेरियंट 26.6 किमी प्रतिकिग्रापर्यंत मायलेज देते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न १: मारुती सुझुकी ग्रँड विटारा कारचे युनिट्स का रिकॉल (परत) मागवले जात आहेत?

उत्तर: ग्रँड विटारा एसयूव्हीमध्ये फ्यूल गेज (इंधन पातळी दाखवणारी) प्रणालीमध्ये काही तांत्रिक बिघाड आढळल्यामुळे हे युनिट्स परत मागवण्यात येत आहेत.

प्रश्न २: या तांत्रिक समस्येमुळे नेमका काय परिणाम होत होता?

उत्तर: स्पीडोमीटर असेंबलीमध्ये असलेला फ्यूल लेव्हल इंडिकेटर (इंधन पातळी सूचक) आणि वॉर्निंग लाइट कधीकधी इंधनाची योग्य पातळी दाखवत नव्हता, ज्यामुळे वाहनचालकांना टँकमध्ये किती इंधन आहे याची अचूक माहिती मिळत नव्हती.

प्रश्न ३: रिकॉलमध्ये ग्रँड विटाराचे एकूण किती युनिट्स समाविष्ट आहेत?

उत्तर: रिकॉलमध्ये ग्रँड विटारा एसयूव्हीचे एकूण ३९,५०६ युनिट्सचा समावेश आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

28 नोव्हेंबरचे टॅरो राशिभविष्य: कुंभ राशीच्या लोकांच्या रखडलेल्या पदोन्नतीला मंजुरी मिळेल, कन्या राशीच्या लोकांसाठी...

0
11 तासांपूर्वीकॉपी लिंकशनिवार, 28 नोव्हेंबर रोजी कुंभ राशीच्या सरकारी कर्मचाऱ्यांना रखडलेल्या बढती आणि थकीत भत्त्यांना मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. मकर राशीच्या ज्या...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना उच्च पद मिळण्याचे योग, तर कन्या राशीच्या लोकांना प्रमोशन...

0
बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना उच्च पद किंवा मोठी प्रशासकीय जबाबदारी मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. सरकारी कंत्राटे आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित...

एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! – श्री. शॉन क्लार्क

0
‘कॉप-३१’ जागतिक हवामान परिषदेत भारतीय शिष्टमंडळातर्फे भारताचा आध्यात्मिक संशोधन दृष्टिकोन सादर ‘पर्यावरण जाणीव चळवळ’ : एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! - श्री. शॉन...

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!