बिहार विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य पराभव पत्करल्या. त्यानंतर, रोहिणी आचार्य यांनी शनिवारी अचानक राजकारण सोडण्याचा आणि कुटुंबाशी संबंध तोडण्याचा निर्णय जाहीर केला आणि राजकारणात एकच खळबळ माजली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉम एक्स हँडलवर अत्यंत संवेदनशील आणि सूचक पोस्टमध्ये या निर्णयाची घोषणा केली.”मी राजकारण सोडत आहे आणि माझ्या कुटुंबाशी संबंध तोडत आहे. संजय यादव आणि रमीझ यांनी मला नेमके हेच सांगितलं. मी संपूर्ण जबाबदारी घेत आहे.”
या पोस्टमुळे बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला, विशेषतः रोहिणी यांनी दोन नावांचा उल्लेख केला तो म्हणजे राजदचे राज्यसभा खासदार संजय यादव आणि तेजस्वी यादव यांचे सर्वात विश्वासू सहकारी आणि रमीझ, ज्यांच्याबद्दल आतापर्यंत राजकीय वर्तुळात फार कमी लोकांना माहिती आहे.
पण रोहिणीने तिच्या एक्स-हँडलवरून या पोस्टमध्ये लिहिलं की, ज्यामध्ये रमीझबद्दल काही माहिती शेअर केली गेली होती आणि धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. पोस्टमध्ये असा दावा केला आहे की, रमीझ रोहिणी ज्या व्यक्तीचा उल्लेख करत आहेत तो एक सामान्य व्यक्ती नाही तर रमीझ नेमत नावाचा एक माणूस आहे, ज्याची पार्श्वभूमी अत्यंत वादग्रस्त असल्याचे म्हटलंय.
मी राजकारण सोडत आहे आणि मी माझ्या कुटुंबाला नाकारत आहे…
संजय यादव आणि रमीझ यांनी मला हेच करायला सांगितले होते…आणि मी सर्व दोष घेत आहे.— रोहिणी आचार्य (@RohiniAcharya2) १५ नोव्हेंबर २०२५
रमीझ नेमत कोण आहे?
रोहिणीने पुन्हा पोस्ट केलेल्या माहितीत रमीझवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यात म्हटलं आहे की, तो उत्तर प्रदेशातील बलरामपूरचा रहिवासी आहे आणि झारखंडसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला आहे. तो संजय यादवचा जवळचा मित्र असल्याचे सांगितलं जातं. त्यात असा दावा केला आहे की, रमीझ संजय यादवसाठी काम करतो आणि त्याची प्रतिमा गुंडांसारखी आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असल्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे. त्याचे सासरे देखील उत्तर प्रदेशातील टॉप 10 गुन्हेगारांपैकी एक आहेत. पोस्टमध्ये असाही दावा केला आहे की, रमीझ सध्या तुरुंगातून जामिनावर बाहेर आला आहे.
बिहारमध्ये आरजेडीच्या पराभवानंतर लालूजींच्या कन्या रोहिणी आचार्य बहिणीने पक्ष सोडल्यानंतर रमीझ कोण आहे?
रमीझ नेमत गुंड गुन्हेगारी मानसिकतेचा आहे, तो बलरामपूर, उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे आणि झारखंड प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला आहे आणि त्याची संजय यादवसोबत मैत्री… pic.twitter.com/7zpgwqRBSx
— 2.0 (@secularnetaji) १५ नोव्हेंबर २०२५
पण, या दाव्यांची अद्याप स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असून संजय यादव किंवा रमीझ या दोघांनीही या प्रकरणावर भाष्य केलेलं नाही.
निवडणुकीतील पराभव आणि राजद अंतर्गत तणाव
बिहारमध्ये आरजेडीला मोठा पराभव पत्करावा लागला असताना रोहिणी यांनी हे पाऊल उचललंय. पक्षाच्या जागा 75 वरून फक्त 25 वर आल्या आहेत. दरम्यान, भाजप आणि जेडीयूच्या महायुतीने 202 जागा जिंकून 200 च्या पुढे जाण्याचे उद्दिष्ट गाठलंय. सरकार स्थापनेसाठी जेडीयूचे प्रयत्नही तीव्र झाल आहेत. या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी जेडीयू नेते लल्लन सिंह आणि संजय झा दिल्लीत पोहोचले आहेत.





















