Homeमहाराष्ट्रIndurikar Maharaj Criticizes Engagement Wedding Reply Politicians | मुलीचे लग्न साखरपुड्यापेक्षा टोलेजंग...

Indurikar Maharaj Criticizes Engagement Wedding Reply Politicians | मुलीचे लग्न साखरपुड्यापेक्षा टोलेजंग करणार!: इंदुरीकर महाराजांचे टीकाकारांना उत्तर, म्हणाले – त्रास देण्यालाही मर्यादा असतात – Maharashtra News

मुलीच्या साखरपुड्याच्या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात खर्च केल्यामुळे कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज टीकेचे धनी झाले.’बोलण्याप्रमाणे वागले नाहीत’ अशी टीका त्यांच्यावर होत असताना, संतप्त इंदुरीकर महाराजांनी एका कीर्तनातून या टीकाकारांना सडेतोड उत्तर दि

.

गेल्या आठवडाभरापासून सोशल मीडियावर इंदुरीकरांच्या मुलीच्या साखरपुड्याचे व्हिडिओ चर्चेत होते. आपल्या कीर्तनातून साधेपणाचे रामबाण धडे देणारे महाराज स्वतःच्या मुलीच्या सोहळ्यात लाखो रुपये खर्च करण्यावरून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले. नेटकऱ्यांनी इंदुरीकर महाराज ‘दुटप्पीपणा’ करत असल्याचा आरोप केला. या टीकेमुळे त्रस्त झालेल्या इंदुरीकरांनी कीर्तनसेवा सोडण्याचे संकेतही दिले होते. आता या टीकेला इंदुरीकरांनी एका कीर्तनातून दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

नेमके काय म्हणाले इंदुरीकर महाराज?

या टीकेला उत्तर देताना इंदुरीकर महाराज प्रचंड संतापलेले दिसले. “अनेक जण माझ्या मुळावर उठणार, हे मला माहिती होते. त्या औलादींना मी सांगतो. मुलीचे लग्न याच्यापेक्षा टोलेजंग करणार आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त करत टीकाकारांना ठणकावून सांगितले.

यावेळी इंदुरीकर महाराजांनी राजकारण्यांवरही टीका केली. “तीस मिनिटांच्या सभेसाठी राजकारणी तीन कोटी खर्च करतात, तेव्हा कुणी काही बोलत नाही. ते पैसे कुठून आणले? हे देखील माध्यम प्रतिनिधी त्यांना विचारीत नाही,” असे म्हणत त्यांनी निवडणुकीच्या काळात आता पैशाचा तमाशा सुरूच होईल, असे सांगितले.

टीकाकारांना मर्यादा पाळण्याचा इशारा

हे लोक विकले गेलेले आहेत. केवळ दुसऱ्यांना त्रास देणे हेच यांचे काम राहिले आहे. दुसऱ्याला त्रास देण्यालाही मर्यादा असतात. माझ्यापर्यंत ठीक होते, परंतु लोक माझ्या कुटुंबावर बोलत आहेत. माझ्या मुलीच्या अंगावरील ड्रेसपर्यंत काही लोक गेले आहेत. आता डोक्यावरचा फेटा खाली ठेवायची वेळ आली आहे, असे इंदुरीकर महाराज म्हणालेत.

दरम्यान, कीर्तनातून ‘साधी लग्न करा, कर्ज काढू नका’ असा आग्रह धरणाऱ्या महाराजांनी स्वतःच्या मुलीच्या सोहळ्यात केलेल्या खर्चावरून त्यांना ‘बोले तैसा चाले’ या उक्तीवर न वागल्यामुळे टीकेला सामोरे जावे लागले आहे. मात्र, आता इंदुरीकर महाराजांनी टीकाकारांना दिलेल्या उत्तरामुळे टीकाकाऱ्यांच्या काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहावे लागणार आहे.

हे ही वाचा…

इंदुरीकर महाराजांचे कीर्तन सोडण्याचे संकेत:फेटा खाली ठेवण्याचा विचार दाखवला बोलून; लेकीच्या साखरपुड्यावर टीका झाल्याने नाराज

लेक ज्ञानेश्वरीच्या शाही थाटात पार पडलेल्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर इंदुरीकर महाराजांवर वारकरी संप्रदायासह अनेकांकडून टीकेचा भडिमार झाला. कीर्तनातून साधेपणाचा संदेश देणारे महाराज लेकीच्या समारंभात ऐषआरामाचा थाट दाखवत असल्याची टीका सुरू झाल्यानंतर इंदुरीकर महाराज नाराज झाले आहेत. त्यांनी अखेर या सर्व वादावर थेट भाष्य केले. “मी आता फेटा खाली ठेवण्याच्या विचारात आहे” असे मोठे विधान करत कीर्तन सेवा सोडण्याचे संकेत दिले आहेत. सविस्तर वाचा



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

28 नोव्हेंबरचे टॅरो राशिभविष्य: कुंभ राशीच्या लोकांच्या रखडलेल्या पदोन्नतीला मंजुरी मिळेल, कन्या राशीच्या लोकांसाठी...

0
11 तासांपूर्वीकॉपी लिंकशनिवार, 28 नोव्हेंबर रोजी कुंभ राशीच्या सरकारी कर्मचाऱ्यांना रखडलेल्या बढती आणि थकीत भत्त्यांना मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. मकर राशीच्या ज्या...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना उच्च पद मिळण्याचे योग, तर कन्या राशीच्या लोकांना प्रमोशन...

0
बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना उच्च पद किंवा मोठी प्रशासकीय जबाबदारी मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. सरकारी कंत्राटे आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित...

एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! – श्री. शॉन क्लार्क

0
‘कॉप-३१’ जागतिक हवामान परिषदेत भारतीय शिष्टमंडळातर्फे भारताचा आध्यात्मिक संशोधन दृष्टिकोन सादर ‘पर्यावरण जाणीव चळवळ’ : एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! - श्री. शॉन...

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!