Homeदेश-विदेशपक्षविरोधी कारवायांवर पक्षाने कारणे दाखवा नोटीस पाठवल्यानंतर आरके सिंह यांनी भाजपचा राजीनामा...

पक्षविरोधी कारवायांवर पक्षाने कारणे दाखवा नोटीस पाठवल्यानंतर आरके सिंह यांनी भाजपचा राजीनामा दिला

आरके सिंह यांनी दिला भाजपचा राजीनामा भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री आर के सिंह यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाने निलंबित करत कारणे दाखवा नोटीस पाठवल्यानंतर त्यांनी राजीनामा सोपवला आहे. आर के सिंह यांनी यासंदर्भात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी आपल्या निर्णयाची आणि सध्याच्या स्थितीची सविस्तर माहिती दिली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

पत्रात आर.के. सिंह यांनी म्हटलं आहे की, त्यांना माध्यमांद्वारे पक्षाने त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई केली असून, कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती मिळाली. त्यांनी स्पष्ट केले की पत्रात आरोपांची तपशीलवार माहिती नाही, त्यामुळे योग्यरित्या उत्तर देणे अशक्य आहे. आपण आधीच राज्य भाजप कार्यालयाला उत्तर पाठवलं असल्याचंही ते म्हणाले आहेत.

‘माझं विधान गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना तिकीट देण्याविरोधात’

आर.के. सिंह यांनी त्यांच्या पत्रात असंही म्हटलं आहे की त्यांचे विधान गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना तिकीट देण्याच्या विरोधात आहे. त्यांनी म्हटलं आहे की हे पाऊल पक्षविरोधी भूमिका नाही, तर ते देश आणि समाजाच्या हितासाठी उचललं गेलं आहे. त्यांनी आरोप केला की पक्षातील काही लोक राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यास विरोध करत आहेत.

आर.के. सिंह यांनी पत्राचा शेवट “मी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे” असं लिहून केला आहे. त्यांचा हा निर्णय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. या राजीनाम्यानंतर, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर भाजपमधील राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे की आर.के. सिंह यांची भूमिका आणि त्यामागील कारणे आता पक्ष नेतृत्वाकडून तपासली जातील.

भाजपाने पक्षविरोधी कारवायांसाठी जबाबदार धरत तीन नेत्यांना निलंबित केलं आहे. यामध्ये आरके सिंह यांच्यासह विधान परिषद सदस्य अशोक अग्रवाल आणि कटिहारच्या महापौर उषा अग्रवाल यांचा समावेश आहे. बिहार भाजपचे राज्य मुख्यालय प्रभारी अरविंद शर्मा यांनी शनिवारी सकाळी संबधित नेत्यांना नोटीस बजावली, त्यांना त्यांच्या निलंबनाची माहिती दिली आणि त्यांना पक्षातून का काढून टाकू नये याचे स्पष्टीकरण देण्यासाठी एका आठवड्याची मुदत दिली आहे.

“तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात. हे शिस्तीच्या कक्षेत येते. पक्षाने हे गांभीर्याने घेतले आहे. यामुळे पक्षाचे नुकसान झाले आहे. म्हणून, तुम्हाला पक्षातून निलंबित केलं जात आहे आणि तुम्हाला पक्षातून का काढून टाकू नये याचं स्पष्टीकरण देण्यास सांगितलं जात आहे. कृपया हे पत्र मिळाल्यापासून एका आठवड्याच्या आत तुमची भूमिका स्पष्ट करा,” असं सिंह आणि अग्रवाल यांना पाठवण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीशीत लिहिण्यात आलं आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!