Homeदेश-विदेशबिहार निवडणूक निकाल 2025 बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार कोण असतील

बिहार निवडणूक निकाल 2025 बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार कोण असतील


बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार: नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. कारण बिहारमध्ये भाजपनंतर जेडीयू हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत 7 वेळा मुख्यमंत्रीपद भुषवलेले नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार का? पाहुयात याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट..

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं त्यांच्या राजकीय विरोधकांना चारीमुंड्या चित केलं आहे.. ऐतिहासिक बहुमत मिळवत भाजप आणि जेडीयूनं बिहारमध्ये विजयाचा गुलाल उधळला आहे. बिहार निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी नितीश कुमारांची देखील बिहारमध्ये जादू पाहायला मिळाली आहे. भाजपपाठोपाठ नितीश कुमारांचा जेडीयू दुसरा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान नितीश कुमार यांच्यासह विजय कुमार सिन्हा, सम्राट चौधरी, रेणु देवी आणि रामकृपाल यादव ही चार नावं चर्चेत आहेत.

आतापर्यंत कितीवेळा मुख्यमंत्री?

– 2000 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील  एनडीएच्या पाठिंब्याने नितीश कुमार पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेत

– विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यानंतर सात दिवसांनी राजीनामा दिला.

– 2005 मध्ये भाजप आणि समता पक्षासोबत युती करून नितीश कुमार दुस-यांदा मुख्यमंत्री झाले आहेत

– 2010 मध्ये एनडीएचा विजय झाला आणि पुन्हा एकदा नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत

– 2013 मध्ये नितीश कुमार यांनी भाजपसोबत युती तोडली आणि आरजेडीसोबत जात सरकार स्थापन करत मुख्यमंत्री झालेत

– 2015 मध्ये लालू प्रसाद यांच्या आरजेडीसोबत युती करून महाआघाडीची स्थापना करून पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचा मान

– 2017 मध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार यांनी यू-टर्न घेत आरजेडीची साथ सोडली आणि भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपसोबतच्या सरकारमध्ये तेच मुख्यमंत्री झाले आहेत.

– 2020 मध्ये नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत विधानसभेच्या निवडणुकीत उतरलेत, जेडीयूला या निवडणुकीत 43 जागा मिळाल्यात.. मात्र, पुन्हा  एकदा त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली.

– 2025 मध्ये नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार का? याकडे आता लक्ष लागलं आहे.

2020च्या तुलनेत नितीश कुमारच्या जेडीयूला यंदाच्या निवडणुकीत जबरदस्त यश मिळालं आहे.

नितीश कुमारांची जादू कायम

2020 मध्ये नितीश कुमारांच्या जेडीयूला 43 जागा मिळाल्या होत्या, मात्र, आता 84 पेक्षा जास्त जागांवर जेडीयूच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे

बिहारमध्ये नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा त्यांचा दम दाखवलाय.. बिहारमध्ये मिळालेल्या भरघोस यशानंतर जेडीयूच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून “न भूतो न भविष्यति.. नितीश कुमार बिहार के मुख्यमंत्री थे, हैं. और रहेंगे.. ही पोस्ट करण्यात आली.. मात्र, काही मिनिटातच ही पोस्ट जेडीयूच्या ट्विटर हँडलवरून डिलिट करण्यात आली आहे.

पुन्हा एकदा बिहारच्या राजकारणात आपणच बाहुबली असल्याचं नितेश कुमार यांनी दाखवून दिलं. या निवडणुकीतही नितीश कुमारांच्या जेडीयूनं चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सातवेळा मुख्यमंत्रिपद भुषवणा-या नितीश कुमारांच्या गळ्यात पुन्हा मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार का? याकडे आता लक्ष लागलंय..





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!