ग्रीस आणि अल्बेनियामध्ये सापडलेला जगातील सर्वात मोठा स्पायडर वेब: जर तुम्हाला कोळ्यांची भीती वाटत असेल, तर ही बातमी तुमचे अंगावर काटा आणेल! वैज्ञानिकांनी अल्बानिया आणि ग्रीसच्या सीमेजवळील एका रहस्यमय गुहेत जगातील सर्वात मोठं कोळी जाळं (World’s Largest Spider Web) शोधून काढलं आहे. हे जाळं इतकं विशाल आहे की त्यात 1.10 लाखांपेक्षा अधिक जीव राहत आहेत ज्यात दोन वेगवेगळ्या प्रजातींच्या हजारो कोळ्यांचा समावेश आहे.
100 चौरस मीटरमध्ये पसरलेलं ‘महाजाल’
ही अद्भुत रचना ‘सल्फर केव्ह’ (Sulfur Cave) नावाच्या ठिकाणी आढळली आहे, जी सुमारे 1140 चौरस फूट (100 चौरस मीटर) क्षेत्रात पसरलेली आहे. या जाळ्यात 69,000 घरगुती कोळ्यांसह (Domestic House Spiders) आणि 42,000 ड्वार्फ वीव्हर स्पायडर्स (Dwarf Weaver Spiders) एकत्र राहतात, जणू एक संपूर्ण “कोळी शहर”!
सूर्यप्रकाश नाही, हवा विषारी; तरीही जिवंत!
या शोधाने वैज्ञानिकांना चकित केलं आहे कारण ही संपूर्ण कोळी कॉलनी अशा ठिकाणी आहे जिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही, आणि हवेतील हायड्रोजन सल्फाइड गॅसचे प्रमाण इतकं जास्त आहे की इतर बहुतांश जीवांसाठी ते प्राणघातक आहे. तरीही हे हजारो कोळी त्या विषारी वातावरणात निर्विघ्न जगत आहेत. संशोधकांनी सांगितले की हे जाळं गुहेच्या आतल्या भागात प्रवेशद्वारापासून सुमारे 50 मीटर अंतरावर कायम अंधार आहे.
दोन प्रजातींचं अद्भुत टीमवर्क
या संशोधनाला ‘Subterranean Biology’ या नामांकित जर्नलमध्ये स्थान मिळालं आहे. यात पहिल्यांदाच दोन वेगवेगळ्या कोळी प्रजातींना एकत्र येऊन कॉलनी तयार करताना आणि जाळं विणताना पाहिलं गेलं आहे. मुख्य संशोधक इस्तवान यूराक (Istvan Urak), जे ट्रान्सिल्वेनियातील Sapientia Hungarian University of Romania येथे बायोलॉजीचे असोसिएट प्रोफेसर आहेत, त्यांनी सांगितलं की, “ते दृश्य शब्दांत सांगणं कठीण आहे. तो क्षण भयाचा नव्हता, तर आश्चर्य आणि आदराचा होता.”
काय खातात हे कोळी?
या गुहेतील कोळी ‘मिजेस’ (midges) नावाच्या सूक्ष्म कीटकांवर उपजीविका करतात, जे स्वतः सल्फर खाणाऱ्या सूक्ष्मजीवांवर (microbes) अवलंबून असतात. म्हणजेच या संपूर्ण गुहेचा फूड चेन सल्फरवर आधारित आहे. संशोधकांनी हेही शोधून काढले की या कोळ्यांच्या शरीरात असलेल्या मायक्रोबायोम (microbiome) ची विविधता बाहेर राहणाऱ्या कोळ्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. तसेच, मॉलिक्युलर टेस्ट्स मध्ये हेही स्पष्ट झालं की गुहेतील कोळी त्यांच्या बाहेर राहणाऱ्या नातलग प्रजातींपेक्षा जेनेटिकली बदललेले (genetically different) झाले आहेत, म्हणजेच त्यांनी या अंधाऱ्या, विषारी जगात स्वतःला पूर्णतः अनुकूल केलं आहे.
2022 मध्ये शोध, 2024 मध्ये वैज्ञानिक पुष्टी
या ‘जालमहल’चा शोध सर्वप्रथम Czech Speleological Society च्या गुहा-विशेषज्ञांनी 2022 मध्ये लावला होता. त्यानंतर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या टीमने त्या ठिकाणी भेट देऊन नमुने गोळा केले आणि संशोधन केल्यानंतर या शोधाची अधिकृत वैज्ञानिक पुष्टी करण्यात आली.
अल्बेनिया-ग्रीस सीमेवरील सल्फर गुहेत 106 m² व्यापलेला जगातील सर्वात मोठा स्पायडरवेब शास्त्रज्ञांना सापडला.
दोन सामान्यतः प्रतिस्पर्धी प्रजातींमधील 111,000 पेक्षा जास्त कोळी एका अनोख्या, स्वयं-शाश्वत पारिस्थितिक तंत्रात एकत्र राहतात – अशा वर्तनाची पहिली नोंद. pic.twitter.com/769YgSt1GC
– महत्त्वाचे क्षण (@_fluxfeeds) 6 नोव्हेंबर 2025
हे आजवर सापडलेले सर्वात मोठे आणि रहस्यमय कोळी समुदायांपैकी एक मानले जात आहे.





















