Homeदेश-विदेशShocking Medical Case in Gujarat: Doctors Remove Over 250 Lice and 80...

Shocking Medical Case in Gujarat: Doctors Remove Over 250 Lice and 80 Eggs from Elderly Woman’s Eyelid Video Viral | Video: धक्कादायक! वृद्धेच्या पापण्यांतून निघाल्या 250 उवा अन् 80 अंडी; गुजरातमधील घटना


गुजरात मेडिकल केस बातम्या: गुजरातीलमधील सावरकुंडला तालुक्यातील लल्लूभाई शेठ आरोग्य मंदिर येथे एक अत्यंत दुर्मीळ आणि धक्कादायक वैद्यकीय प्रकरण समोर आल्याने स्थानिकांसह वैद्यकीय क्षेत्रातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या रुग्णालयातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. मृगांक पटेल यांनी 66 वर्षीय वृद्ध महिला गीताबेन मेहता यांच्या डोळ्याच्या वरच्या पापणीमधून तब्बल 250 पेक्षा अधिक उवा आणि 80 हून अधिक अंडी शस्त्रक्रियेद्वारे काढली आहेत. हा प्रकार अत्यंत क्वचित आढळणारा असल्याने याची चर्चा महाराष्ट्र-गुजरातसहित संपूर्ण मेडिकल फ्रटरनिटीमध्ये होत आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल (Viral Video) झाला आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

दीड महिन्यांपासून डोळ्यांत सतत खाज

गीताबेन मेहता गेल्या दीड महिन्यांपासून डोळ्यांत सतत खाज सुटणे, जळजळ, पापण्या जड होणे आणि दृष्टी धूसर दिसणे या समस्यांनी त्रस्त होत होत्या. घरगुती उपाय आणि सामान्य आयड्रॉप्स वापरूनही काहीच फरक न पडल्याने त्यांनी अखेर सावरकुंडला येथील आरोग्य मंदिरात उपचारासाठी भेट दिली. सुरुवातीला साधा संसर्ग असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला, मात्र तपासणीदरम्यान मायक्रो लेंस आणि स्लिट लॅम्प मशीन च्या सहाय्याने नेमकी समस्येची खात्री करून घेतली असता डॉक्टरांच्या लक्षात एक धक्कादायक गोष्ट आली. गीताबेन यांच्या पापणीच्या केसांमध्ये आणि त्वचेच्या खाली लहान-लहान उवांचा घोळ तयार झाला होता.

हे ही वाचा: मजेसाठी केली DNA टेस्ट… पण रिपोर्टमध्ये पत्नीचा निघाला असा ‘संबंध’ की पतीचे जगच कोसळले!

अत्यंत दुर्मिळ प्रकरण

उवा सामान्यतः डोक्याच्या केसांत आढळतात. मात्र, डोळ्यांच्या पापण्या आणि भुवयांच्या भागात त्यांचा संसर्ग होणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. डॉक्टरांच्या मते, कमी स्वच्छता, केसांमधील गंभीर उवा संक्रमणाचा पसरलेला प्रभाव, तसेच दीर्घ काळ दुर्लक्ष केल्याने हा संसर्ग डोळ्यापर्यंत पोहोचू शकतो.

हे ही वाचा: ‘अशी’ थंडी तुम्ही कधी पाहिलीच नसेल! -62°C चं थरारक दृश्य दाखवणारा Video सोशल मीडियावर व्हायरल

तत्काळ वृद्धावर शस्त्रक्रिया

तत्काळ वृद्धेवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे दीड तास चाललेल्या या सूक्ष्म शस्त्रक्रियेत डॉ. पटेल यांनी अत्यंत दक्षता घेऊन प्रत्येक उवा  आणि त्याच्याशी जोडलेली अंडी काढून टाकली. या प्रक्रियेत अचूक हाताळणी, विशेष मायक्रो-सर्जिकल उपकरणे आणि सातत्याने दृष्टी निरीक्षण आवश्यक होते. या संपूर्ण प्रक्रियेनंतर वृद्धेला मोठा आराम मिळाला असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

हे ही वाचा: मुलींवर अत्याचार, तहानलेल्या मुलांना टॉयलेटचं पाणी…330 मृत्यू, 2004 साली जगात घडलं होतं सर्वात क्रूर हत्याकांड

आरोग्य विभागातही मुद्दा चर्चेत

हा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात आणि आरोग्य विभागातही हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा घटना टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता, डोक्याच्या केसांची नियमित स्वच्छता आणि लक्षणांकडे वेळेत लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. गीताबेन मेहता यांना आता पुढील काही दिवस औषधोपचार व तपासणीसाठी नियमित फॉलो-अप देण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की थोडे दुर्लक्षही मोठ्या आणि वेदनादायक समस्येला आमंत्रण देऊ शकते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!