Homeदेश-विदेशBlue Print बद्दलचा प्रश्न, भाजप उमेदवार मैथिली ठाकूर म्हणते, 'हा खासगी विषय,...

Blue Print बद्दलचा प्रश्न, भाजप उमेदवार मैथिली ठाकूर म्हणते, ‘हा खासगी विषय, मी सर्वांसमोर….’


Maithili Thakur On Blue Print: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नेत्यांच्या घोषणा, आश्वासनं पाहायला मिळतायत. या सर्वात भाजप उमेदवार मैथिली ठाकूरची चर्चा सध्या जोरात आहे. संगीत क्षेत्रात प्राविण्य मिळवलेली मैथिली राजकारणात नवखी आहे. त्यामुळे अचानक ओढवलेल्या प्रसंगामुळे तिची अनेकदा फजिती झाल्याचे पाहायला मिळते. यावेळेस तिला मतदारसंघाच्या ब्लू प्रिंटबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. पण ती गोंधळली. काय घडलं नेमकं? विस्तर जाणून घेऊया.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

मैथिली ठाकूरने आपल्या गोड स्वरांनी लोकसंगीत आणि भक्तिगीतांद्वारे करोडोंची हृदय जिंकले. ती आता राजकीय पटावर पदार्पण करत आहे. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका विधानाने ती ट्रोल होऊ लागलीय. प्रचारादरम्यान एका पत्रकाराने मैथिलीला तिच्या मतदारसंघाच्या विकास आराखड्याबद्दल विचारले. यावर तिने थेट कॅमेरासमोर, “मी हे सर्वांसमोर कसे सांगू शकते? हा तर पूर्णपणे खासगी आणि गोपनीय बाब आहे,” असे उत्तर दिले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेटकऱ्यांनी त्यावरून तिची खिल्ली उडवलीय.

मीम्स व्हायरल

मैथिलीची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आलीय. कोणी तिला “राजकीय नवशिकी” म्हटलंय, तर कोणी “गुप्त आराखड्याची गुप्तहेर” म्हणून चिडवलंय. या विधानाने तिच्या राजकीय परिपक्वतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेकांनी भाजपच्या या स्टार उमेदवाराच्या राजकीय दृष्टिकोनावर टीका केली. एकाने लिहिले, “जेव्हा उमेदवार आपल्या भागाचा आराखडा गोपनीय असल्याचे सांगतो, म्हणजे त्याच्याकडे काहीच योजना नसते.”

दुसऱ्याने यूजरने म्हटले, “मतदारांना असे नेते नकोत जे उत्तर टाळतात, तर ज्यांच्याकडे खरी कल्पना आणि दृष्टिकोन असतो.” काहींनी याला राजकारणातील नवीन ट्रेंड म्हटलंय, जिथे चेहर्‍याची ओळख असते, पण जमिनीवरची जाण नसते. मैथिलीचे नाव आता बिहारच्या युवा मतदारांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. समर्थक तिला “सांस्कृतिक वारसा जपणारी म्हणून पाहतात, तर  प्रसिद्धी आणि राजकारण हे दोन वेगळे क्षेत्र असल्याची टीका विरोधक करतायत.

संगीतातून राजकारणाकडे

25 जुलै 2000 रोजी बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात जन्मलेली मैथिली ठाकूर बालपणापासून संगीतात रमली. तिचे वडील आणि आजोबा हे दोघेही संगीतकार असल्याने, त्यांनी तिला भारतीय शास्त्रीय आणि लोकसंगीताच्या सूक्ष्म अंगांचे प्रशिक्षण दिले. 2017 मध्ये ‘रायझिंग स्टार’ या टीव्ही शोमध्ये धावपळ करून ती देशभर ओळखली गेली. भावांबरोबर सोशल मीडियावर शेकडो लोकगीत आणि भजन गाऊन तिचे लाखो फॉलोअर्स बनलेयत. हळूहळू तिचे नाव फक्त गायिका म्हणून नव्हे, तर “मिथिला प्रांताची कन्या” म्हणून गाजले. भाजपने तिच्या या लोकप्रियतेला ओळखून तिला पक्षात सामावून घेतले. दारभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मैथिली ठाकूरला ट्रोलिंगचा सामना का करावा लागला?

बिहार विधानसभा निवडणुकीत पत्रकाराने तिच्या मतदारसंघाच्या विकास आराखड्याबद्दल विचारले असता, तिने “हा पूर्णपणे खासगी आणि गोपनीय बाब आहे” असे उत्तर दिले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सोशल मीडियावर मीम्स आणि व्यंग्याची बाढ आली, ज्यामुळे तिच्या राजकीय तयारीवर प्रश्न उपस्थित झाले.

मैथिली ठाकूरची पार्श्वभूमी काय आहे आणि तिला उमेदवारी का मिळाली?

२५ जुलै २००० रोजी मधुबनीत जन्मलेली मैथिली संगीतकार कुटुंबातील आहे. २०१७ मध्ये ‘रायझिंग स्टार’ शोमध्ये रनर-अप झाल्यानंतर तिने सोशल मीडियावर लोकगीत-भजन गाऊन लाखो अनुयायी मिळवले. तिच्या लोकप्रियतेमुळे भाजपने तिला अलीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली.

मैथिलीच्या वादग्रस्त विधानाने काय बहस निर्माण केली?

“गोपनीय आराखडा” या उत्तराने प्रसिद्धी आणि राजकारण वेगळे असल्याची चर्चा उफाळली. समर्थक तिला सांस्कृतिक प्रतीक म्हणतात, तर विरोधक म्हणतात की मशहूर चेहऱ्यांना फक्त ओळखीच्या जोरावर टिकट देणे हा राजकारणातील नवीन ट्रेंड आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

‘ताजमहाल तेजोमहालय मंदिर होते का’:अलाहाबाद हायकोर्टाने केंद्र- ASI ला उत्तर मागितले; सर्वेक्षण आयुक्त नियुक्तीच्या...

0
अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी ताजमहालमध्ये तेजो महालय मंदिर असल्याच्या याचिकेवर सुनावणी केली. त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी वकील आयोग (एडवोकेट कमिशन) नियुक्त करण्याच्या मागणीवर केंद्र...

ट्रस्टच्या वादातून साधूची फसवणूक; फसवणुकीची कथा

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक लोककथा आहे. जुन्या काळात एका गावातील मंदिरात एक साधू राहत होता. तो आपल्या तपस्या, शिस्त आणि साधेपणासाठी प्रसिद्ध होता....

जादूटोण्याची भीती घालून महिलेवर बलात्कार अन् जबरदस्तीने विवाह:मुलासह महिलेचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, दारणा...

0
धंद्यात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत जादूटोण्याची भीती घालून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी संशयित भोंदूबाबा...

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...
spot_img

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...
error: Content is protected !!