Homeदेश-विदेशब्रिटीश राजघराण्यातील राजा चार्ल्सने त्याचा भाऊ अँड्र्यू ही पदवी काढून घेतली, जेफ्री...

ब्रिटीश राजघराण्यातील राजा चार्ल्सने त्याचा भाऊ अँड्र्यू ही पदवी काढून घेतली, जेफ्री एपस्टाईन लैंगिक शोषणाच्या दुव्यांवरून त्याला राजघराणे बेदखल केले


ब्रिटिश राजघराणे: ब्रिटनच्या राजघराण्यासंदर्भात संपूर्ण जगभरात कायमच कुतूहल पाहायला मिळालं आहे. अगदी दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय यांची कारकिर्द असो किंवा या राजघराण्याचे शिष्टाचार असो. जिथंजिथं या शाही कुटुंबाचा उल्लेख झाला तिथंतिथं सर्वांच्याच नजरा खिळल्या. अशाच या कुटुंबातून आणखी एखा गृहकलहाचं वृत्त सध्या संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरत आहे. जिथं सख्ख्या भावंडांमधील वाद चव्हाट्यावर आल्याचं स्पष्ट होत आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनच्या सिंहासनाचे सर्व अधिकार तत्कालीन प्रिन्स आणि आताचे राजा चार्ल्स यांच्याकडे गेले. ज्यानंतर आता ब्रिटनच्या या कुटुंबाची सूत्र हाताळणाऱ्या राजा चार्ल्स यांनी त्यांचा सख्खा भाऊ प्रिन्स अँड्र्यू यांच्याविरोधात एक मोठी कारवाई करत त्यांच्याकडून ‘प्रिन्स’ ही उपाधीसुद्धा हिसकावून घेतल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नव्हे तर ते राहत असणाऱ्या शाही निवासस्थानातूनही त्यांना बाहेर निघण्याचे आदेश राजाच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहेत.

बकिंगहॅम पॅलेसमधून जारी केलेले अधिकृत पत्रक

सदर प्रकरणी ब्रिटनच्या बकिंघम पॅलेसकडून एक अधिकृत पत्रक जारी करण्यात आलं. त्या पत्रकामध्ये इथून पुढं अँड्र्यू यांची ओळख काय असेल इथपासून त्यांचा राजघराण्याशी काहीही संबंध नाही असं स्पष्ट करत सर्व हिशोब मांडण्यात आला आहे. तब्बल £69 billion अर्थात ₹80,49,85,05,00,00 इतकी अमाप श्रीमंती असणाऱ्या या शाही कुटुंबाच्या पत्रकामध्ये लिहिण्यात आलं आहे, ‘हिज मॅजेस्टी, राजेसाहेबांनी राजकुमार अँड्र्यू यांच्यावरील कारवाई सुरू करत त्यांना दिलेल्या उपाधी काढून घेतल्या आहेत. इथून पुढं प्रिन्स अँड्र्यू यांची ओळख असेल अँड्र्यू माऊंटबेटन विंडसर. त्यांना राहत्या घराच्या करारपत्रासंदर्भातील पत्रक देण्यात आलं असून शाही निवासस्थान सोडून ऐवजी पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’

प्रिन्स अँड्र्यूवर का करण्यात आली ही कारवाई?

लैंगिक शोषण प्रकणी दोषी ठरलेल्या जेफ्री एपस्टीन यांच्यासह अँड्र्यू यांची असणारी जवळीक पाहता राजघराण्यावर मागील काही दिवसांपासून अनेकांचाच रोष ओढावला होता. किंबहुना नुकतंच एका जाहीर कार्यक्रमातही किंग चार्ल्स यांना त्यांच्या धाकट्या भावामुळं विरोधाचा सामना करावा लागला होता. ज्यामुळं राजेपदी असणाऱ्या चार्ल्स यांनी या दबाव आणि रोषामुळं हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

ब्रिटनच्या राजघराण्यात यापूर्वीसुद्धा अशा कारवाई झाल्या असून, यावेळी खुद्द राजेसाहेबांचे धाकटे बंधूच अडचणीत आले. प्रिन्स अँड्र्यू हे किंग चार्ल्स यांचे तृतीय बंधू असून, दिवंगत राणी एलिझाबेथ यांचे चे द्वितीय पुत्र आहेत. लहान मुलीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये दोषी असणाऱ्या जेफ्री एपस्टीन यांच्याशी असणाऱ्या नात्यामुळं अँड्र्यू केल्या बऱ्याच काळापासून अडचणींमध्ये आणि वादांमध्ये सापडले होते. अँड्र्यू यांनी आपल्यावरील आरोप सातत्यानं फेटाळले असले तरीही त्यांच्यामुळं राजघराण्यावर ओढावणारं संकट पाहता त्यांना या मोठ्या कारवाईचा सामना करावा लागत आहे हे स्पष्ट होतंय. सूत्रांच्या माहितीनुसार सदर कारवाईनंतर शाही निवासस्थान सोडल्यानंतर प्रिन्स अँड्र्यू  त्यांच्या पूर्व इंग्लंडमधील सँड्रिघम एस्टेटमधील खासगी निवासस्थानी वास्तव्यास जातील.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

ब्रिटिश राजघराण्यात सध्या कोणता वाद चर्चेत आहे?
ब्रिटिश राजघराण्यात सध्या राजा चार्ल्स आणि त्यांचे धाकटे भाऊ प्रिन्स अँड्र्यू यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर राजा चार्ल्स यांनी प्रिन्स अँड्र्यू यांच्यावर मोठी कारवाई करत त्यांची ‘प्रिन्स’ उपाधी काढून घेतली आहे.

बकिंघम पॅलेसकडून जारी केलेले अधिकृत पत्रक काय सांगते?
बकिंघम पॅलेसने 30 ऑक्टोबर 2025 रोजी अधिकृत पत्रक जारी केले. त्यात म्हटले आहे की, राजा चार्ल्स यांनी प्रिन्स अँड्र्यू यांच्या उपाध्या, सन्मान आणि शैली काढून घेतली आहे. आता त्यांची ओळख ‘अँड्र्यू माऊंटबेटन-विंडसर’ असेल.

प्रिन्स अँड्र्यूवर ही कारवाई का करण्यात आली?
प्रिन्स अँड्र्यू यांची जेफ्री एपस्टीन (लैंगिक शोषण प्रकरणात दोषी ठरलेले) यांच्याशी जवळीक आणि लहान मुलीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे राजघराण्यावर रोष ओढावला होता. नुकत्याच जाहीर कार्यक्रमात राजा चार्ल्स यांना याचा विरोध झाला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

‘ताजमहाल तेजोमहालय मंदिर होते का’:अलाहाबाद हायकोर्टाने केंद्र- ASI ला उत्तर मागितले; सर्वेक्षण आयुक्त नियुक्तीच्या...

0
अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी ताजमहालमध्ये तेजो महालय मंदिर असल्याच्या याचिकेवर सुनावणी केली. त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी वकील आयोग (एडवोकेट कमिशन) नियुक्त करण्याच्या मागणीवर केंद्र...

ट्रस्टच्या वादातून साधूची फसवणूक; फसवणुकीची कथा

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक लोककथा आहे. जुन्या काळात एका गावातील मंदिरात एक साधू राहत होता. तो आपल्या तपस्या, शिस्त आणि साधेपणासाठी प्रसिद्ध होता....

जादूटोण्याची भीती घालून महिलेवर बलात्कार अन् जबरदस्तीने विवाह:मुलासह महिलेचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, दारणा...

0
धंद्यात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत जादूटोण्याची भीती घालून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी संशयित भोंदूबाबा...

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...
spot_img

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...
error: Content is protected !!