Homeदेश-विदेश500 दशलक्ष ब्लॅकरॉक कर्ज घोटाळ्याचा आरोप असलेले बंकिम ब्रह्मभट्ट भारतीय वंशाचे सीईओ...

500 दशलक्ष ब्लॅकरॉक कर्ज घोटाळ्याचा आरोप असलेले बंकिम ब्रह्मभट्ट भारतीय वंशाचे सीईओ कोण आहेत?


बंकिम ब्रह्मभट्ट कर्ज घोटाळा: नीरव मोदी आणि विजय माल्या यांच्याप्रमाणेच कर्जघोटाळा प्रकरण आता अमेरिकेत समोर आलं आहे. भारतीय वंशाचे उद्योगपती बंकिम ब्रह्मभट्ट यांच्यावर जवळपास 500 मिलियन डॉलर म्हणजेच साधारण 4 हजार कोटींचा कर्ज घोटाळा केल्याचा गंभीर आरोप आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका अहवालातून हा खुलासा करण्यात आला आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

रिपोर्टनुसार, ब्लॅकरॉकची प्रायव्हेट क्रेडिट शाखा एचपीएस इन्वेस्टमेंट पार्टनर आणि अन्य अमेरिकेतील कर्ज देणाऱ्या कंपन्यांनी दावा केला आहे की ते मोठ्या घोटाळ्याचे शिकार ठरले असून त्यांची रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

कसा झाला 500 मिलियन डॉलरचा लोन फ्रॉड

बंकिम ब्रह्मभट्ट अमेरिकेतील ब्रॉडबँड टेलिकॉम आणि ब्रिजवॉयसचे मालक आहेत. त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी कंपनीच्या खात्यात बनावट ग्राहक आणि बनावट इनव्हॉइस दाखवून कोट्यवधि डॉलरचे कर्ज घेतले होते. या फसव्या आकड्यांचा वापर त्यांनी लोन कोलॅटरल ( गहाण संपत्ती)साठी केला होता. त्यांनी अनेक बनावट खात्यांचा वापर केला आणि कर्जाची रक्कम भारत आणि मॉरिशससारख्या देशात ट्रान्सफर करण्यात आला.

ब्लॅकरॉक आणि दुसऱ्या बँकांनी ऑगस्ट 2025मध्ये कोर्टात धाव घेतली होती. ब्रह्मभट्ट यांच्या कंपन्यांवर 500 मिलियन डॉलरहून अधिक कर्ज आहे, असा आरोप करत खटला दाखल केला होता. तर त्याच महिन्यात 12 ऑगस्ट रोजी ब्रह्मभट्ट यांनी कंपनी दिवाळखोरीत असल्याचे जाहीर केले. आणि त्यांची कंपन्यांनी Chapter 11 अंतर्गंत पुनर्रचना सुरू केली. ब्लॅकरॉकने अलीकडेच एचपीएस इन्व्हेस्टमेंट पार्टनर्सना विकत घेतल्यानंतर ही बाब समोर आली आहे.फ्रेंच बँक बीएनपी परिबासनेही यापैकी निम्म्या कर्जांना वित्तपुरवठा केला.

एचपीएसने पहिल्यांदा सप्टेंबर 2020 मध्ये ब्रह्मभट्ट यांच्या कंपनीला कर्ज दिले आणि ऑगस्ट 2024 पर्यंत त्यांचे एकूण एक्सपोजर $430 दशलक्ष झाले. अहवालानुसार, कर्ज प्रक्रिया सुरू झाल्यावर एचपीएसने कंपनीचे ऑडिट करण्यासाठी डेलॉइटला नियुक्त केले. नंतर सीबीआयझेड अकाउंटिंग फर्मने वार्षिक ऑडिट केले. जुलै २०२५ मध्ये, एचपीएस कर्मचाऱ्याला काही संशयास्पद ईमेल पत्ते आढळले जे कथितपणे ग्राहकांचे आहेत. तपासात असे दिसून आले की हे पत्ते खऱ्या टेलिकॉम कंपन्यांचे अनुकरण करणाऱ्या बनावट डोमेनवरून तयार केले गेले होते. जेव्हा ही माहिती ब्रह्मभट्ट यांच्या लक्षात आणून देण्यात आली तेव्हा त्यांनी सुरुवातीला ती “सामान्य त्रुटी” असं म्हणून फेटाळून लावली आणि नंतर फोन कॉल्सना उत्तर देणे बंद केले.

30 वर्षे जुना दूरसंचार व्यवसाय

बंकिम ब्रह्मभट्ट हे बंकाई ग्रुपचे संस्थापक आहेत आणि त्यांना दूरसंचार उद्योगात ३० वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांच्या कंपन्या जगभरातील दूरसंचार कंपन्यांना पायाभूत सुविधा आणि नेटवर्क सेवा पुरवतात.
अहवालात म्हटले आहे की फसवणूक उघडकीस आल्यापासून त्यांचे लिंक्डइन प्रोफाइल हटवण्यात आले आहे आणि सध्या हा खटला अमेरिकेच्या न्यायालयात प्रलंबित आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!