Homeदेश-विदेशबँकिंग बातम्या यूएस फेडरल रिझर्व्ह व्याज दर कपात नवीनतम अद्यतन आणि इतर...

बँकिंग बातम्या यूएस फेडरल रिझर्व्ह व्याज दर कपात नवीनतम अद्यतन आणि इतर बँका आणि आर्थिक व्यवहारांवर परिणाम


बँकिंग बातम्या: गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक अर्थसत्तांमध्ये (Economy) होणारे चढ उतार, महागाई दर आणि कर्जाचा आकडा या आणि अशा कैक गोष्टींता सामान्य खातेधारकांपासून बड्या खातेधारकांवरही कमीजास्त स्वरुपात परिणाम झाला. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आणि भक्कम पकड असणाऱ्या अमेरिकी फेजरल रिझर्व्ह बँकेनं नुकताच एक अनपेक्षित निर्णय घेत अमेरिकी नागरिकांना मओठा दिलासा दिला. जिथं या बँकेनं मुख्य व्याजदराच्या बेसिस पॉईटमध्ये  0.25% नी घट केली. या बदलानंतर फेडरल फंडचे दर 3.75 टक्क्यांवरुन 4 टक्क्यांच्या श्रेणीत आले.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

सातत्यानं दुसऱ्यांदा फेडल रिझर्व्हनं हा मोठा निर्णय घेतला असून, नोकरी क्षेत्रातील तणावाचती परिस्थिती कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. जेरॉम पॉवेल यांच्या अध्यक्षतेखालील ‘फेडरल ओपन मार्केट कमिटी’ अर्थात FOMC च्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला. जिथं आर्थिक व्यवहारांमध्ये असणाऱ्या अनिश्चिततेचा मुद्दाही अधोरेखित करण्यात आला. केंद्रीय बँकेचा टार्गेट रोजगार वाढवणं आणि महागाई कमी करून 2 टक्क्यांपर्यंत आणणं हा मुख्य हेतू असल्याचं बँकेनं स्पष्ट केलं.

व्याजदरासंदर्भातील या निर्णयाला 10 कमिट मेंबरनी पाठिंबा दिला, तर दोघांनी मात्र असहमती दर्शवरी. फेड गव्हर्नर स्टीफन मिराना यांनी 50 बेसिस पॉईंटच्या कपातीची मागणी केली, तर कंसास सिटी फेड प्रेसिडेंट जेफ श्मिड यांनी व्याजदरात कोणताही बदल करण्याची गरज नसल्याचं मत नोंदवलं.

ट्रम्प यांच्या आयात शुल्कासंदर्भातील भूमिकेचा अर्थव्यवस्थेवर परिणाम…

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्कासंदर्भातील एकंदर धोरणाचा परिणाम अमेरिकेच्याच नव्हे, तर जागतिक अर्थव्यवस्थेवरही होताना दिसत आहे. चीन, ब्राझिल इत्यादी देशांवर नव्या आयात शुल्क दरांमध्ये दरवाढ होऊ शकते. मात्र फेडरल अधिकाऱ्यांच्या धारणेनुसार हे सर्वकाही अस्थायी आहे. ट्रम्प यांनी दक्षिण कोरियातील APEC परिषदेदरम्यान पॉवेल यांच्यावर ‘जेरोम ‘टू लेट’ पॉवेल’ अशा शब्दांत निशाणा साधला होता. त्यामुळं आता ट्रम्प आणि त्यांच्याच देशातील सर्वोच्च बँक संस्थेमध्ये असणारे मतभेद पाहता यामध्ये नागरिकांवर आणि इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

अमेरिकी फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणता बदल केला आणि तो कशामुळे महत्त्वाचा आहे?
फेडरल रिझर्व्हने मुख्य व्याजदर 0.25% (25 बेसिस पॉईंट) नी घटवला असून, फेडरल फंड्स रेटची श्रेणी आता 3.75% ते 4.00% झाली आहे. हा सातत्याने दुसरा असा निर्णय आहे, जो नोकरी क्षेत्रातील तणाव कमी करण्यासाठी आणि आर्थिक अनिश्चितता हाताळण्यासाठी घेण्यात आला.

हा निर्णय कोणत्या समितीने घेतला आणि त्याचा मुख्य हेतू काय आहे?
जेरॉम पॉवेल यांच्या अध्यक्षतेखालील फेडरल ओपन मार्केट कमिटी (FOMC) ने हा निर्णय घेतला. मुख्य हेतू रोजगार वाढवणे आणि महागाई 2% पर्यंत आणणे असा आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाचा या निर्णयावर काय परिणाम आहे?
ट्रम्प यांच्या चीन, ब्राझिलसारख्या देशांवर नव्या आयात शुल्क वाढीच्या धोरणाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होत आहे. फेड अधिकाऱ्यांच्या मते हे अस्थायी आहे, पण ट्रम्प यांनी APEC परिषदेत पॉवेल यांच्यावर ‘जेरोम ‘टू लेट’ पॉवेल’ म्हणून टीका केली होती.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देणगी चोरीची FIR करणारे कृष्ण मोहन नवे महासचिव:IFS मधून निवृत्त झाल्यानंतर RSS मध्ये आले,...

0
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांच्या निधनानंतर सप्टेंबर 2025 मध्ये त्यांच्या जागी निवृत्त IFS कृष्ण मोहन यांना विश्वस्त बनवण्यात आले....

मुंबई राजभवन SRPF जवानाची ड्युटीवर आत्महत्या; पोलीस तपास

0
मलबार हिल येथील अत्यंत सुरक्षित आणि 'व्हीआयपी' समजल्या जाणाऱ्या राजभवन परिसरात एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. राजभवनाच्या सुरक्षेसाठी तैनात...

TMC ने EC ला 2027 पर्यंत समित्या वैध घोषित केल्या

0
नवी दिल्ली1 तासापूर्वीलिंक कॉपी कराममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) गटाने सोमवारी निवडणूक आयोगासमोर (EC) आपले सविस्तर उत्तर दाखल करत बंडखोर गटाचे...

7 जुलै रोजी वक्री बुध राशी बदलेल:5 ऑगस्टपर्यंत बुध मिथुन राशीत राहील, जाणून घ्या...

0
बुध सध्या वक्री आहे, म्हणजेच हा ग्रह मागे सरकत आहे. 7 जुलै रोजी वक्री बुध कर्क राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. 24 जुलैपर्यंत...
spot_img

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...

फरार नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाऊ शकते:युरोपियन-कोर्टात शेवटचा खटलाही हरला; गेल्या 7 वर्षांपासून...

0
फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नीरव मोदी युरोपीय मानवाधिकार न्यायालयात आपली शेवटची केसही हरला आहे. त्यामुळे...
error: Content is protected !!