Homeदेश-विदेशज्युबली हिल्स पोटनिवडणूक तमन्ना भाटिया सामंथा रकुल प्रीत सिंग फाऊंडेशन ऑफ इंडियाची...

ज्युबली हिल्स पोटनिवडणूक तमन्ना भाटिया सामंथा रकुल प्रीत सिंग फाऊंडेशन ऑफ इंडियाची बनावट मतदार ओळखपत्रे


भारत निवडणूक आयोग: महाराष्ट्रातील वातावरण मतदारयाद्यांमधील घोळावरुन तापलेलं असतानाच दुसरीकडे एका दाक्षिणात्य राज्यामध्ये चक्क अभिनेत्रींच्या नावाने खोटी मतदार ओळखपत्रं सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अभिनेत्री तमन्ना भाटिया, समंथा रूथ प्रभू आणि रकुलप्रीत सिंग यांचे फोटो असलेले बनावट मतदार ओळखपत्र सापडले असून यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आता देण्यात आले आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

नेमका कुठे घडला हा प्रकार?

हा सारा प्रकार तेलंगणातील जुबली हिल्स येथे घडला आहे. या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मात्र या निवडणुकीच्या आधीच येथे तमन्ना, समंथा आणि रकुलप्रीतचे फोटो असलेले बनावट मतदार ओळखपत्रं सापडल्याने खळबळ उडालीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण प्रकाशझोतात आल्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. विशेष म्हणजेच या तिन्ही अभिनेत्रींच्या नावावर असलेल्या मतदान ओळखपत्रावर एकच पत्ता आहे. ही सगळी ओळखपत्र एकाच कागदावर छापण्यात आली असून एकामागोमाग एक या तिघींची नावं असल्याची माहिती मिळत आहे. या एका कागदाने तेलंगणच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

कधी आणि का आहे पोटनिवडणूक?

जुबली हिल्स विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये 11 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 14 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या वर्षी जून महिन्यात येथील स्थानिक ‘भारत राष्ट्र समितीचे आमदार मागंती गोपीनाथ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक घेतली जात आहे. या मतदारसंघातून तेलंगणातील सत्ताधारी काँग्रेसने व्ही नवीन यादव यांना उमेदवार म्हणून घोषित केले होते, तर विरोधी पक्ष बीआरएसने दिवंगत आमदाराच्या विधवा मागंती सुनीता यांना उमेदवारी दिली होती. भाजपचे लंकाला दीपक रेड्डी देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

काँग्रेसवरच व्होट चोरीचा आरोप

यापूर्वी, भारत राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामा राव यांनी काँग्रेसवरच जुबली हिल्स मतदारसंघात व्होट चोरी केल्याचा आरोप केलाय. या मतदारसंघात काँग्रेसने ‘हजारो बनावट मतदार’ नोंदवल्याचा आरोप के. टी. रामा राव यांनी केला आहे. “लोक काँग्रेसवर खूप नाराज आहेत, म्हणून त्यांना माहिती आहे की त्यांना मते मिळणार नाहीत. त्यामुळेच त्यांनी प्रत्येक घराच्या पत्त्यावर अनेक खोट्या मतदारांची नोंद केली आहे. प्रत्येक घरात 43 बनावट मतं नोंदवण्यात आली आहेत. एकूण, हजारो बनावट मते नोंदवली गेली आहेत. आम्ही त्यासंदर्भातील शोध घेत असून आवश्यक त्या मार्गाने त्याचा प्रतिकार करू,” केटीआर म्हणाले. दरम्यान, बीआरएसने तेलंगणा उच्च न्यायालयात आणि ज्युबिली हिल्समध्ये बनावट मतदारांच्या आरोपावरून याचिकाही दाखल केली.

न्यायालयात काय घडलं?

बीआरएस जुबली हिल्सच्या उमेदवार मागंती सुनीता यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने, यासंदर्भात कोणत्याही निर्देशांची आवश्यकता नाही. राज्य निवडणूक आयोग आधीच मतदार यादी सुधारण्याच्या प्रक्रियेत असल्याने पुढील कोणतेही आदेश जारी करू शकत नाही, असं मत मांडत याचिकेवरील सविस्तर सुनावणी फेटाळली.

राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, बीआरएस नेत्यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आधीच प्रकरणाची पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. “बीआरएस तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही हा आरोप खोटा आहे,” असं निवडणूक आयोगाचे वकील म्हणाले. तसेच जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे राज्य निवडणूक आयोग कारवाई करेल, अशा शब्द आयोगाच्या वकीलांनी न्यायालयाला दिला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...
spot_img

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
error: Content is protected !!