Homeदेश-विदेश10 दिवस, 36 मशीन, 3520000000 रुपयांची कॅश आणि... ट्रकमधून नेला सगळा पैसा;...

10 दिवस, 36 मशीन, 3520000000 रुपयांची कॅश आणि… ट्रकमधून नेला सगळा पैसा; भारतातील सर्वात मोठी इन्कम टॅक्सची रेड


सर्वात मोठा आयकर छापा: देशभरात आणि जगात अनेक मोठे आयकर छापे पडले आहेत. भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे धाड कुठे पडले हे तुम्हाला माहिती आहे का? तब्बल दहा दिवस ही छापेमारी सुरु होती. पैसै मोजण्यासाठी 36 मशीन मागवण्यात आल्या 3520000000 रुपयांची कॅश ट्रमधून नेण्यात आली. भारतातील ही सर्वात मोठी इन्कम टॅक्सची रेड होती.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

देशातील सर्वात मोठा आयकर छापा ओडिशामध्ये पडला. बौद्ध डिस्टिलरिज प्रायव्हेट लिमिटेड या दारू उत्पादक कंपनीच्या अनेक विभागांवर छापे टाकण्यात आले. या छाप्याची तीव्रता यावरून अंदाजे येते की, आयकर विभागाने छाप्यादरम्यान जमिनीखाली गाडलेल्या मौल्यवान वस्तू शोधण्यासाठी स्कॅनिंग व्हील मशीन बसवली.

छापे टाकल्यानंतर, जप्त केलेले पैसे ट्रकमध्ये भरण्यात आले आणि कडक सुरक्षेत विभागाच्या कार्यालयात जमा करण्यात आले. 10 दिवसांच्या प्रयत्नानंतर, या छाप्यात 352 कोटी रुपये जप्त करण्यात आले. आयकर विभागाने तीन डझन नोटा मोजण्याच्या यंत्रांचीही मागणी केली.  मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्याने, नोटा मोजण्यासाठी विविध बँकांमधील कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. ही कारवाई करण्यासाठी आयकर विभागाच्या पथकांनी विविध ठिकाणी छापे टाकले. ही आयकर विभागाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जाते.आतापर्यंतचा हा सर्वात मोठा छापा होता.

त्यानंतर ऑगस्टमध्ये केंद्र सरकारने छापेमारीचे नेतृत्व करणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचा सन्मान केला, ज्यात आयकर तपास विभागाचे प्रधान संचालक एसके झा आणि अतिरिक्त संचालक गुरप्रीत सिंग यांचा समावेश होता. हा छापा केवळ आयकर विभागाच्या यशाचे प्रतीक नव्हता तर भ्रष्टाचार आणि काळ्या पैशावर सरकारच्या सततच्या कारवाईचेही प्रतीक होता.

FAQ

1 भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आयकर छापा कुठे पडला?
उत्तर: भारतातील सर्वात मोठा आयकर छापा ओडिशा राज्यात पडला. हा छापा बौद्ध डिस्टिलरिज प्रायव्हेट लिमिटेड या दारू उत्पादक कंपनीच्या अनेक विभागांवर टाकण्यात आला.

2 हा छापा किती दिवस चालला?
हा छापा तब्बल १० दिवस चालला. या कालावधीत आयकर विभागाने विविध ठिकाणी कारवाई केली.

3 या छाप्यात किती रक्कम जप्त करण्यात आली?
उत्तर: या छाप्यात ३५२ कोटी रुपये (३५२००००००० रुपये) जप्त करण्यात आले. ही रक्कम ट्रकमध्ये भरून कडक सुरक्षेत विभागाच्या कार्यालयात जमा करण्यात आली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पावसाळ्यात झाडे पडणे ही केवळ नैसर्गिक घटना नाही; ती मानवनिर्मित आपत्ती ! – सुराज्य...

0
झाडांच्या मुळांची गळचेपी करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधा’चा गुन्हा दाखल करा !  मुंबई : पावसाळ्यात वारंवार झाडे पडण्याच्या घटना या केवळ नैसर्गिक आपत्ती...

उजनी-भीमा नदी प्रदूषण : जनमानसाच्या जीवाशी हा खेळ का ?

0
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची तीन स्मरणपत्रे; कृती अहवाल कधी ? - सुराज्य अभियानाचा सवाल   उजनी जलाशय आणि भीमा नदीतील वाढते प्रदूषण हा आता लाखो नागरिकांच्या आरोग्य,...

सगळ्यांच्या ‘हो ला हो’ करतो:मी सगळ्यांना खूश करतो, माझे स्वतःचे असे व्यक्तिमत्व नाही, मला...

0
प्रश्न– मी २७ वर्षांचा आहे आणि गेल्या काही काळापासून एक विचित्र गोष्ट माझ्या लक्षात येत आहे. जेव्हा मी माझ्या कुटुंबासोबत असतो, तेव्हा एका...

कॉमेडियन म्हणाला- डॉक्टर बनून महिलांचे अवयव बघेन:पोलिसवाला बनायचं नाही, बाबू गप्पीने पोस्ट केला आक्षेपार्ह...

0
प्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर बाबू गप्पी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यामध्ये ते महिलांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलत...
spot_img

सगळ्यांच्या ‘हो ला हो’ करतो:मी सगळ्यांना खूश करतो, माझे स्वतःचे असे व्यक्तिमत्व नाही, मला...

0
प्रश्न– मी २७ वर्षांचा आहे आणि गेल्या काही काळापासून एक विचित्र गोष्ट माझ्या लक्षात येत आहे. जेव्हा मी माझ्या कुटुंबासोबत असतो, तेव्हा एका...

कॉमेडियन म्हणाला- डॉक्टर बनून महिलांचे अवयव बघेन:पोलिसवाला बनायचं नाही, बाबू गप्पीने पोस्ट केला आक्षेपार्ह...

0
प्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर बाबू गप्पी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यामध्ये ते महिलांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलत...

ई-रिक्षाला रस्त्यात थांबवणारे मोबाईल ॲप बॅन:चीनी कंपनीच्या ॲपचा गैरवापर होत होता, ब्लूटूथद्वारे कनेक्ट होत...

0
दिल्लीतील ई-रिक्षा चालकांना सध्या एका विचित्र समस्येचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर चालत असताना अचानक ई-रिक्षा बंद पडतात आणि पुन्हा सुरू होत नाहीत....

सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ | सोने रु. 1.46 लाख, चांदी रु. 2.33 लाख

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआज 3 जुलै रोजी सोने-चांदीच्या दरात सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार,...
error: Content is protected !!