सांस्कृतिक : एकदाशी 2025: देव माझा विठू सावळा
माळ त्याची माझिया गळा…
विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी,
भीमेच्या काठी डुले भक्तीचा माळ
साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबर
कंठात तुळशीची हार, कस्तुरी टिळा
भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो
रांगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा…
दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकदाशी तिथीला देवशयनी किंवा आषाढी एकादशीचा उत्सव असतो. हा दिवस भगवान विष्णूला समर्पित असून महाराष्ट्रात विष्णूचे अवतार विठ्ठलाची आराधना करण्यात येते. हिंदू धर्मात हा दिवस अतिशय शुभ मानला गेला आहे. आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू योगिनीद्रामध्ये जातात. कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे चार महिने ते या अवस्थेत असतात. त्यामुळे या काळाला चातुर्मास असं म्हणतात. या चार महिन्यात शुभ कार्य करण्यात येत नाही. अशी ही एकादशी यंदा 5 की 6 जुलै नेमकं कधी आहे. शुभ मुहूर्त, पूजा साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या.
देवशयनी किंवा आषाढी एकादशी कधी?
देवशयनी एकादशी दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी करण्यात येते. हिंदू पंचांगानुसार एकादशी तिथी 05 जुलैला संध्याकाळी 06:01 वाजेपासून 06 जुलैला रात्री 09:17 वाजेपर्यंत असणार आहे. हिंदू धर्मात उदय तिथीनुसार सण साजरा करण्यात येतो. त्यामुळे देवशयनी एकादशीचे व्रत 06 जुलै रविवारी असणार आहे.
देवशयनी एकादशीच्या पूजेची वेळ
ब्रह्म मुहूर्त – सकाळी 04:08 ते 04:49
अभिजित मुहूर्त – दुपारी 11:58 ते 12:54
विजय मुहूर्त – दुपारी 02:45 ते 03:40
गोधूलि मुहूर्त – संध्याकाळी 07:21 ते 07:42
अमृत काल – दुपारी 12:51 ते 02:38
त्रिपुशकर योग – रात्री 09:14 ते 10: 4
रवि योग – सकाळी 05:56 ते रात्री 10:42
एकादशी उपवास सोडण्याचा शुभ मुहूर्त
पंचांगानुसार देवशयनी एकादशीचा उपवास 7 जुलैला सकाळी 05:29 ते 08:16 पर्यंत सोडता येणार आहे. या दिवशी द्वादशी तिथी रात्री ११:१० वाजता संपेल, म्हणून सकाळी व्रत सोडणे शुभ मानले जाते.
पूजा साहित्य
विठ्ठल रुक्मिणी मूर्ती
पाणी
पंचॅम्रिट
चंदन आणि हळद मिश्रित पाणी
हळद कुंकू
अष्टगंधा
बुक्का
तुळशी पत्र
नवीन कपडे
5 फळं
विडाचे पान
सुपारी
तांदूळ
गुलाब फळ
केळी
धूप
कापूर
अशी करा घरच्या घरी पूजा !
आषाढी एकादशीला संपूर्ण दिवस उपवास असतो. सकाळी उठल्यावर स्नान करुन घरातील देवाची पूजा करा. त्यानंतर विठुराच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घाला. आता स्वच्छ कपड्याने मूर्ती पुसून तिला अष्टगंध आणि बुक्का लावा. विठुरायाला नवीन वस्त्र परिधान करा आणि हार घाला. उपवासाच्या पदार्थांचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवा. विठुरायाची आरती करा. आषाढी एकादशीला तुळस तोडू नयेत. पण आदल्या दिवशी तुळस तोडून ठेवा आणि ती विठुरायाला अर्पण करावी.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. शिवतेज न्यूज या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





























