Homeमहाराष्ट्रराज्यात गरीब, दुर्लक्षित समाजावर अन्याय: जयंत पाटील यांचा आरोप; देवेंद्र फडणवीस सरकारचे...

राज्यात गरीब, दुर्लक्षित समाजावर अन्याय: जयंत पाटील यांचा आरोप; देवेंद्र फडणवीस सरकारचे आर्थिक संतुलन पूर्णतः ढासळल्याचा दावा

महाराष्ट्र (मुंबई) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले आहे. परिणामी, राज्यात गरीब व दुर्लक्षित घटकांवरील अन्याय वाढला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी केला.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 57 हजार 509 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. त्यावरून माजी अर्थमंत्री तथा शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. ते सरकारला धारेवर धरत म्हणाले, सरकारला आता अर्थसंकल्पाचे संतुलन राखणे अवघड झाले आहे. त्यामुळे राज्यावरील आर्थिक बोजा वाढला आहे. सद्यस्थितीत राज्याचे आर्थिक संतुलन पूर्णतः ढासळले आहे. यामुळे राज्यातील गरिबांवर, दुर्लक्षित समाजावर अन्याय होत आहे.

एसटी, एससी, ओबीसी यांच्यावर होणारा खर्च कागदावर दाखवला जातो हे 31 मार्चला कळते. पण प्रत्यक्षात त्यावर काहीच पैसा खर्च झाला नाही. तीच पुनरावृत्ती यंदा हे सरकार करत आहे.

सरकारने अजून एक विक्रम रचला

जयंत पाटील पुढे म्हणाले, चालू आर्थिक वर्षात मांडलेल्या अर्थसंकल्पात सरकारने एक विक्रम केल्याचा उल्लेख मी केला होता. त्यावेळी महसुली तूट ही 45 हजार 891 कोटी रुपयांची होती. राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आज पुन्हा पुरवणी मागण्या माडल्या. त्या 57 हजार 509 कोटींच्या आहेत. सरकारचे बहुमत असल्यामुळे या मागण्या मंजूर होतील. त्यावेळी सरकारला 1 लाख 3 हजार 400 कोटी कमी पडणार आहेत. पूर्वीच्या व आताच्या पुरवणी मागण्या मिळून सरकारने अजून एक विक्रम रचला आहे. पुरवणी मागण्या मांडायच्या आणि ते पैसे खर्च करायचे नाही असा प्रकार या सरकारने सुरू केला आहे.

यापुढे हिवाळी अधिवेशन येणार आहे. त्यानंतर पुढचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी आणखी एक पुरवणी मागणी येणार. याचा अर्थ हे सरकार राज्याची महसुली तूट दीड किंवा 2 लाख कोटींपर्यंत पोहोचवेल. याचा अर्थ असा की, सरकारला सर्व आकडे कागदावर दाखवणे आवश्यक आहे. अन्यथा ज्यांच्याकडून पैसे घेतले आहेत किंवा ज्यांचे देणे बाकी आहे, असे लोक एकतर आत्महत्या करतील अन्यथा यांच्या मागे लागतील. त्यामुळे सरकारने राज्याच्या अर्थकारणामध्ये एवढ्या मोठ्या तुटीपर्यंत पोहोचण्याचे धाडस केले आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

मेंटल हेल्थ- पती खूप पझेसिव्ह:प्रत्येक सेकंदाला विचारतो– ‘कुठे आहेस’; खूप श्वास गुदमरतो, वाटते हे...

0
प्रश्न– माझा पार्टनर (पती) माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो खूप पझेसिव्ह (अधिकार गाजवणारा) देखील आहे. प्रत्येक वेळी त्याला हे जाणून घ्यायचे असते...

जनाब उद्धव ठाकरे रामरक्षा नव्हे, पक्षरक्षा करत आहेत:रामरक्षा आंदोलनावरून नवनीत राणांची टीका, 18 जुलैला...

0
अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी पेटीत झालेल्या कथित चोरीच्या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता नागपुरात १८ जुलै रोजी 'रामरक्षा...

विकी कौशलने कतरिना कैफसोबतचा वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअभिनेत्री कतरिना कैफने गुरुवारी आई झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचे पती आणि अभिनेता विकी कौशलने सोशल...

पंतप्रधानांच्या चंदीगड दौऱ्याचे मोमेंट्स:मोदींच्या स्टेजवर काँग्रेस खासदार; उद्घाटन शिलालेखावर मुख्यमंत्री मान यांचे नाव; मुलाच्या...

0
हरियाणातील जिंद येथे देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी चंदीगड आणि पंजाब दौऱ्यावर पोहोचले. चंदीगडमध्ये पंतप्रधानांनी 4700 कोटी रुपयांच्या...
spot_img

मेंटल हेल्थ- पती खूप पझेसिव्ह:प्रत्येक सेकंदाला विचारतो– ‘कुठे आहेस’; खूप श्वास गुदमरतो, वाटते हे...

0
प्रश्न– माझा पार्टनर (पती) माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो खूप पझेसिव्ह (अधिकार गाजवणारा) देखील आहे. प्रत्येक वेळी त्याला हे जाणून घ्यायचे असते...

विकी कौशलने कतरिना कैफसोबतचा वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअभिनेत्री कतरिना कैफने गुरुवारी आई झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचे पती आणि अभिनेता विकी कौशलने सोशल...

चायना मूनशॉट AI किमी K3 लाँच

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराचीनी कंपनी मूनशॉट एआयने (AI ने) आपले नवीन एआय मॉडेल किमी K3 सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे...

देशात लवकरच प्लास्टिक नोटा चलनात येतील, आरबीआयIने निविदा जारी केली:₹10 आणि ₹20 च्या नोटांपासून...

0
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच देशात प्लास्टिक म्हणजेच पॉलिमरपासून बनवलेल्या नोटांचा पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशात नवीन पिढीचे चलन...
error: Content is protected !!