Homeमहाराष्ट्रपंढरपूर नगरपालिका आशिधी युद्धाच्या पार्श्वभूमीवर भक्तांसाठी नियमांचे नियम जारी करतात

पंढरपूर नगरपालिका आशिधी युद्धाच्या पार्श्वभूमीवर भक्तांसाठी नियमांचे नियम जारी करतात

महाराष्ट्र : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर पालिकेने स्वच्छतेच्याबाबतीत आक्रमक प्रवित्रा घेतला आहे. आषाढी वारीच्या दिवसांमध्ये पंढरपुरात रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर लघुशंका आणि शौचास बसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा पालिकेकडून इशारा देण्यात आला आहे.  पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी ही माहिती दिली आहे. आषाढी सोहळ्यासाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांचे आरोग्य चांगले रहावे त्यासोबतच आपले शहर स्वच्छ राहावे यासाठी सर्व भक्तांनी आणि शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पालिकेने केले आहे.

आषाढी वारी सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात येत असतात.  या सोहळ्यानिमित्त भाविकांचे, वारकऱ्यांचे दशमी, एकादशी व व्दादशी असे तीन दिवस पंढरपुरात वास्तव्य असते. त्यामुळे पंढरपुरात आलेल्या वारकरी, भाविकांचे या तीन दिवसांमध्ये आरोग्य चांगले राहणे गरजेचे आहे. यासाठी पंढरपूर नगरपालिका स्वच्छता मोहीम राबवत आहे. आषाढी वारीच्या वेळी शहरातील नागरिक, दुकानदार, व्यावसायिक, मठधारक, किरकोळ विक्रेते हे रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे, तसेच उघड्यावर लघुशंका करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर विधी करतात. जर असे करताना आढळले तर आता पालिका त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार आहे.

पंढरपूर नगरपरिषदेकडून नागरिकांना आवाहन

पंढरपूर नगरपरिषदेने जाहीर केलेल्या सूचनेद्वारेकेंद्र शासनाच्या अधिसूचना क्रमांक एस.ओ.1357 (3) नुसार घनकचरा व्यवस्थापन नियम लागू केले आहेत. या नियमांची अंमलबजावणी शहरांमध्ये प्रभावीपणे चालू आहे. दंड वसूल करण्यासाठी आरोग्य निरीक्षक, मुकादम, प्राधिकृत केलेले कर्मचारी यांना अधिकार देण्यात येत आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर नगरीत वारकरी, भाविक यांनीही कचरा कोठेही रस्त्यावर टाकू नये. नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या जवळपासच्या कचराकुंड्यामध्येच कचरा टाकावा, असे आवाहन महेश रोकडे यांनी येणाऱ्या भाविकांना आणि शहरातील नागरिकांना केलं आहे.

असा असेल दंड

रस्त्यावर कचरा टाकणे – 180 रुपये दंड

कचरा जाळणे – 5 हजार रुपये दंड

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे- 150 रुपये दंड

उघड्यावर लघुशंका करणे – 1 हजार रुपये दंड

उघड्यावर शौच करणे – 500 रुपये दंड

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

विकी कौशलने कतरिना कैफसोबतचा वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअभिनेत्री कतरिना कैफने गुरुवारी आई झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचे पती आणि अभिनेता विकी कौशलने सोशल...

पंतप्रधानांच्या चंदीगड दौऱ्याचे मोमेंट्स:मोदींच्या स्टेजवर काँग्रेस खासदार; उद्घाटन शिलालेखावर मुख्यमंत्री मान यांचे नाव; मुलाच्या...

0
हरियाणातील जिंद येथे देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी चंदीगड आणि पंजाब दौऱ्यावर पोहोचले. चंदीगडमध्ये पंतप्रधानांनी 4700 कोटी रुपयांच्या...

चायना मूनशॉट AI किमी K3 लाँच

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराचीनी कंपनी मूनशॉट एआयने (AI ने) आपले नवीन एआय मॉडेल किमी K3 सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे...

गिलगिट-बाल्टिस्तानला 5वे राज्य बनवण्याच्या तयारीत पाकिस्तान:विधानसभेत ठराव मंजूर, संसदेकडून घटनादुरुस्तीची मागणी

0
पाकिस्तानने आपल्या बेकायदेशीर ताब्यात असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानला देशाचे पाचवे राज्य बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गुरुवारी गिलगिट-बाल्टिस्तान विधानसभेने एकमताने ठराव मंजूर करून केंद्र सरकारला...
spot_img

विकी कौशलने कतरिना कैफसोबतचा वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअभिनेत्री कतरिना कैफने गुरुवारी आई झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचे पती आणि अभिनेता विकी कौशलने सोशल...

चायना मूनशॉट AI किमी K3 लाँच

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराचीनी कंपनी मूनशॉट एआयने (AI ने) आपले नवीन एआय मॉडेल किमी K3 सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे...

देशात लवकरच प्लास्टिक नोटा चलनात येतील, आरबीआयIने निविदा जारी केली:₹10 आणि ₹20 च्या नोटांपासून...

0
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच देशात प्लास्टिक म्हणजेच पॉलिमरपासून बनवलेल्या नोटांचा पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशात नवीन पिढीचे चलन...

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...
error: Content is protected !!