Homeमनोरंजनविश्वस कुमार रमेश सारख्या विमान अपघातात अमीया फ्लाइट 2933 पासून जिवंत असलेले...

विश्वस कुमार रमेश सारख्या विमान अपघातात अमीया फ्लाइट 2933 पासून जिवंत असलेले 3 फुटबॉल खेळाडू


एअर प्लेन अपघात: अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या बोइंग 787 ड्रीमलाइनर विमानाचा गुरुवारी भीषण अपघात झाला. या विमानातील जवळपास 242 पैकी 241 प्रवाशांचा या विमान अपघातात मृत्यू झाला. मात्र या भयंकर विमान अपघातातून फक्त एक प्रवासी विश्वास कुमार रमेश हा बचावला. विमान अपघात झाल्यावर ज्या प्रकारे आगीचे लोट दिसले त्यानंतर या भयावह अपघातातून विश्वास कुमार रमेश यांचं वाचणं हा चमत्कारच म्हणावा लागेल. काही वर्षांपूर्वी अशाच एका विमान अपघातातून 3 खेळाडू बचावले होते, त्यांचं जिवंत राहणं हे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नव्हतं.

2016 रोजी झाला होता अपघात :

आम्ही त्या भयंकर विमान अपघाताबाबत बोलत आहोत जो 2016 रोजी झाला होता. विमान 28 नोव्हेंबर 2016 रोजी कोलंबियाच्या मेडेलिनजवळ क्रॅश झालं होतं. लामिया फ्लाइट 2933 असं हे विमान होतं ज्यातून 77 प्रवासी प्रवास करत होते. अपघातात यामधून केवळ 6 प्रवासी बचावले तर 71 प्रवाशांचा मृत्यू झाला. हे विमान ब्राजील फुटबॉल क्लब चापेकोएन्स संघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बोलिव्हियातील सांताक्रूझ डे ला सिएरा येथून मेडेलिनला घेऊन जात होते. या संघाला 2016 ची कोपा सुदामेरिकाना फायनल खेळायची होती. या विमान अपघातातूनबचावलेल्या 6 लोकांमध्ये एक कॅबिन क्रू, तीन खेळाडू आणि दोन सामान्य प्रवाशांचा समावेश होता. या विमानातून 21 पत्रकार सुद्धा प्रवास करत होते.

साओ पाउलोहून उड्डाण करणारे विमान मेडेलिनला पोहोचेपर्यंत सर्व काही ठीक होते. 22: 15 वाजता मेडेलिनजवळ विमानाचा ग्राउंड कंट्रोलर्सशी संपर्क तुटला. पायलटने विद्युत समस्या नोंदवली होती, परंतु मदत पोहोचेपर्यंत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. विमान एका डोंगराळ भागात कोसळेल. हा अपघात एवढा भीषण होता की 100 मीटर परिसरात या अपघातग्रस्त विमानाचा कचरा पसरलेला होता.

हेही वाचा : गौतम गंभीर इंग्लंड दौरा सोडून तडकाफडकी भारतात परतला, नेमकं काय घडलंय?

3 फुटबॉलपटूंचा वाचला होता जीव :

2016 जेव्हा हा विमान अपघात झाला त्यानंतर 29 नोव्हेंबरला 2 वाजायच्या सुमारास एक व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ज्याचं नाव ऍलन रसेल असं होतं आणि तो चापेकोएन्स संघातील एक सदस्य होता. या अपघातातून वाचलेले अजून दोन खेळाडू नेटो आणि गोलकीपर जॅक्सन फॉलमन होते. यातील जॅक्सन फॉलमन हा वाचला खरा मात्र त्याच्या पायाला दुखापत झाली होती.

नीटो: फुटबॉलपटू नेटो हा अपघातातून बचावला मात्र बरेच दिवस त्याच्यावर उपचार सुरु होते आणि तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली होता. याच्या छातीवर डोक्यावर आणि फुफुसांना गंभीर दुखापत झाली होती. नेटोने यानंतर फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आणि सध्या तो चापेकोएन्स टीममध्ये अधीक्षक म्हणून काम करत आहे.

ऍलन रसेल : विमान प्रवासातून बचावलेल्या ऍलन रसेलच्या मणक्याची सर्जरी झाली. त्याला अपघातानंतर खूपच गंभीर स्थितीमध्ये हॉस्पिटलला नेण्यात आलं होतं. तो सध्या जुवेंट्यूडसाठी लेफ्ट बॅक म्हणून खेळतो.

जॅक्सन फॉलमन : जॅक्सन फॉलमन हा या अपघातातून वाचला खरा मात्र त्यात त्याच्या एका पाया गंभीर दुखापत झाल्याने त्याचा पाय कापण्यात आला.  तो सध्या पॅरा फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न करत आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

ढोल-ताशा परंपरेच्या संवर्धनासाठी नियमांची अंमलबजावणी आवश्यक:परिमंडळ 1 चे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांचे मत

0
ढोल-ताशा वादनाची परंपरा आता जागतिक स्तरावर पोहोचली आहे. या कलेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी काही नियमांची अंमलबजावणी आवश्यक आहे. तरच अधिकाधिक युवकांना या...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...

Itel A100 Pro लाँच भारतात

0
नवी दिल्ली7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक ब्रँड आयटेलने भारतात नवीन बजेट स्मार्टफोन 'आयटेल A100 प्रो' लॉन्च केला आहे. हा या वर्षी फेब्रुवारीमध्ये आलेल्या A100...

व्हिएतनाममध्ये 15 भारतीयांच्या मृत्यूनंतर बोट-कॅप्टनला अटक:कंपनीच्या रिवॉर्ड ट्रिपवर पर्यटक गेले होते; कुटुंबांना टीव्हीवरून बातमी...

0
व्हिएतनाममध्ये शनिवारी पर्यटकांची स्पीडबोट उलटल्याने 15 भारतीयांच्या मृत्यूनंतर स्पीडबोट कॅप्टनला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार,...
spot_img

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...

Itel A100 Pro लाँच भारतात

0
नवी दिल्ली7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक ब्रँड आयटेलने भारतात नवीन बजेट स्मार्टफोन 'आयटेल A100 प्रो' लॉन्च केला आहे. हा या वर्षी फेब्रुवारीमध्ये आलेल्या A100...

भारतातील महागाईचा दर जूनमध्ये ४.३८ टक्क्यांवर; अन्नाच्या किमती वाढतात

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशातील किरकोळ महागाईचा वेग पुन्हा वाढला आहे. जूनमध्ये ती वाढून 4.38% वर पोहोचली आहे, जी मे महिन्यात 3.93% होती....

राहुल द्रविड इंग्लंड कसोटी संघाचे प्रशिक्षक बनू शकतात:अँडी फ्लॉवर, फ्लिंटॉफ आणि लँगर यांच्या नावांवरही...

0
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडच्या कसोटी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आहेत. ब्रेंडन मॅक्युलमने पद सोडल्यानंतर ECB (इंग्लंड अँड वेल्स...
error: Content is protected !!