Homeमहाराष्ट्रअहमदाबाद विमान अपघातात अपघातात एअर इंडिया फ्लाइटमध्ये ठार झालेल्या नागपूर कुटुंबातील १...

अहमदाबाद विमान अपघातात अपघातात एअर इंडिया फ्लाइटमध्ये ठार झालेल्या नागपूर कुटुंबातील १ 17१ महाराष्ट्र


अहमदाबाद विमान अपघात: अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानात नागपूरमधील कुटुंब ठार झालं आहे. नागपुरात माहेर असलेल्या यशा कामदार मोढा (कामदार माहेरचे आडनाव आहे) आणि त्यांचा मुलगा रुद्र मोढा हेदेखील दुर्घटनाग्रस्त विमानात होते. याशिवाय यशा मोढा यांच्या सासू रक्षा मोढा यादेखील होत्या. नागपुरातील क्वेटा कॉलनी येथील रामपेठ येथे  कामदार कुटुंब वास्तव्यास आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच सर्व कुटुंब घरातून तातडीने निघून गेलं आहे.

अहमदाबादहून लंडन गॅटविकला दुपारी 1.38 वाजता निघालेले हे विमान, बोईंग 787-8 होते. विमानात 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते, ज्यामधील 2 पायलट आणि 10 क्रू मेम्बर्स होते. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वच्या सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

विमानातील प्रवाशांची यादी समोर आली असून, यादीत मयूर अशोक पाटील, महादेव पवार आणि आशाबेन पवार ही मराठी नावं दिसत आहे. नावांवरुन हे सर्व महाराष्ट्रातील असावं असं दिसत आहे, मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

क्रू मेम्बर्समध्ये सुनील तटकरेंच्या भाचेसून

एअर इंडियाच्या AI171 विमानात एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते. यापैकी 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक आहेत. या विमानात महाराष्ट्रातीलही प्रवासी होते. दरम्यान विमान दुर्घटनेत राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नातेवाईकाचाही समावेश आहे. अपर्णा महाडिक एअर इंडियाच्या विमानात क्रू मेम्बर होत्या. त्या सुनील तटकरे यांच्या भाचेसून म्हणजेच भाच्याच्या पत्नी आहेत.

नेमकं काय झालं?

अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान मेघानी नगरमध्ये दुर्घटनाग्रस्त झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच दुर्घटनाग्रस्त झालं. हे विमान दिल्लीमधून अहमदाबादला पोहोचलं होतं आणि तेथून लंडनला रवाना होणार होतं. या दुर्घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री विजय रुपानीदेखील या विमानात होते.

एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) नुसार, विमानाने रनवे क्रमांक 23 वरून दुपारी 1.39 वाजता उड्डाण केले. त्यानंतर, विमानाने ताबडतोब एटीसीला मे डेचा संदेश दिला. या संदेशाचा अर्थ असा की विमानात आपत्कालीन परिस्थिती आहे. यानंतर, एटीसीने विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. रनवे क्रमांक 23 वरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

निवडणूक संपताच सरकार मस्तीत आलंय:लाडकी बहीण- कर्जमाफीतून लाखो लोकांना वगळण्याचे सरकारचे पाप- विजय वडेट्टीवार

0
निवडणूक तोंडावर असताना सरकारने 'लाडकी बहीण' योजनेसाठी कोणत्याही अटी-शर्ती लावल्या नाहीत. मात्र, आता निवडणूक संपताच हे सरकार पूर्णपणे मस्तीत आले असून, विविध जाचक...

युधिष्ठिराची द्रौपदीला शिकवण:जीवनातील समस्या कधीही पूर्णपणे संपत नाहीत, आपण परिस्थितींमध्येही संतुलन राखायला शिकले पाहिजे

0
महाभारतात पांडवांचा वनवास काळ चालू होता. त्यावेळी त्यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते. कधी जेवणाची चिंता असे, कधी राहण्याची, तर कधी येणाऱ्या आव्हानांची चिंता...

राहुल द्रविड इंग्लंड कसोटी संघाचे प्रशिक्षक बनू शकतात:अँडी फ्लॉवर, फ्लिंटॉफ आणि लँगर यांच्या नावांवरही...

0
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडच्या कसोटी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आहेत. ब्रेंडन मॅक्युलमने पद सोडल्यानंतर ECB (इंग्लंड अँड वेल्स...

नवीन मतदाराला द्यावा लागेल पालकांच्या SIR चा तपशील:आतापर्यंत फक्त जुन्या मतदारांना लागू होते; EC...

0
निवडणूक आयोगाने मतदार यादीत नाव नोंदवू इच्छिणाऱ्या नवीन अर्जदारांसाठीही नवीन नियम लागू केला आहे. आता फॉर्म-6 भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करू इच्छिणाऱ्या...
spot_img

राहुल द्रविड इंग्लंड कसोटी संघाचे प्रशिक्षक बनू शकतात:अँडी फ्लॉवर, फ्लिंटॉफ आणि लँगर यांच्या नावांवरही...

0
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडच्या कसोटी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आहेत. ब्रेंडन मॅक्युलमने पद सोडल्यानंतर ECB (इंग्लंड अँड वेल्स...

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...
error: Content is protected !!