Homeमहाराष्ट्रPune Warriors Beat Raigad Royals WMPL 2025 Samruddhi Sweta Cricket Win |...

Pune Warriors Beat Raigad Royals WMPL 2025 Samruddhi Sweta Cricket Win | पुणे वॉरियर्सचा रायगड रॉयल्सवर 4 गडी राखून विजय: श्वेता माने-अनुजा पाटीलच्या अर्धशतकी भागीदारीने अंतिम फेरीत प्रवेश – Pune News

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग(डब्लूएमपीएल) 2025 स्पर्धेत पाचव्या दिवशी आठव्या लढतीत समृद्धी डाळे(नाबाद १० व २-१८)हिने केलेल्या अष्टपैलू खेळीसह श्वेता माने नाबाद ३७धावांच्या खेळीच्या जोरावर पुणे वॉरियर्

?

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पुणे वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या पुणे वॉरियर्स संघाने रायगड रॉयल्सवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. रायगड रॉयल्स संघाने पहिल्यांदा खेळताना २०षटकात ९बाद ११६धावा केल्या. सलामवीर भाविका आहिरेने २७ चेंडूत ५चौकार व १ षटकाराच्या मदतीने ३३धावा, तर श्रावणी देसाईने ३१ चेंडूत २षटकारासह २७ धावा केल्या. या सलामीच्या जोडीने ४२ चेंडूत ४२ धावांची भागीदारी केली. या दोघेही बाद झाल्यावर कर्णधार किरण नवगिरे २१ धावा काढून तंबूत परतली. त्यानंतर रायगड रॉयल्सची विकेटची गळती सुरूच राहिली. एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही. पुणे वॉरियर्सकडून समृद्धी डाळे(२-१८), अक्षया जाधव(२-२३) यांनी प्रत्येकी दोन गडी, तर चिन्मयी बोरफळे(१-१५)ने एक गडी बाद केला.

११६ धावांचे आव्हान पुणे वॉरियर्स संघाने १९.४ षटकात ६बाद ११७धावा करून पूर्ण केले. वरच्या फळीतील फलंदाज सुहानी कहांडळ(८), ख़ुशी मुल्ला(३), अक्षया जाधव(१), श्वेता सावंत(१०), वैष्णवी शिंदे(५) हे झटपट बाद झाल्यामुळे निम्मा संघ तंबूत परतला. पुणे संघ ८.४ षटकात ५ बाद ३२ अशा स्थितीत असताना कर्णधार अनुजा पाटीलने २६चेंडूत २चौकारासह २८धावांची संयमी खेळी केली. अनुजा व श्वेता माने ४१चेंडूत ५३ धावांची भागीदारी करून संघाची धावगती वाढवली. हि भागीदारी रंगत असताना अनुजा पाटील धावबाद झाली. प्रज्ञा वीरकरने दिलेल्या थ्रोवर रोशनी पारधीने चोरटी धाव घेत असताना तिला धावबाद केले. श्वेता मानेने ३२चेंडूत २चौकारासह नाबाद ३७ धावांची खेळी करून संघाचा विजय सुकर केला. श्वेता व समृद्धी डाळे(नाबाद १०) यांनी सातव्या विकेटसाठी २६चेंडूत ३२ धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक

रायगड रॉयल्स:२०षटकात ९बाद ११६धावा(भाविका आहिरे ३३(२७,५x४,१x६),श्रावणी देसाई २७(३१,२x६), किरण नवगिरे २१, समृद्धी डाळे २-१८, अक्षया जाधव २-२३, चिन्मयी बोरफळे १-१५)पराभुत वि.पुणे वॉरियर्स:१९.४ षटकात६बाद ११७धावा(अनुजा पाटील २८(२६,२x४),श्वेता माने नाबाद ३७(३२,२x४), किरण नवगिरे २-१६,यशोदा घोगरे २-१६, प्रज्ञा वीरकर १-३३); |

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

राममंदिर ट्रस्टविरोधात कल्याणमध्ये काँग्रेस आक्रमक:रघुपति राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन; दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप कल्याण शहर जिल्हा काँग्रेसने केला आहे. याप्रकरणी 'श्री रामजन्मभूमी...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...
spot_img

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...

झिरोधाच्या संस्थापकाने सांगितले आशेचे सूत्र:आशा म्हणजे परिणाम काहीही असो, तुम्ही पुढचे पाऊल टाकणे कधीच...

0
माझ्यासाठी, आशेचा अर्थ फक्त 'सर्व काही ठीक होईल' असा विचार करणे नाही. आशा तेव्हाच सामर्थ्य बनते, जेव्हा तिच्यासोबत कोणतीही समस्या सोडवण्याचा स्पष्ट उद्देश...
error: Content is protected !!