Homeमहाराष्ट्र'कालच उद्धव ठाकरे, संजय राऊत माझ्याशी बोलले; रेकॉर्ड दाखवलं तर...', पक्षातून हकालपट्टीनंतर...

‘कालच उद्धव ठाकरे, संजय राऊत माझ्याशी बोलले; रेकॉर्ड दाखवलं तर…’, पक्षातून हकालपट्टीनंतर काय म्हणाले बडगुजर?


सुधाकर बॅडगुझर: पक्षविरोधी कार्य केल्याबद्दल शिवसेनेचे उपघटनेते सुधाकर बडगुजर यांना पक्षातून हकलपट्टी करण्यात आली आहे. सुधाकर बडगुजर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्या नाशिक शहरातून बाहेर असल्याचा सांगण्यात येत होते. सुधाकर बडगुजर आऊट ऑफ रेंज होते. मात्र सुधाकर वडगुजर यांच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळतेय. दरम्यान आज घडलेल्या सर्व प्रकारावर सुधाकर बडगुजर यांनी आपली भूमिका मांडली आहे. काय म्हणाले बडगुजर? सविस्तर जाणून घेऊया.

प्रवासात असतांना मला माहिती मिळाली. खरं बोलणं, आणि नाराजी व्यक्त करणे तर तो मी गुन्हा केलेला आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. यापूर्वी माझ्यावर हकालपट्टीची कारवाई झाली नव्हती. पहिल्यांदाच कारवाई झाल्याचे सुधाकर बडगुजर म्हणाले.

प्रश्न प्रलंबित असल्याने मी मुख्यमंत्र्यांना भेटलो

निर्णय झाल्यानंतर माझ्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. पक्षाच्या विरोधात मी काम केलं असेल तर दाखवावे. विलास शिंदेंच्या कार्यक्रमाला सगळे गेले. मी गिरीश महाजन यांच्या शेजारी उभा राहिलो म्हणून फोटो आला. त्यामुळे कारवाई केली. महाजन होते तेव्हा अरविंद सावंत होते, प्रमुख नेते होते त्यांनी बोलायला पाहिजे होते. गिरीश महाजन काय बोलले आम्हाला माहिती नाही. लग्नात कोणी राजकीय बोलत नाही.केलेल्या कारवाईवर मी नाराज नाही. मी पक्षविरोधी काय काम केलं हे दाखवा. कोरोना काळात काम केलं, रक्तदान शिबिर घेतले, शाखा उद्घाटन केलं. कार्यालयात काम केलं, संघटना बांधणीसाठी काम केलेले असतांना कारवाइ केल्याचे बडगुजर म्हणाले. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यामुळे पक्षात वादळ निर्माण झाले. अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. याबद्दल पक्षाच्या नेतृत्वाला मी ते सांगितले होते. आज मी पत्रकार परिषदेला नव्हतो हेदेखील मी सांगितले होते. बडगुजर हा पक्ष नाही ते बरोबर बोलले. मी संघटनेला बाधा येईल असे वाक्य दाखवलं तर संन्यास घेईन, असेही यावेळी ते म्हणाले.

राऊत यांच्या मनात भीती आली

संजय राउतांनी मेसेज केला आणि मीपण त्यांना रिप्लाय केला.माझी हकालपट्टी केली ठीक पण शिवसैनिकांना कळू द्या. काल माझ्याशी उद्धव ठाकरे, संजय राऊत बोलले. त्याचे माझ्याकडे रेकॉर्ड आहे. मी दाखवलं तर वेगळं होईल. पण मी ते दाखवणार नाही. राऊत यांच्यासोबत माझे ऋणानुबंध आहेत. मुख्यमंत्री यांना भेटून मी चूक केली नाही पण राऊत यांच्या मनात भीती आली. कटकारस्थान कुठं झालं माहिती नाही. निर्णय घ्यायचा होता तो त्यांनी घेतला. ठाकरे कुटुंब एकदा निर्णय घेतला की मागे घेत नाही आणि मागे घेऊही नये असे मला वाटतं. पत्रकार परिषदेला नव्हतो म्हणून माझी हकालपट्टी झाल्याचे ते म्हणाले.

कारवाई केली याची खंत

सीमा हिरेंनी थयथयाट करण्याचे कारण नाही. वादळ येण्यापूर्वी लाटा मोजायचे कारण नाही. अन्याय झाला आहे तो जनतेसमोर यावा. मी गटबाजी मोडीत काढलेली होती. मला माझा मानसन्मान मिळत होता. पक्षात माझा कुणी अनादर केला नाही. त्यामुळे कारवाई केली याची खंत आहे. ज्यावेळेस डी जी सूर्यवंशी नेमणूक झाली तेव्हा विलास शिंदे नाराज होते. विलास शिंदेंला जिल्हाप्रमुख करायला पाहिजे होते हे डिजीला मान्य होते. शहरप्रमुख डिजीला द्यायला पाहिजे होते. विलास शिंदे नाराज यांच्यात तथ्य असल्याचे ते म्हणाले.

‘जेव्हा विश्लेषण करायच तेव्हा करेन’

मला सांगितलं असतं तर मी राजीनामा दिला असता. हकालपट्टी करून माझी बदनामी केली. मला जवळ बोलून सांगायला हवे होते. अचानक निर्णय घेतला. उपनेते पद मी मागितले नव्हते. मी फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो. बंद दाराआड चर्चा केली नाही. आता सर्वांशी बोलून मी निर्णय घेईन. तुमच्याशी बोलून रिलॅक्स झालोय. शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका मांडावी. जेव्हा विश्लेषण करायच तेव्हा करेन, असेही ते यावेळी म्हणाले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन:वारकरी, शेकऱ्यांना सुखी ठेव; देवेंद्र फडणवीसांचे विठुराया चरणी...

0
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आषाढी वारीमध्ये सहभागी होणे अतिशय सुंदर अनुभूती आहे; महाराष्ट्राच्या या...

अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या एका तरुणाला गुगलने अटक केली:कानपूर पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला, अल्पवयीन बहिणींच्या...

0
कानपूर पोलिसांनी शुक्रवारी बाल लैंगिक शोषण प्रकरणी एका तरुणाला अटक केली. आरोपी तरुण आपल्या बहिणींसोबत आणि जवळपास राहणाऱ्या इतर मुलींसोबतच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ...

10 जुलैचे राशिभविष्य:मीन राशीच्या लोकांना भागीदारीच्या व्यवसायात चांगला नफा, वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा

0
शुक्रवार, 10 जुलै रोजी वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांची नवीन कामे सुरू करण्याची इच्छा पूर्ण होऊ...

विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी पोहोचली प्रियंका चोप्रा:पती निक जोनासला व्हिडिओ कॉलवर लाइव्ह टूर दाखवला, सामन्यादरम्यान...

0
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा गुरुवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी पोहोचली. ती महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पहिल्या रांगेत बसलेली दिसली, जिथे कोको...
spot_img

विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी पोहोचली प्रियंका चोप्रा:पती निक जोनासला व्हिडिओ कॉलवर लाइव्ह टूर दाखवला, सामन्यादरम्यान...

0
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा गुरुवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी पोहोचली. ती महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पहिल्या रांगेत बसलेली दिसली, जिथे कोको...

लग्नानंतर नोकरी सोडली:आता फक्त एक पत्नी अन् आई म्हणून जगतेय, सगळ्यांना आनंदी करण्याच्या प्रयत्नात...

0
प्रश्न– मी 34 वर्षांची महिला आहे. लग्नानंतर मी माझी नोकरी सोडली होती, कारण कुटुंबाची जबाबदारी वाढली होती. गेल्या काही वर्षांपासून माझी ओळख फक्त...

फाटलेल्या बुटांच्या व्हायरल व्हिडिओवर सनी देओलची फिरकी:कार्यक्रमात म्हणाले- कोणीही बुटाचा फोटो घेऊ नये, धर्मेंद्र...

0
बॉलिवूड अभिनेता सनी देओल गुरुवारी आपल्या 'इक्का' चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या कार्यक्रमात पोहोचले. यावेळी त्यांनी त्यांच्या अलीकडील 'बुटाच्या वादा' वर विनोदी शैलीत प्रतिक्रिया दिली. खरं...

बीएसएनएल सॅटेलाइट फोन भारतात लाँच

0
नवी दिल्ली9 तासांपूर्वीलिंक कॉपी करासरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने भारतात नवीन सॅटेलाइट फोन लॉन्च केला आहे. याची किंमत करांसहित 1,34,166 रुपये ठेवण्यात आली...
error: Content is protected !!