शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सांगली लोकसभेची निवडणूक लढवणारे कुस्तीपटू चंद्रहार पाटील येत्या सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यामुळे ठाकरे गटात खळबळ माजली असताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा क
?
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीची उमेदवारी दिली होती. त्यांच्या नावाची घोषणा करताना त्यांनी महाविकास आघाडीतील आपल्या मित्र पक्षांनाही विश्वासात घेतले नव्हते. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. परिणामी, येथे काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत विशाल पाटील यांचा अपक्ष म्हणून विजयही झाला होता. यामुळे चंद्रहार पाटील नाराज झाले होते. या पार्श्वभूमीवर ते आता शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
हिंमत असेल तर प्रवेश रोखून दाखवा
संजय शिरसाट यांनी बुधवारी पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांच्या पक्षप्रवेशाची माहिती दिली. चंद्रहार पाटील हे सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी हा पक्षप्रवेश रोखून दाखवावा. सद्यस्थितीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्यास कुणीही तयार नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षात लक्ष घातले पाहिजे. चालू महिन्याच्या अखेरपर्यंत अनेक नेते आमच्या पक्षात प्रवेश करणार आहेत, असे ते म्हणाले.
चंद्रहार पाटलांनी घेतली होती एकनाथ शिंदेंची भेट
उल्लेखनीय बाब म्हणजे चंद्रहार पाटील यांनी 26 एप्रिल रोजी कुडाळ येथे एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने ही भेट झाल्याची चर्चा होती. तेव्हापासूनच ते शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर त्यांनी उदय सामंत यांचीही भेट घेतली होती. यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेने अधिकच जोर धरला होता. पण त्यांनी मी काही कामानिमित्त सामंत यांची भेट घेतल्याची बतावणी चंद्रहार यांनी केली होती. पण आता अखेर त्यांच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली आहे.
हे ही वाचा…
सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी:संजय राऊत यांच्या फोननंतर धडक कारवाई; नाराजी व्यक्त करणे गुन्हा आहे का? – बडगुजर
नाशिक – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नाशिकचे जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी आज एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत खासदार संजय राऊत यांचा फोन आला आणि गायकवाड यांनी तत्काळ सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची घोषणा केली. ठाकरे गटाच्या या धडक कारवाईमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, नाराजी व्यक्त करणे गुन्हा आहे का? असा सवाल बडगुजर यांनी या कारवाईवर भाष्य करताना उपस्थित केला आहे. वाचा सविस्तर






























