Homeमहाराष्ट्रTwelve-year-old girl dies after falling on broken power line in Masod |...

Twelve-year-old girl dies after falling on broken power line in Masod | धुणे धूताना वीज वाहिनी तुटून अंगावर पडली: 12 वर्षीय मुलीचा मृत्यू, मसोड येथील घटना; वीज कंपनीवर निष्काळजीपणाचा आरोप – Hingoli News

कळमनुरी तालुक्यातील मसोड येथे वीज वाहिनी तुटून अंगावर पडल्याने एका बारा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ता. 2 घडली आहे. या घटनेमुळे गावावर शोक काळा पसरली आहे

?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील वैष्णवी दुलाजी गोरे (१२) ही मुलगी आज दुपारच्या सुमारास तिच्या आईला धुणे धुण्यासाठी मदत करीत होती. दोघीही घरासमोरच धुणे धुत होत्या. यावेळी अचानक वीज वाहिनी तुटून खाली पडली. यामध्ये वीज प्रवाह होता. यावेळी वैष्णवीला विजेचा जोरदार धक्का बसला. सदर प्रकार तिच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. परिसरातील गावकरी मदतीसाठी धावून आले. मात्र यावेळी तिच्याजवळच वीज वाहिनी तुटून पडल्याचे दिसून आल्यामुळे गावकऱ्यांनी तातडीने वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याला माहिती दिली. वीज पुरवठा खंडित केल्यानंतर वैष्णवीला तातडीने उपचारासाठी कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची तपासणी केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

या घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मोहन भोसले, जमादार देविदास सूर्यवंशी, दिलीप पोले, प्रशांत शिंदे, गजानन होळकर यांच्या पथकाने तातडीने कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तसेच पोलिसांनी घटनास्थळीही भेट दिली.

दरम्यान मयत वैष्णवी ही इयत्ता आठवी वर्गात शिक्षण घेत होती. अभ्यासात हुशार व मनमिळाऊ मुलगी म्हणून तिची ओळख होती. तिच्या मृत्यूने मसोड गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

वीज कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार झाल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे. मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे योग्य पद्धतीने केली नसल्यानेच हा प्रकार घडल्याचा आरोपही केला जात आहे.

हे ही वाचा…

कोविडची धास्ती:शासकीय रुग्णालयाने घेतली ऑक्सिजन यंत्राची चाचणी, तातडीची गरज भासल्यास शंभर बेड उपलब्ध केले जाणार

हिंगोली जिल्ह्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालय प्रशासनाने सोमवारी तारीख दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. यावेळी ऑक्सिजन तयार करणाऱ्या यंत्रांची चाचणी घेण्यात आली असून तातडीची गरज भासल्यास 100 बेड वाढविता येणार आहेत. पूर्ण बातमी वाचा…



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राम मंदिरात अजूनही चंपत राय सर्वात शक्तिशाली:खास लोक 1800 कोटी रुपयांची खाती सांभाळत आहेत,...

0
राम मंदिराच्या परिसरात चंपत राय यांचे वर्चस्व अजूनही कायम आहे. दैनिक भास्करच्या तपासणीत असे समोर आले आहे की, ट्रस्टमधून बाहेर पडल्यानंतरही व्हीआयपी पास...

न खाऊंगा, न खाने दूंगा.. पण पिंपरीत 400 कोटींची लूट:शालेय साहित्य घोटाळ्यावरून संजय राऊतांचे...

0
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या शालेय साहित्य आणि गणवेश खरेदीत तब्बल ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना...

10 जुलै रोजी योगिनी एकादशी व्रत, योगिनी एकादशीचे महत्त्व, विष्णु लक्ष्मी पूजा विधि

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराआज (शुक्रवार, 10 जुलै) निज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी आहे, याला योगिनी एकादशी म्हणतात. अशी मान्यता आहे की जो...

चेपॉक स्टेडियममध्ये होईल बिग बॅशचा ओपनिंग सामना:12 डिसेंबर रोजी सामना खेळला जाईल, पंतप्रधान मोदींनी...

0
ऑस्ट्रेलियाच्या टी-२० क्रिकेट लीग बिग बॅशचा उद्घाटनाचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ही घोषणा केली आहे. ते...
spot_img

चेपॉक स्टेडियममध्ये होईल बिग बॅशचा ओपनिंग सामना:12 डिसेंबर रोजी सामना खेळला जाईल, पंतप्रधान मोदींनी...

0
ऑस्ट्रेलियाच्या टी-२० क्रिकेट लीग बिग बॅशचा उद्घाटनाचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ही घोषणा केली आहे. ते...

भारत U19 विरुद्ध श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटभारत U19 Vs श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी | व्हीके विनीत सेंच्युरी, चमिका हीनातीगालाहंबनटोटा2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराश्रीलंका अंडर-19...

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....
error: Content is protected !!