Homeदेश-विदेशहिंदी महासागरात सापडलं 9500 वर्ष जुने शहर! सिंधु खोऱ्यापेक्षाही जुनी संस्कृती पाहून...

हिंदी महासागरात सापडलं 9500 वर्ष जुने शहर! सिंधु खोऱ्यापेक्षाही जुनी संस्कृती पाहून डोळ्यांवर विश्वास नाही बसणार


मानवी सभ्यता: जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींमध्ये, हडप्पा म्हणजेच सिंधू संस्कृती आणि सुमेरियन संस्कृतीची नावे तुम्ही पुस्तकात वाचली असतील, सिनेमांत त्याच्या कहाण्या पाहिल्या असतील. पण याही पेक्षा जुने संशोधन समोर येतंय.  यापेक्षा जुन्या संस्कृती देखील या पृथ्वीवर अस्तित्वात होत्या, हे समोर आलेल्या संशोधनातून कळतंय. हिंदी महासागरातूनही असाच एक शोध लागलाय. हिंदी महासागरातील एका संस्कृतीबद्दल माहिती ऐकून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. जी सिंधू संस्कृती आणि सुमेरियन संस्कृतींपेक्षा शतकानुशतके जुनी असू शकते. मानवी संस्कृतीची मुळे आपल्या कल्पनेपेक्षा खूप जुनी आहेत, हे यातून कळते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

2 दशकांपूर्वी शोध

पश्चिम भारताच्या किनाऱ्याजवळ एक रहस्यमय पाण्याखालील स्थळ सापडलंय. हे प्राचीन स्थळ संस्कृतींचा अध्याय पुन्हा लिहू शकते, असे मानले जाते.टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलंय. सुमारे 2 दशकांपूर्वी खंभातच्या आखाताच्या खोलवर संशोधकांना हे ठिकाण सापडलं. या वस्तुस्थितीची कधीही पूर्णपणे कबुली किंवा खंडन करण्यात आलेले नाही. पण आजही या संस्कृतीबद्दल चर्चा सतत सुरू आहे.

शोधात काय सापडलं?

खरंतर 2000 मध्ये राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (NIOT) ने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील खंभातच्या आखातात एक महत्त्वाचा शोध लावला. नियमित प्रदूषण सर्वेक्षणादरम्यान हा शोध लागला. सर्वेक्षणादरम्यान सोनार तंत्रज्ञानाने समुद्राच्या तळाशी भौमितिक रचना दर्शविल्या. या वास्तू बुडालेल्या शहराच्या अस्तित्वाकडे निर्देश करत होत्या.

सिंधू संस्कृतीच्या आधी

हे कथित शहर पाण्याखाली 120 फूट खोलवर वसलेले आहे. हे शहर 5 मैल लांब आणि 2 मैल रुंद असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. या ठिकाणाहून मातीची भांडी, मणी, पुतळे आणि मानवी अवशेष अशा अनेक गोष्टी सापडल्या. जेव्हा त्यांना कार्बन-डेटेड केले गेले तेव्हा या कलाकृती सुमारे 9,500 वर्षे जुन्या असल्याचे आढळून आले.या गोष्टी सिंधू संस्कृतीच्या आधीच्या असू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

तज्ञांचे मत काय?

हे अवशेष एका अतिशय प्रगत संस्कृतीचे संकेत देतात जी गेल्या हिमयुगाच्या शेवटी समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यामुळे पाण्यात बुडाली होती, असे  NIOT च्या वैज्ञानिक पथकाचे डॉ. बद्रीनारायण यांनी सांगितले. तसेच हडप्पा संस्कृती या समुद्राखालील संस्कृतीतून विकसित झाली असावी, असेही ते पुढे म्हणाले. काही तज्ञांनी या दाव्यावर प्रश्नही उपस्थित केलेयत. काही कलाकृती प्राचीन नद्यांनी वाहून नेल्या असतील, असंही म्हंटलं जातंय. यासोबतच कार्बन डेटिंगच्या विश्वासार्हतेबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!