Homeमनोरंजनगुजरातच्या पराभवामुळे बदललं प्लेऑफचं समीकरण, मुंबई इंडियन्सला टॉपवर पोहोचण्यासाठी गोल्डन चान्स

गुजरातच्या पराभवामुळे बदललं प्लेऑफचं समीकरण, मुंबई इंडियन्सला टॉपवर पोहोचण्यासाठी गोल्डन चान्स


आयपीएल 2025: आयपीएल 2025 ही स्पर्धा आता अत्यंत रोमांचक वळणावर आहे. स्पर्धेच्या लीग स्टेजचे केवळ 2 सामने शिल्लक असून या उर्वरित 2 सामन्यांच्या निकालावरून प्लेऑफचे टॉप 2 संघ घोषित होतील. गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स या चार संघांनी त्यांच प्लेऑफमधील स्थान निश्चित केलं असलं तरी प्लेऑफ टॉप 2 मध्ये कोणते संघ जाणार याचा निर्णय अजून व्हायचा आहे. चेन्नई सुपरकिंग्सने त्यांच्या शेवटच्या लीग स्टेज सामन्यात गुजरात टायटन्सला बाद केले, त्यामुळे आता गुजरात केवळ दुसऱ्या स्थानावर पोहोचण्याची आशा करू शकतात. तसेच यासाठी त्यांना दुसऱ्या संघांच्या सामन्याच्या निर्णयावर अवलंबून रहावं लागेल.

तीन संघांमध्ये टेबल टॉप करण्याची शर्यत :

सध्या पॉईंट्स टेबल पाहिलं तर गुजरात टायटन्स सध्या पहिल्या क्रमांकावर असून पंजाब किंग्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या तर मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर आहे. गुजरात आणि पंजाब संघाला त्यांच्या मागील सामन्यात मिळालेल्या पराभवामुळे टॉप 2 चं समीकरण आता बदललं आहे. आतापर्यंत संपूर्ण 18 व्या सीजनमध्ये  असलेली गुजरात टायटन्स लागोपाठ दोन सामन्यात पराभूत झाली आहे. त्यामुळे आता उर्वरित तीन संघ मुंबई, पंजाब आणि आरसीबी हे टेबल टॉप करण्याच्या शर्यतीत आहेत.

मुंबई इंडियन्सचं कमबॅक :

तब्बल 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्सने यंदा स्पर्धेत जबरदस्त कमबॅक केलं. मुंबईने या सीजनची सुरुवात 5 सामन्यात पराभूत करून केली होती. मात्र त्यानंतर मुंबई इंडियन्सने कमबॅक केलं आणि प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं. 13 सामन्यात 16 पॉईंट्सने ते सध्या चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांचा शेवटचा लीग स्टेज सामना हा पंजाब किंग्स सोबत होणार आहे. या सामन्यातील विजेता टॉप 2 मध्ये स्थान मिळवेल.

टॉपवर कशी पोहोचू शकते मुंबई इंडियन्स :

मुंबई इंडियन्सचा नेट रन रेट हा + 1.292 असून तो या सीजनमधील 10  संघांपैकी सर्वात चांगला आहे. सोमवारी जयपूरमध्ये मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्सचा सामना करायचा आहे. गुजरात टायटन्स लागोपाठ 2 पराभवामुळे टॉपवर पोहोचू शकत नाही. त्यामुळे मुंबई आणि पंजाब सामन्यात विजयी संघ हा गुजरातला बाजूला सारून पॉईंट्स टेबलच्या टॉप 1 वर स्थान मिळवेल.

मुंबईकडे सध्या 16 पॉईंट्स असून ते सोमवारी पंजाबला पराभूत करू शकले तर थेट 18 पॉईंट्स सह टॉप 1 वर पोहोचू शकतात. तसेच मंगळवारी आरसीबी लखनऊ सामन्यात आरसीबी पराभूत झाली तर आरसीबी 17 पॉईंट्सवरचं राहील, परंतु आरसीबी हा सामना जिंकली तर त्यांचे 19 पॉईंट्स होऊन ते टेबल टॉप करतील. मुंबई इंडियन्सला पॉईंट्स टेबलमध्ये टॉप 2 मध्ये स्थान मिळवण्यासाठी पंजाब किंग्स विरुद्ध सोमवारी होणारा सामना काहीही करून जिंकावा लागेल.
तर जर मुंबई इंडियन्सचा संघ या सामन्यात पराभूत झाला तर ते चौथ्या स्थानावर राहतील.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

‘ताजमहाल तेजोमहालय मंदिर होते का’:अलाहाबाद हायकोर्टाने केंद्र- ASI ला उत्तर मागितले; सर्वेक्षण आयुक्त नियुक्तीच्या...

0
अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी ताजमहालमध्ये तेजो महालय मंदिर असल्याच्या याचिकेवर सुनावणी केली. त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी वकील आयोग (एडवोकेट कमिशन) नियुक्त करण्याच्या मागणीवर केंद्र...

ट्रस्टच्या वादातून साधूची फसवणूक; फसवणुकीची कथा

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक लोककथा आहे. जुन्या काळात एका गावातील मंदिरात एक साधू राहत होता. तो आपल्या तपस्या, शिस्त आणि साधेपणासाठी प्रसिद्ध होता....

जादूटोण्याची भीती घालून महिलेवर बलात्कार अन् जबरदस्तीने विवाह:मुलासह महिलेचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, दारणा...

0
धंद्यात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत जादूटोण्याची भीती घालून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी संशयित भोंदूबाबा...

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...
spot_img

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...
error: Content is protected !!