Homeदेश-विदेशसंविधान बदललं आणि रातोरात गेली 26 हजार मुस्लिम महिलांची नागरिकता, कारण ऐकून...

संविधान बदललं आणि रातोरात गेली 26 हजार मुस्लिम महिलांची नागरिकता, कारण ऐकून व्हाल हैराण!


कुवैत नागरिकत्व बातम्या: तुम्ही सकाळी उठता आणि तुमचे बँक खाते बंद असते? ऑनलाइन पेमेंटही करता येत नाही? तुम्हाला सर्व सरकारी सुविधा मिळणे बंद होते? असे घडू शकते असा कधी विचार केलाय का? पण जगाच्या एका कोपऱ्यात असं घडलंय. मुस्लिम देश कुवेतमधून मुस्लिम महिलांसोबत असाच प्रकार घडलाय. त्यांनी चौकशी केली तुमचे नागरिकत्व रद्द करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले.

कुवेत सरकारने एका रात्रीत हजारो लोकांचे नागरिकत्व रद्द केले. या यादीत बहुतेक महिलांचा समावेश आहे. लग्नानंतर येथील नागरिकत्व मिळालेल्या लोकांचे नागरिकत्व सरकार बहुतेकदा रद्द करतंय. या यादीत कुवेती पुरुषांशी लग्न करून नागरिकत्व मिळवणाऱ्या महिलांचा समावेश आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलंय.

रक्ताचे नाते असलेल्यांनाच कुवेती नागरिकत्व

जॉर्डनमधील एक महिला तिच्या क्रेडिट कार्डचा वापर करून पेमेंट करण्यासाठी गेली. पण आपलं खातं गोठववल्याचे तिला कळले. हा धक्का इथवरच थांबला नाही. तर तिचे नागरिकत्व काढून घेण्यात आल्याची माहिती तिला मिळाली. डिसेंबर २०२३ मध्ये अमीर शेख मेशाल अल अहमद अल सबाह कुवेतचे अमीर बनले. यानंतर त्यांनी संसद बरखास्त केली आणि संविधानातील काही भाग काढून टाकला.  ज्या लोकांचे येथील लोकांशी रक्ताचे नाते आहे त्यांनाच कुवेती नागरिकत्व मिळू शकते, असे आमीर म्हणाले.

कुवेतमध्ये फक्त या लोकांनाच सरकारी सुविधा

कुवेतमध्ये आधीच असे बरेच लोक राहतात ज्यांच्याकडे तेथील नागरिकत्व नाही. 1961 मध्ये ब्रिटिश संरक्षणापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुमारे 1 लाख लोकांना नागरिकत्व मिळू शकले नाही. नागरिकत्व असलेल्या लोकांना बँकिंग, शिक्षण, सरकारी नोकऱ्या आणि इतर सर्व सुविधांचा लाभ घेता येईल.

लग्नाच्या आधारे नागरिकत्व मिळवणाऱ्यांच्या अडचणी वाढल्या

1987 पासून विवाहाच्या आधारे कुवेतमध्ये नागरिकत्व मिळवणाऱ्यांवर सरकार आता कारवाई करतंय. समोर आलेल्या आकडेवारीनुसार 1992 ते 2020 पर्यंत  38 हजार 505 महिलांनी येथे लग्न करून नागरिकत्व मिळवले. याशिवाय दुहेरी नागरिकत्व असलेल्या लोकांचे नागरिकत्व देखील काढून घेतलं जातंय. मोठी गोष्ट म्हणजे या यादीत पॉप गायक नवल आणि अभिनेता दाऊद हुसेन यांच्या नावाचाही समावेश आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नृपेंद्र मिश्रा म्हणाले- राम मंदिराच्या देणगीवर दरोडा टाकला गेला:मंदिर विश्वस्तांनी सांगितले- विश्वासघात झाला, संपूर्ण...

0
श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष माजी IAS नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, राम मंदिरात अर्पण चोरीवर उघडपणे दरोडा टाकण्यात आला. मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन...

ऑगस्ट 2026 सर्व 12 चिन्हांसाठी राशिचक्र अंदाज

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी करा20 जूनच्या रात्रीपासून मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. या राशीत 2 ऑगस्टपर्यंत राहील. वृषभ शुक्राच्या मालकीची रास आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य...

अविष्काच्या शतकामुळे श्रीलंका-ए ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत:अफगाणिस्तानला 103 धावांनी हरवले; 21 जून रोजी भारताशी...

0
अविष्का फर्नांडोच्या शतकामुळे श्रीलंका-ए संघ वनडे ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. संघाने दांबुला येथे अफगाणिस्तान-ए संघाला 103 धावांनी हरवले. 21 जून रोजी...

वर्तमानपत्रात कधीही अन्न गुंडाळू नका:शाईमुळे कर्करोग आणि फूड पॉयझनिंगचा धोका, अन्न पॅकेजिंगचा योग्य आणि...

0
जर तुम्हाला स्ट्रीट फूड आवडत असेल, तर तुम्ही वर्तमानपत्रात गुंडाळलेले समोसे, वडापाव किंवा जिलेबी खाल्लीच असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की खाण्यापिण्याच्या...
spot_img

अविष्काच्या शतकामुळे श्रीलंका-ए ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत:अफगाणिस्तानला 103 धावांनी हरवले; 21 जून रोजी भारताशी...

0
अविष्का फर्नांडोच्या शतकामुळे श्रीलंका-ए संघ वनडे ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. संघाने दांबुला येथे अफगाणिस्तान-ए संघाला 103 धावांनी हरवले. 21 जून रोजी...

वर्तमानपत्रात कधीही अन्न गुंडाळू नका:शाईमुळे कर्करोग आणि फूड पॉयझनिंगचा धोका, अन्न पॅकेजिंगचा योग्य आणि...

0
जर तुम्हाला स्ट्रीट फूड आवडत असेल, तर तुम्ही वर्तमानपत्रात गुंडाळलेले समोसे, वडापाव किंवा जिलेबी खाल्लीच असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की खाण्यापिण्याच्या...

पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला न्यायालयाचे समन्स:हजर राहावेच लागेल, चार्जशीटमध्ये आरोपी क्रमांक 11 बनवण्यात...

0
हैदराबादमधील नंपल्ली न्यायालयाने तेलुगु चित्रपट स्टार अल्लू अर्जुनला न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. ही कायदेशीर कारवाई डिसेंबर 2024 मध्ये त्यांच्या...

आयफोनसह ॲपलची उत्पादने महाग होतील:टिम कुक म्हणाले- चिपच्या कमतरतेमुळे खर्च वाढला, किंमती वाढवणे भाग...

0
टेक कंपनी ॲपल लवकरच आयफोन आणि तिच्या इतर उत्पादनांच्या किमती वाढवू शकते. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या एका...
error: Content is protected !!