Homeमनोरंजनइंग्लंड टूर कसोटी क्रिकेटसाठी टीम इंडियामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माची जागा...

इंग्लंड टूर कसोटी क्रिकेटसाठी टीम इंडियामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माची जागा घेणारी इंड.


Ind vs eng: जून महिन्यात भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची टेस्ट सीरिज  खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या इंग्लंड दौऱ्यासाठी येत्या शनिवार 24 मे रोजी भारतीय टेस्ट संघाची घोषणा करण्यात येणार आहे. महत्वाची गोष्ट अशी की, माजी टेस्ट कर्णधार आणि ओपनिंग फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि तसेच मिडल ऑर्डरचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) या दोघांनी मे महिन्यात टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे टेस्ट टीम इंडियात (Team India) विराट आणि रोहितची जागा कोण घेणार याविषयी भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठी उत्सुकतता आहे मीडिया रिपोर्ट्समधून काही खेळाडूंची नावं समोर आली आहेत जे रोहित आणि विराटची रिप्लेसमेंट म्हणून ओपनिंग आणि मिडल ऑर्डरला फलंदाजीसाठी उतरू शकतात.

कोण घेणार रोहित शर्माची जागा?

7 मे रोजी अचानकपणे भारतीय टेस्ट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या निवृत्तीवर त्याच्या फॅन्सना धक्का बसला होता कारण रोहित 12 महिन्यात क्रिकेटच्या दुसऱ्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेत होता. वर्ल्ड कप 2024 नंतर टी 20 क्रिकेटमधून रोहितने निवृत्ती घेतली होती. रोहित शर्मा हा टीम इंडियाचा कर्णधार असण्यासोबतच ओपनिंग फलंदाज सुद्धा होता. त्यामुळे त्याची जागा संघात कोणता खेळाडू घेणार याची उत्सुकतता आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे भारताचे ओपनिंग्ज पार्टनर होते. आता रोहितने निवृत्ती घेतल्यावर केएल राहुल ओपनिंग फलंदाजांची भूमिका पार पडेल अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे. केएल राहुल इंग्लंड दौऱ्यात ओपनिंग फलंदाज म्हणून उतरू शकतो. तसेच आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळणारा फलंदाज साई सुदर्शन याचं सुद्धा इंग्लंड दौऱ्यात भारतीय टेस्ट संघात पदार्पणाची  शक्यता आहे. असे झाल्यास ओपनिंग फलंदाज म्हणून त्याला सुद्धा संधी दिली जाऊ शकते.

हेही वाचा : प्लेऑफपूर्वी RCB ने का बदलला कॅप्टन? जितेश शर्माला दिली नेतृत्व करण्याची संधी, कारण आलं समोर

कोण घेणार विराट कोहलीची जागा?

रोहित पाठोपाठ 12 मे रोजी विराट कोहलीने देखील टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. यापूर्वी विराटने देखील 2024 मध्ये टी 20 मधून निवृत्ती घेतली होती. जानेवारी महिन्यात बीसीसीआयच्या सांगण्यावरून रणजी क्रिकेट खेळणारा विराट हा टेस्ट क्रिकेटमधून एवढ्या लवकर निवृत्त होईल याची त्याच्या फॅन्सना अपेक्षा नव्हती. विराट कोहली हा भारताच्या टेस्ट संघात गेल्या काही काळात चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी येत होता. तेव्हा आगामी इंग्लंड दौऱ्यात शुभमन गिल हा विराट ऐवजी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरण्याची शक्यता आहे. शुभमन गिल हा 2020 पासून टीम इंडियाच्या टेस्ट संघाचा भाग आहे. सुरुवातीला तो रोहित सोबत ओपनिंगला फलंदाजी करायचा, मात्र त्यानंतर तो तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरू लागला. मीडिया रिपोर्ट्सनुसार इंग्लंड दौऱ्यात विराटच्या जागी शुभमन गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो.

शुबमन गिलकडे नेतृत्व:

रोहित शर्मा टेस्टमधून निवृत्त झाल्यावर टीम इंडियाचा नवा टेस्ट कर्णधार कोण असणार याबाबत अनेक नाव समोर येत होती. जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा इत्यादी कर्णधारपदाच्या शर्यतीत होते. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार गौतम गंभीर आणि सिलेक्टर्स कमिटीने इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा टेस्ट कर्णधार म्हणून शुभमन गिलच्या नावावर मोहोर लावलेली आहे. आयपीएल स्थगित झाल्यावर दिल्ली येथे हेड कोच गौतम गंभीर आणि शुभमन गिल यांची जवळपास २ तास मिटिंग झाल्याची माहिती सुद्धा मिळतेय. यात टेस्ट संघाचा कर्णधारपदावरून गंभीर आणि गिल यांच्यात चर्चा झाली होती.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

संत नामदेव महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान:हिंगोलीत सोमवारी रिंगण सोहळा रंगणार, पालखी सोहळ्याचे 31 वे...

0
संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथून संत नामदेव महाराजांच्या पायी पालखी सोहळयाचे रविवारी ता. ५ पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. यावेळी शेकडो...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...

वॉशिंग्टनमध्ये इतिहासातील सर्वात मोठी आतषबाजी, राजधानी उजळली:न्यूयॉर्कमध्ये एअर शो, मियामीत कॉन्सर्ट; अमेरिकन स्वातंत्र्य सोहळ्याचे...

0
आज अमेरिका आपल्या स्वातंत्र्याचा २५० वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या निमित्ताने वॉशिंग्टन डी.सी., न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया, टेक्सास आणि मियामीसह देशभरात संचलन (परेड),...
spot_img

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...

Instagram बाल अत्याचार जाहिराती अवरोधित; मेटा 7-दिवसांची सूचना दिली

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराइंस्टाग्रामवर मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्रीला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातींबाबत सरकारने मूळ कंपनी मेटाला नोटीस पाठवली. न्यूज एजन्सी पीटीआयनुसार, कंपनीला...

FIFA विश्वचषक 2026: राउंड ऑफ 16 मध्ये ब्राझीलचा सामना नॉर्वेशी होत आहे

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: ब्राझीलचा सामना नॉर्वेशी 16व्या फेरीत | Haaland घटकक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 च्या 'राउंड ऑफ 16' मध्ये...
error: Content is protected !!