Homeमनोरंजनजागतिक प्रीक्लेम्पसिया डे 2025 लक्षणे आरोग्य बातम्या खबरदारी

जागतिक प्रीक्लेम्पसिया डे 2025 लक्षणे आरोग्य बातम्या खबरदारी


जागतिक प्रीक्लेम्पसिया डे 2025 : संपूर्ण जगभरात 22 मे हा दिवस  प्री-एक्लेम्पसिया दिन म्हणून ओळखला जातो. गरोदरपणादरम्यान महिलांच्या शरीरात होणारे बदल आणि तत्सम स्थिती अर्थात  प्री-एक्लेम्पसियाविषयी नागरिकांमध्ये जागरुकता पसरवण्याच्या हेतूनं हा दिवस महत्त्वाचा ठरतो.

प्री-एक्लेम्पसिया म्हणजे नेमकं काय?

वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी, डॉ. मीरा पाठक यांनी आयएएनएसला दिलेल्या माहितीनुसार  प्री-एक्लेम्पसिया ही एक अशी स्थिती आहे, ज्यामुळं साधारण पाच ते आठ महिला त्याचा सामना करतात. या स्थितीमध्ये लक्षणं अतिशय सौम्य असल्या कारणानं अनेकदा ती लक्षातही येत नाही. सहसा गरोदरपणादरम्यान 20 आठवड्यांनंतर जर गर्भधारणा झालल्या महिलेचा रक्तदाब अर्था ब्लड प्रेशर 140/90 पेक्षा वाढत असेल, शरीराला सूजयेत असेल आणि युरिनमध्ये प्रोटीनचं प्रमाण अधिक असेल तर ही शारीरिक स्थिती  प्री-एक्लेम्पसियाकडे खुणावते.

प्री-एक्लेम्पसियाच्या कारणांवर प्रकाश टाकल्यास प्लेसेंटमध्ये होणारी अस्थिरता यामागचं मुख्य कारण असून, पहिली गर्भधारणा, हायपरटेंशन, मधुमेह, थायरॉईड, ट्विन किंवा मोलर प्रेगनेन्सी, स्थुलता अशा कारणांचा समावेश आहे.

प्री-एक्लेम्पसियावर उपाय काय?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार अनेक महिलांमध्ये  प्री-एक्लेम्पसियाची लक्षणंच दिसत नाहीत. मात्र चाचण्यांमध्ये उच्च रक्तदाब आढळून येतो.  प्री-एक्लेम्पसियाच्या इतर लक्षणांमध्ये डोकेदुखी, धुरकट दिसणं, हातपाय सुजणं, पोटाच्या वरील भागात वेदना, मळमळ, उलटी, महिन्याभरात 4 किलोहून अधिक वजन कमी होणं, फेसाळ लघ्वी होणं अशी लक्षणं आढळतात. तर, गंभीर प्रकरणांमध्ये भोवळ येण्याचंही लक्षण आढळतं, जिथं ही स्थिती रुग्णाला कोमातही पाठवू शकते.

डॉ. पाठक यांच्या माहितीनुसार अनियंत्रित रक्तदाबामुळं ब्रेन स्ट्रोक, झटके योणं, रक्तस्त्राव वाढणं, हृदयविकार, किडनी निकामी होणं अशा गंभीर समस्या उदभवतात. एखाद्या व्यक्तीला  प्री-एक्लेम्पसियामुळं फिट आल्यास गर्भवती मातांना गर्भपात, गर्भातच बाळाचा मृत्यू, आययुजीआर म्हणजे अंतर्गर्भाशयी विकास मंदता, प्रिमॅच्योर डिलीव्हरी अशा समस्यांचा सामना करावा लागतो.

प्री-एक्लेम्पसियवारी उपाय

सातत्यानं रक्तदाब तपासत राहण्यापासूनच प्री-एक्लेम्पसियाच्या उपायांची सुरुवात होते. जीवनशैलीमध्ये बदल, नियमित व्यायाम, योगसाधना, कमी ताण घेणं अशा सवयी इथं फायद्याच्या ठरतात. शिवाय बाहेरचे खाद्यपदार्थ, साखर, मीठ, तेलकट पदार्थ यांचं सेवन कमी केल्यास त्यामुळंही सकारात्मक फायदा दिसतो. अनेकदा डॉक्टरांटच्या सल्ल्यानं प्री-एक्लेम्पसिया असणाऱ्यांना रक्तदाब नियंत्रणात आणणारी औषधंसुद्धा दिली जातात. गर्भवती महिलांमध्ये या स्थितीत 37 आठवड्यांपर्यंत गर्भधारणा सुरक्षित असते. जिथं कोणताही धोका नसल्यास प्रसूती केली जाते.

परिस्थिती बिघडून रक्तदाब नियंत्रणात न राहिल्यानं महिलेच्या शरीरातील इतर अवयवांवरही परिणाम होऊ शकतो. ज्यामुळं अनेकदा डॉक्टर महिलेटचा जीव वाचवण्यासाठी वेळेआधीच प्रसूतीचा सल्ला देतात. डॉ. पाठक यांच्या माहितीनुसार सहसा प्रसूतीच्या 48 तासांनंतर महिलेचा रक्तदाब वाढू शकतो. पुढील 6 आठवड्यांसाठी हीच स्थिती कायम राहून भविष्यात त्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास सतावतो.

(वरील माहिती डॉक्टरांचा हवाला देत वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केली असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही. )





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे निधन

0
लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावरून ढकलून हत्या करण्यात आलेले प्रसिद्ध तरुण उद्योजक केतन अग्रवाल यांच्या कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला आहे. केतनचे आजोबा देवीचंद...

TMC पश्चिम बंगालच्या अध्यक्षा चंद्रिमा भट्टाचार्य यांचा राजीनामा; ममता बॅनर्जींचे विधान

0
मराठी बातम्याराष्ट्रीयTMC पश्चिम बंगालच्या अध्यक्षा चंद्रिमा भट्टाचार्य यांचा राजीनामा; ममता बॅनर्जींचे विधानकोलकाता21 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातृणमूल काँग्रेस (TMC) च्या ज्येष्ठ नेत्या चंद्रिमा भट्टाचार्य यांनी...

शुक्राचे राशी परिवर्तन आज:शुक्रासाठी शिवपूजा आणि दुधाचे दान करा, जाणून घ्या 1 ऑगस्टपर्यंतचा काळ...

0
आज (4 जुलै) दुपारी सुमारे 4 वाजता शुक्र राशी बदलून सिंह राशीत येईल. त्यानंतर हा ग्रह 1 ऑगस्टपर्यंत याच राशीत राहील. शुक्र वृषभ...

वैभव सूर्यवंशीने सचिन-शेफालीचा विक्रम मोडला:15 वर्षे, 99 दिवसांत भारतासाठी पदार्पण केले; सामन्यापूर्वी दिले होते...

0
वैभव सूर्यवंशी भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. तो १५ वर्षे ९९ दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत...
spot_img

वैभव सूर्यवंशीने सचिन-शेफालीचा विक्रम मोडला:15 वर्षे, 99 दिवसांत भारतासाठी पदार्पण केले; सामन्यापूर्वी दिले होते...

0
वैभव सूर्यवंशी भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. तो १५ वर्षे ९९ दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत...

हेवी वर्कआउट स्ट्रेस हार्मोन वाढवतो? याचे विज्ञान जाणून घ्या:मानसिक आरोग्य व्यायामादरम्यान कॉर्टिसोलची पातळी वाढणे...

0
अनेकदा असे म्हटले जाते की हेवी वर्कआउट किंवा लांबच्या व्यायामामुळे शरीरातील कॉर्टिसोल म्हणजेच स्ट्रेस हार्मोन धोकादायक पातळीपर्यंत वाढतो. याच कारणामुळे अनेक लोक याला...

इंद्रेश मलिक हीरामंडी स्टार; पिरॅमिड स्कीम घोटाळ्यातील बळीची कहाणी

0
36 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा‘हीरामंडी’ मधील उस्ताद जी आणि ‘द पिरामिड स्कीम’ मधील अभिनयामुळे चर्चेत आलेले इंद्रेश मलिक यांनी दिव्य मराठीशी बोलताना त्यांच्या करिअर,...

व्हॉट्सॲपच्या युझरनेम वैशिष्ट्यावर सरकारची बंदी:गोपनीयता वाढवणारे वैशिष्ट्य होते, चॅटिंग स्मार्ट झाली असती; थांबवण्याचे कारण...

0
व्हॉट्सॲप लवकरच इंस्टाग्राम आणि टेलिग्रामप्रमाणे युझरनेम फीचर आणणार होते. यामुळे लोक मोबाईल नंबर शेअर न करता एकमेकांना मेसेज करू शकतील. मात्र, सुरक्षेच्या चिंतेमुळे...
error: Content is protected !!