Homeमनोरंजनआरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार यांनी खुलासा केला की त्यांनी वचन तोडल्यामुळे त्यांना...

आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार यांनी खुलासा केला की त्यांनी वचन तोडल्यामुळे त्यांना संघात यायचे नव्हते


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार रजत पाटीदारने (Rajat Patidar) 2022 मध्ये जेव्हा संघाने आपल्याला आश्वासन दिल्यानंतरही दुर्लक्ष केलं तेव्हा प्रचंड नाराजी आणि संताप झाला होता असं उघड केलं आहे. संघातील खेळाडू जखमी झाल्यानंतर रजत पाटीदारला संघात स्थान देण्यात आलं होतं. आयपीएल 2025 मध्ये विरा कोहलीनंतर आपल्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं तेव्हा प्रचंज दबाव होता, मात्र विराटच्या सहकार्य दाखवणाऱ्या शब्दांमुळे दिलासा मिळाला असाही खुलासा त्याने केला. कर्णधारपदासह रजत पाटीदर मधल्या फळीतील फलंदाजाची भूमिकाही योग्य साकारत आहे. त्याने 11 सामन्यात 239 धावा केल्या आहेत.

“आयपीएल 2022 च्या मेगा लिलावाआधी मला तू तयार राहा असा मेसेज मिळाला होता. आम्ही तुझी निवड करु असं सांगण्यात आलं होतं. मला बंगळुरु संघात खेळण्याची पुन्हा संधी मिळेल अशी आशा निर्माण झाली होती. पण मेगा लिलावात मला निवडण्यात आलं नाही. मी थोडा नाराज होतो,” असं पाटीदारने बंगळुरुच्या पॉडकास्टमध्ये म्हटलं.

पण 31 वर्षीय रजत पाटीदारला आरसीबीकडून खेळण्यासाठी फार वाट पाहावा लागली नाही. कारण संघातील एक खेळाडू जायबंदी झाल्याने त्याला लगेच संघातून खेळण्यासाठी बोलावणं आलं. पण रजत पाटीदारला आपल्या खेळण्याची संधी फार कमी मिळेल याची कल्पना असल्याने तो संघात परतण्यास उत्सुक नव्हता.

“लिलावात निवड न झाल्याने मी इंदोरमध्ये स्थानिक सामने खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर मला फोन आला की, लवनिथ सिसोदिया जखमी झाल्याने आम्ही तुझी निवड करत आहोत. पण तुम्हाला खऱं सांगायचं तर मला बदली खेळाडू म्हणून जाण्याची इच्छा नव्हती. कारण मला खेळण्याची फार संधी मिळणार नाही याची कल्पना होती, मला डगआऊटमध्ये बसण्याची इच्छा नव्हती,” असं रजत पाटीदार म्हणाला.

“मी रागावलो नव्हतो. माझं असं झालं होतं की, जर मला लिलावात निवडलं नसेल तर मला खेळायला मिळणार नाही. काही वेळासाठी रागावल्यानंतर नंतर मी सामान्य झालो,” असं पाटीदार म्हणाला.

विराट कोहलीसारख्या महान खेळाडूनंतर आपल्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आल्यानंतर फार दबाव होता, मात्र त्याने पाठिंबा दिल्याने आत्मविश्वास वाढल्याचंही तो म्हणाला. त्याने सांगितलं की, “माझ्या मनात फार प्रश्न होते. संघात इतके मोठे खेळाडू आहेत. विराट इतका मोठा खेळाडू असताना त्याच्यासह कसं खेळणार. पण त्याने फार पाठिंबा दिला”.

“मला माहित होतं की मला त्याचा पूर्ण पाठिंबा आहे. मी म्हटल्याप्रमाणे, हे माझ्यासाठी शिकण्याचा अनुवव होता. माझ्यासाठी ही एक संधी आहे. म्हणून, मी त्याच्याकडून शक्य तितकं शिकेन. कारण प्रत्येक भूमिकेत त्याच्यासारखा अनुभव आणि कल्पना कोणाकडेही नाहीत. मग ती फलंदाजी असो, एक व्यक्ती म्हणून असो आणि कर्णधार म्हणून असो,” असं पाटीदार म्हणाला.

ज्या दिवशी आरसीबी संघाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आलं तो दिवस पाटीदारसाठी सर्वात संस्मरणीय दिवसांपैकी एक होता. कोहलीकडून फलक स्वीकारताना आपल्याला काहीच सुचत नव्हतं असं तो म्हणाला.

“मी टीव्ही पाहण्यास सुरुवात केल्यापासून त्याला आयपीएलमध्ये, मैदानाबाहेर पाहत आहे. त्याच्याकडून कर्णधारपदाची पाटी घेणं हा वेगळा अनुभव होता. त्यानंतर, मी त्याच्याकडे असं पाहत होतो की, मी काय करावं? मग त्याने काही शब्द म्हटले, ‘तू ते पात्र आहेस, तू ते मिळवलेस’. त्यामुळे मला थोडे बरे वाटले,” असं त्याने सांगितलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

आग्रा-मुंबई महामार्गावर 7 तासांपासून 25 किमीची वाहतूक कोंडी, व्हिडिओ:बस-ट्रकमध्ये अडकले लोक; भेरू घाटापासून मानपूरपर्यंत...

0
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात आग्रा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सोमवार संध्याकाळी 4 वाजल्यापासून वाहतूक कोंडी झाली आहे. रात्री 11 वाजेपर्यंतही परिस्थिती सामान्य होऊ शकली नाही....

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत जनसुनावणी:अमरावतीत उद्या महिलांच्या तक्रारींवर होणार सुनावणी

0
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत अमरावती येथे महिलांच्या तक्रारींची जनसुनावणी होणार आहे. शुक्रवार, ३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात...

भीषण धडकेत 8 जणांचा मृत्यू; ट्रंकमधील सिगारेट बॉक्सेसचा दावा

0
मराठी बातम्याराष्ट्रीयराजस्थान बस अपघात : भीषण धडकेत 8 जणांचा मृत्यू; ट्रंकमध्ये सिगारेटच्या पेट्यांचा दावादौसा1 तासापूर्वीलिंक कॉपी कराराजस्थानमधील दौसा जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा बस-ट्रेलरची...

1 जुलैचे राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना व्यवसायाच्या समस्येतून दिलासा मिळेल, नवीन सुरुवातीसाठी मकर राशीच्या लोकांना...

0
बुधवार, 1 जुलै रोजी मेष राशीच्या लोकांना अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांना हॉटेल आणि रेस्टॉरंटशी संबंधित व्यवसायात फायदा होऊ...
spot_img

ईशान किशन नंबर-1 टी-20 फलंदाज:अव्वल स्थानी पोहोचणारा चौथा भारतीय ठरला, अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर...

0
भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशन आयसीसीच्या ताज्या पुरुष टी-२० फलंदाजी क्रमवारीत जगातील नंबर-१ फलंदाज बनला आहे. त्याने सुमारे १२ महिन्यांपासून अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक...

कामाची बातमी- चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा ट्रेंड:त्वचारोगतज्ञांकडून जाणून घ्या याचे फायदे-तोटे, कसे लावावे, कोणी लावू...

0
प्रत्येकाला वाटते की त्याचा चेहरा मेकअपशिवायही फ्रेश आणि चमकदार दिसावा. आजकाल सोशल मीडियावर फेस आइसिंगचा ट्रेंड खूप व्हायरल आहे. यात सांगितले जात आहे...

सामंथा प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो:लिहिले- माय सिक्स पॅक; चित्रपट निर्माता राज निदिमोरू...

0
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांची पुष्टी करत, विनोदी शैलीत या फोटोसोबत...

व्हॉट्सॲप वापरकर्तानाव वैशिष्ट्य: सरकार चौकशी करेल

0
नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराकेंद्र सरकार व्हॉट्सॲपच्या नवीन युझरनेम फीचरची चौकशी करणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, या फीचरमुळे ओळख फसवणूक आणि सायबर फसवणुकीचा...
error: Content is protected !!