Homeमहाराष्ट्रSasoon Hospital Bomb Threat: Security Guard Arrested by Pune Police | ससून...

Sasoon Hospital Bomb Threat: Security Guard Arrested by Pune Police | ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी: रुग्णालयातील कर्मचारीच निघाला आरोपी, खबऱ्याच्या माहितीवरून पोलिसांनी केली अटक – Pune News

पुणे शहरातील ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा बनाव करून खळबळ उडवणाऱ्या व्यक्तीस अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ससूनमधील एका डॉक्टरच्या मोबाईलवर एका फोन नंबरवरून अज्ञात इसमाने ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब या आशयाचा मेसेज केला होता. यामुळे एकच खळबळ उडाली

?

अरविंद कृष्णा कोकणी (वय 29) असे आरोपीचे नाव आहे. अरविंद हा ससूनमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. त्याने 12 मे रोजी ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब असल्याचा मेसेज रुग्णालयातील एका डॉक्टरच्या मोबाईलवर केला होता. धमकीच्या मेसेचची माहिती पोलिसांना देण्यात आली. गेल्या काही दिवसांमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये तणाव होता, त्यामुळे या धमकीकडे जास्त गांभीर्याने घेण्यात आले. बंडगार्डन पोलिस, बीडीडीएस यांनी हॉस्पिटल पिंजून काढले. मात्र, काहीही आढळून आले नाही. त्यामुळे कुणीतरी खोडसाळपणा केला असावा, असा निष्कर्ष काढण्यात आला. पण या धमकीला गंभीरतेने घेत पोलिसांनी धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

तपासादरम्यान पोलिसांना खबऱ्यांच्या माध्यमातून रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या एका तरुणानेच ही धमकी दिल्याची महत्त्वाची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी आरोपी अरविंद कोकणी याला येरवडा परिसरातून अटक केली. आरोपी सुरुवातीला गुन्ह्याची कबुली देत नव्हता. पण पोलिसांनी त्याला हिसका दाखवल्यानंतर त्याने सर्वकाही कबूल केले. तसेच त्याने कोणाच्या मोबाईलवरून मेसेज केला याबाबत माहिती दिली.

अरविंद कोकणी याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका महिला रुग्णाचा मोबाईल चोरला. त्याच मोबाईलवरून त्याने एका डॉक्टरला ससूनमध्ये बॉम्ब असल्याचा मेसेज पाठवला. मेसेज पाठवल्यानंतर त्याने मोबाईल बंद केला. दुसऱ्या दिवशी परत मोबाईल पुन्हा सुरू करून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनाही तोच धमकीचा मेसेज पाठवण्यात आला. पुन्हा मोबाईल बंद केला. पोलिसांनी अत्यंत बारकाईने केलेल्या तपासानंतर, आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले. त्याने अशा प्रकारचा मेसेज का पाठवला? याची चौकशी आता बंडगार्डन पोलिस करत आहेत.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सामंथा प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो:लिहिले- माय सिक्स पॅक; चित्रपट निर्माता राज निदिमोरू...

0
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांची पुष्टी करत, विनोदी शैलीत या फोटोसोबत...

भारतीय खलाश राकेश चौहानचे अवयव बेपत्ता |

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराव्हेनेझुएलामध्ये कर्तव्यावर असताना जीव गमावलेल्या भारतीय खलाशी राकेश चौहान (३३) यांच्या शरीरातील सर्व प्रमुख अंतर्गत अवयव गायब असल्याचे आढळले...

व्हॉट्सॲप वापरकर्तानाव वैशिष्ट्य: सरकार चौकशी करेल

0
नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराकेंद्र सरकार व्हॉट्सॲपच्या नवीन युझरनेम फीचरची चौकशी करणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, या फीचरमुळे ओळख फसवणूक आणि सायबर फसवणुकीचा...

आजपासून वारकऱ्यांच्या ‘चरण सेवेला’ प्रारंभ:भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची; मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपक्रम

0
आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री...
spot_img

सामंथा प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो:लिहिले- माय सिक्स पॅक; चित्रपट निर्माता राज निदिमोरू...

0
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांची पुष्टी करत, विनोदी शैलीत या फोटोसोबत...

व्हॉट्सॲप वापरकर्तानाव वैशिष्ट्य: सरकार चौकशी करेल

0
नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराकेंद्र सरकार व्हॉट्सॲपच्या नवीन युझरनेम फीचरची चौकशी करणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, या फीचरमुळे ओळख फसवणूक आणि सायबर फसवणुकीचा...

इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्निया

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026: इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्नियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६ मध्ये इंग्लंड आणि...

‘नेट बॉलर’ पासून ‘मॅच विनर’ पर्यंत:भारतीय वंशाच्या जयने आयर्लंडसाठी 5 बळी घेतले; कधीकाळी टीम...

0
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील जय मुंदडाने रविवारी संपलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडकडून खेळताना भारताच्या विरोधात पाच बळी घेतले. तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या...
error: Content is protected !!