Homeमहाराष्ट्रFour child marriages prevented in Gawalewadi | गवळेवाडीत चार बालविवाह रोखले: जिल्हाधिकारी...

Four child marriages prevented in Gawalewadi | गवळेवाडीत चार बालविवाह रोखले: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या प्रयत्नाने हिंगोलीची बालविवाह मुक्तीकडे वाटचाल – Hingoli News

औंढा नागनात तालुक्यातील गवळेवाडी येथे शुक्रवारी ता. ९ प्रशासनाने सामुहिक विवाह सोहळ्यातील सहा पैकी चार बालविवाह रोखले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने जिल्ह्याची बालविवाह मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे.

?

हिंगोली जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक असल्याचे युनीसेफच्या पाहणीमध्ये आढळून आले आहे. यामध्ये प्रामुख्याने अशिक्षीतपणा, आई, वडिल कामांसाठी बाहेरगावी जाणे, आर्थिक परिस्थिती या प्रमुख कारणांचा समावेस आहे. त्यातही जिल्हा प्रशासनाने बालविवाह होणारी पंन्नास गावे हॉटस्पॉट म्हणून निवडण्यात आली आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काही दिवसांपुर्वीच यंत्रणांची बैठक घेऊन गावात बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच सामुहिक विवाह सोहळ्यावर लक्ष ठेऊन त्या ठिकाणी मुलींच्या वयाची तपासणी करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. तर मंगल कार्यालयांनीही बालविवाह मुक्त अभियानाला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार गाव पातळीवर विवाह सोहळ्यांवर विशेष लक्ष दिले जात आहे.

दरम्यान, आज औंढा नागनाथ तालुक्यातील गवळेवाडी या गावात सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या ठिकाणी सहा जोडप्यांचा विवाह सकाळी आकरा वाजून ३५ मिनीटांनी आयोजित केला होता. मात्र या सहा पैकी चार वधु अल्पवयीन असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती.

त्यावरून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली औंढा नागनाथचे नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे, जमादार बी. जी. घुगे, बालविकास प्रकल्प कार्यालयाचे राजरत्न गायकवाड, समन्वक अंकुश पाटोडे, तलाठी ज्योती स्वामी यांनी तातडीने गावात जाऊन पाहणी केली. वधुवरांच्या डोक्यावर अक्षता पडण्यापुर्वीच या पथकाने विवाह सोहळ्याच्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली. यामध्ये त्यांनी सहा वधुंच्या वयाचे पुरावे मागितले. त्यामध्ये चार वधुंचे वय १८ वर्षापेक्षा कमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांचा विवाह थांबविण्यात आला तर इतर दोन जोडप्यांचा विवाह पार पडला.

दरम्यान, पथकाने अल्पवयीन मुलींच्या विवाहाच्या दुष्परिणामांची जाणीव करुन दिल्यानंतर त्यांनी योग्य वय झाल्याशिवाय विवाह करणार नाही, अशी लेखी कबुली दिली आहे. एकाच दिवशी चार बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

लग्नानंतर नोकरी सोडली:आता फक्त एक पत्नी अन् आई म्हणून जगतेय, सगळ्यांना आनंदी करण्याच्या प्रयत्नात...

0
प्रश्न– मी 34 वर्षांची महिला आहे. लग्नानंतर मी माझी नोकरी सोडली होती, कारण कुटुंबाची जबाबदारी वाढली होती. गेल्या काही वर्षांपासून माझी ओळख फक्त...

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन:विधानसभेत 18 विधेयके पारित, 101 तास 10 मिनिटे चालले कामकाज, सभापतींची माहिती

0
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. या अधिवेशनात विधानसभेत १८ विधेयके पारित झाली, १०१ तास १० मिनिटे कामकाज चालले. सभापतींनी सत्र कालावधीतील कामकाजाची...

फाटलेल्या बुटांच्या व्हायरल व्हिडिओवर सनी देओलची फिरकी:कार्यक्रमात म्हणाले- कोणीही बुटाचा फोटो घेऊ नये, धर्मेंद्र...

0
बॉलिवूड अभिनेता सनी देओल गुरुवारी आपल्या 'इक्का' चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या कार्यक्रमात पोहोचले. यावेळी त्यांनी त्यांच्या अलीकडील 'बुटाच्या वादा' वर विनोदी शैलीत प्रतिक्रिया दिली. खरं...

बीएसएनएल सॅटेलाइट फोन भारतात लाँच

0
नवी दिल्ली9 तासांपूर्वीलिंक कॉपी करासरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने भारतात नवीन सॅटेलाइट फोन लॉन्च केला आहे. याची किंमत करांसहित 1,34,166 रुपये ठेवण्यात आली...
spot_img

लग्नानंतर नोकरी सोडली:आता फक्त एक पत्नी अन् आई म्हणून जगतेय, सगळ्यांना आनंदी करण्याच्या प्रयत्नात...

0
प्रश्न– मी 34 वर्षांची महिला आहे. लग्नानंतर मी माझी नोकरी सोडली होती, कारण कुटुंबाची जबाबदारी वाढली होती. गेल्या काही वर्षांपासून माझी ओळख फक्त...

फाटलेल्या बुटांच्या व्हायरल व्हिडिओवर सनी देओलची फिरकी:कार्यक्रमात म्हणाले- कोणीही बुटाचा फोटो घेऊ नये, धर्मेंद्र...

0
बॉलिवूड अभिनेता सनी देओल गुरुवारी आपल्या 'इक्का' चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या कार्यक्रमात पोहोचले. यावेळी त्यांनी त्यांच्या अलीकडील 'बुटाच्या वादा' वर विनोदी शैलीत प्रतिक्रिया दिली. खरं...

बीएसएनएल सॅटेलाइट फोन भारतात लाँच

0
नवी दिल्ली9 तासांपूर्वीलिंक कॉपी करासरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने भारतात नवीन सॅटेलाइट फोन लॉन्च केला आहे. याची किंमत करांसहित 1,34,166 रुपये ठेवण्यात आली...

चांदी आज ₹1,780 ने स्वस्त, या महिन्यात ₹3,416 ने घसरण:सोने फक्त ₹159 ने वाढले,...

0
आज 10 जुलै रोजी चांदीच्या दरात किरकोळ घट झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 1,780 रुपयांनी घसरून...
error: Content is protected !!