Homeमहाराष्ट्रBody thrown into Varandha Ghat, two accused arrested by Pune Rural Police...

Body thrown into Varandha Ghat, two accused arrested by Pune Rural Police | कौटुंबिक वादातून साडूचा खून: मृतदेह वरंधा घाटात फेकला, पुणे ग्रामीण पोलिसांकडून दोन आरोपींना अटक – Pune News

पुणे ग्रामीण पोलिसांनी कौटुंबिक वादातून झालेल्या खुनाचा तपास यशस्वीपणे पूर्ण केला आहे. वडगाव बुद्रुक येथील संतोष उर्फ प्रमोद रघुनाथ पासलकर (४०) यांच्या खुनाप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

?

संतोष भिकू पिसाळ (४३) आणि अनिकेत चंद्रकांत पिसाळ (२९) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत पासलकर आणि आरोपी संतोष पिसाळ हे साडू होते. पासलकर दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करत असे. पिसाळ नेहमी त्यांच्या भांडणात मध्यस्थी करायचा.

२३ एप्रिल रोजी पासलकरने पत्नीला मारहाण केल्यानंतर पिसाळ भांडण सोडवण्यासाठी आला. रात्री सोसायटीच्या पार्किंगमध्ये दोघांमध्ये वाद झाला. पिसाळ आणि त्याचा नातेवाईक अनिकेत यांनी पासलकरच्या डोक्यात गज मारून त्याचा खून केला.

आरोपींनी मृतदेह मोटारीतून भोर परिसरातील वरंधा घाटात नेऊन फेकला. स्थानिक गुन्हे शाखेने शिर-विरहित मृतदेह पाहिला आणि पोलिसांना कळवले. गुन्हे शाखेच्या खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी पिसाळला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा समांतर तपास करण्यात येत होता. कौटुंबिक वादातून पिसाळने साडू पासलकर याचा खून केल्याची माहिती खबऱ्याने गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी अमोल शेडगे यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी पिसाळला संशयावरुन चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत पिसाळने पासलकरचा कौटुंबिक वादातून खून केल्याची कबुली दिली.

पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलिस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, सहायक फौजदार हनुमंत पासलकर, हवालदार अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, मंगेश भगत, धीरज जाधव, धर्मवीर खांडे यांनी ही कामगिरी केली.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये पाकिस्तानी नागरिकाला अटक:LoC मधून घुसखोरी करून आत आला होता, जूनमध्ये अशी तिसरी...

0
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LoC) भारतीय लष्कराने रविवारी पाकिस्तानच्या एका घुसखोराला अटक केली. अधिकाऱ्यांच्या मते, या महिन्यात जिल्ह्यात पकडला गेलेला हा तिसरा...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांची थांबलेली कामे सुरू होतील, धनु राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून...

0
रविवार, २८ जून रोजी वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास मजबूत राहील आणि ऑफिसमध्ये त्यांच्या नेतृत्वाची क्षमता चर्चेत राहील. मकर राशीच्या लोकांचा अडकलेला प्रकल्प अचानक...

भारताची पाचवी विकेट पडली, स्कोअर 85/5:जय मुंद्राने तीन बळी घेतले; आयर्लंडने दिले 155 धावांचे...

0
दुसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या (५३) जोरावर संघाने २० षटकांत १५४ धावा केल्या. सामन्याचे स्कोअरकार्ड… प्लेइंग-११...

मुलाला कोचिंगमध्ये प्रवेश द्यायचा आहे:कोचिंग सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचारा, प्रत्येक पालकांसाठी...

0
सर्व पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाव्यात. चांगले कोचिंग मिळावे, जेणेकरून ते उत्तम करिअर घडवू शकतील. त्यामुळे चांगले कोचिंग...
spot_img

भारताची पाचवी विकेट पडली, स्कोअर 85/5:जय मुंद्राने तीन बळी घेतले; आयर्लंडने दिले 155 धावांचे...

0
दुसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या (५३) जोरावर संघाने २० षटकांत १५४ धावा केल्या. सामन्याचे स्कोअरकार्ड… प्लेइंग-११...

मुलाला कोचिंगमध्ये प्रवेश द्यायचा आहे:कोचिंग सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचारा, प्रत्येक पालकांसाठी...

0
सर्व पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाव्यात. चांगले कोचिंग मिळावे, जेणेकरून ते उत्तम करिअर घडवू शकतील. त्यामुळे चांगले कोचिंग...

रावणाची लंका अन् अशोक वाटिका आता कशी दिसते?:अभिनेता प्रदीप काबरा यांनी श्रीलंकेतून शेअर केली...

0
अभिनेता प्रदीप काबरा नुकतेच श्रीलंका दौऱ्यावर गेले होते, जिथे त्यांनी 'रामायण'शी संबंधित मानल्या जाणाऱ्या स्थळांची झलक शेअर केली. त्यांनी रावणाची लंका, अशोक वाटिका,...

आयसीआयसीआय बँक टॉप गेनर; मार्केट कॅप ₹२९,५८८ कोटी वाढले

0
मुंबई2 तासांपूर्वीलिंक कॉपी करागेल्या व्यावसायिक आठवड्यात देशातील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे एकूण बाजार मूल्यांकन 88,678.1 कोटी रुपयांनी वाढले आहे. या वाढीमध्ये...
error: Content is protected !!