Homeमनोरंजनआयसीसीचा बांगलादेशला इशारा एकतर भारतात टी-२० विश्वचषक खेळा नाहीतर २१ जानेवारीला बदला

आयसीसीचा बांगलादेशला इशारा एकतर भारतात टी-२० विश्वचषक खेळा नाहीतर २१ जानेवारीला बदला


T20 विश्वचषक 2026 : टी20 वर्ल्ड कप 2026 ला (T20 World Cup 2026) आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत. 7 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये यंदाचा वर्ल्ड कप खेळवला जाणार असून तब्बल 20 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतलाय. मात्र वर्ल्ड कपच्या तोंडावर भारताशी सुरु असलेल्या वादामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (Bangladesh Cricket Board) सुरक्षेचं कारण देऊन त्यांच्या संघाला भारतात वर्ल्ड कपचे सामने खेळण्यासाठी पाठवण्यास नकार दिलाय. त्यांनी या संदर्भात आयसीसीशी पत्रव्यवहार सुद्धा केलेत. मात्र आता मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत असलेल्या माहितीनुसार आयसीसीने बांगलादेश क्रिकेटला वॉर्निंग दिलीये.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

बांगलादेश ऐवजी कोणाला देणार संधी?

ESPNcricinfo च्या सांगण्यानुसार आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला 21 जानेवारीपर्यंतच अल्टिमेटम दिलंय. आयसीसीने बीसीबीला सांगितलं की त्यांनी आगामे टी 20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येण्याकरता तयार व्हावं अन्यथा त्यांच्या ऐवजी यूरोपातील स्कॉटलॅंड संघाला बांगलादेश ऐवजी वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी दिली जाईल. 21 जानेवारीपर्यंत बांगलादेशने या संदर्भात निर्णय दिला नाही तर टी20 वर्ल्ड कप 2026 साठी स्कॉटलॅंडला संधी देण्यात येईल. कारण स्कॉटलॅंडची सध्याची टी20 रँकिंग सुद्धा उत्तम आहे.

बांगलादेश हट्टावर पेटलंय :

बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या वाढत्या अत्याचारांमुळे आयपीएल 2026 साठी केकेआरच्या संघात सामील असलेल्या बांगलादेशचा खेळाडू मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून बाहेर करावे अशी मागणी केलं जात होती. त्यानंतर केकेआरने बांगलादेशचा खेळाडू मुस्तफिजूर रहमानला रिलीज केलं. मात्र त्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा जळफळाट झाला आणि त्यांनी बांगलादेशात आयपीएलच्या प्रक्षेपणावर अनिश्चित काळासाठी बंदी घातली. तसेच ७ फेब्रुवारीपासून खेळल्या जाणाऱ्या टी २० वर्ल्ड कपसाठी संघाला भारतात पाठवण्यास सुद्धा नकार दिला. पाकिस्तान प्रमाणे आमचे सुद्धा सामने हे श्रीलंकेत खेळवले जावे अशी मागणी बांगलादेशने आयसीसीला पत्र लिहून केली. मात्र श्रीलंकेत या सामन्यांचे आयोजन करणे शक्य नसल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे. तसेच बांगलादेशच्या संघासाठी भारत दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली जाईल असे देखील आयसीसीने सांगितले, पण बांगलादेश भारत दौऱ्या करणार नाही यासाठी हट्टावर पेटलं असलं तरी आता त्याने 21 जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावा लागणार आहे.

हेही वाचा : न्यूझीलंड सीरिज संपल्यावर आता विराट आणि रोहित पुन्हा कधी मैदानात दिसणार? पाहा शेड्युल

बांगलादेश क्रिकेट असोसिएशन:

लिटन दास (कर्नाधर), तन्झीद हसन, परवेझ हुसेन इमॉन, सैफ हसन, तौहीद हरदोय, शमीम हुसेन, काझी नुरुल हसन सोहन, शाक महेदी हसन, रिशाद हुसैन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तन्झीम हसन साकीब, तस्किन इस्लाम, शैफ उद्दीन, शोरी इस्लाम.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

15 जुलैचे राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांना मुलाखतीत यश मिळेल, मकर राशीच्या लोकांना थांबलेले पैसे मिळण्याची...

0
बुधवार, 15 जुलै रोजी कर्क राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या लोकांना थांबलेले पेमेंट मिळू शकते. मिथुन राशीच्या...

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

इगतपुरीतील पर्यटक मारहाण प्रकरण:9 आरोपींची पोलिसांनी काढली धिंड; 18 तारखेपर्यंत कोठडी

0
इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत अटक करण्यात आलेल्या नऊ आरोपींची धिंड काढली. न्यायालयाने सर्व आरोपींना 18...
spot_img

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...

0
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...
error: Content is protected !!