Homeमनोरंजनauto news FY2026 नवीनतम अपडेटमध्ये मेड इन इंडिया कारच्या उच्च मागणीमुळे कार...

auto news FY2026 नवीनतम अपडेटमध्ये मेड इन इंडिया कारच्या उच्च मागणीमुळे कार निर्यात वाढते


भारतातील वाहन क्षेत्र: कार, दुचाकी वाहनं किंवा एकंदरच ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये भारतानं मागील दशकभराच्या काळात अतिशय झपाट्यानं प्रगती केली आहे. संपूर्ण जगात भारताच्या या क्षेत्रातील उंचावणाऱ्या आलेखाचीच चर्चा होत असताना आता देश आणखी एका विक्रमाला गवसणी घालण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं जात आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

भारतात तयार होणाऱ्या कारना आता फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण जगात मोठी मागणी असून, त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. Made In India अर्थात भारतात तयार होणाऱ्या कारची जगभरातून मागणी सातत्यानं वाढत असल्या कारणानं त्याचा थेट परिणाम निर्यातीवर पाहायला मिळत आहे. ज्यामुळं 2025-26 या चालू आर्थिक वर्षात आधीच भारतानं आठ महिन्यांत कार निर्यातीत विक्रम रचला असून आणखी एका नव्या विक्रमाच्या दिशेनं देशाची वाटचाल सुरू झाली आहे. दरम्यान मागील आठ महिन्यांच्या काळात भारतातून तुलनेनं परदेशात अधिक कारची निर्यात झाली, ज्यामुळं ऑटो क्षेत्रात सध्या देशाचं कौतुक होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

कोणी सादर केली ही लक्षवेधी आकडेवारी?

SIAM च्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या 8 महिन्यांपूर्वी भारतातून जवळपास 5,99,276 पॅसेंजल वेहिकल परदेशात पाठवण्यात आले होते. मागील वर्षीच्या आकडेवारीच्या तुलनेक ही संख्या 20 टक्क्यांनी जास्त आहे. FY24-2025 मध्ये एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान भारतातून 4,98,763 वाहनांची निर्यात करण्यात आली होती. म्हणजेच यंदाच्या वर्षी थेट 1 लाख युनिटनं यामध्ये वाढ झाल्यानं भारतीय निर्मितीच्या वाहनांना जगभरातून पसंती मिळत असल्याची अतिशय सकारात्मक बाब समोर येत आहे.

FY2026 पूर्ण होण्यासाठी आता चार महिन्यांचा कालावधी असतानाच तिथं कार निर्यातीत मात्र झपाट्यानं वाढ झाली आहे. त्यामुळं देश आणखी एका विक्रमाच्या वाटेवर असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. या संपूर्ण आर्थिक आणि प्रगतीशील घडामोडींमध्ये भारताच्या वाटेत काही अडथळेसुद्धा आले.

दरम्यानच्या काळात मेक्सिकोनं भारतीय बनावटीच्या कारवर 1 जानेवारी 2026 पासून Import duties अर्थात आयात शुल्कामध्ये 20 टक्क्यांनी वाढ करत ही रक्कम 50 टक्क्यांवर नेली. प्रत्यक्षातम मेक्सिको भारतासाठी एक मोठं निर्यात क्षेत्र असल्यामुळं याचा देशाला फटका बसताना दिसत आहे. मेक्सिकोमध्ये दरवर्षी भारतातून बलेनो, स्विफ्ट, डिझायल, ब्रेझा, ह्युंडई ग्रँड आय10, ऑरा, वेन्यू, क्रेटा अशा कार पाठवण्यात येतात. याशिवाय फोक्सवॅगन आणि निसानच्या कारनाही मेक्सिकोतून मागणी असते.

भारताची ऑटो क्षेत्रावर भक्कम पकड…
भारतीय वाहनांना जगभरातून असणाऱ्या मागणीमुळं देशाच्या आर्थिक विकासाला हातभारच लागला नसून त्यामुळं या क्षेत्रात निर्मितीच्या बाबतीतही भारताकडे आता एक मुख्य केंद्र म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळं आता येत्या काळात देश या संधीचं सोनं नेमकं कसं करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राहुल गांधींची डेहराडूनमध्ये 8 हजार विद्यार्थ्यांशी चर्चा:म्हणाले- 1% लोक पेपरफुटीच्या मार्गावर चालतात, यामुळे 99%...

0
डेहराडूनमधील बन्नू स्कूल ग्राउंडवर आयोजित काँग्रेसच्या 'विद्यार्थ्यांची गर्जना' कार्यक्रमात, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पेपरफुटी, भरती व्यवस्था आणि तरुणांचे भविष्य हे सर्वात...

17 जुलैचे राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न सुरू होऊ शकते, कुंभ राशीच्या लोकांना नोकरीत...

0
शुक्रवार, 17 जुलै रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न पुन्हा सुरू होऊ शकते आणि व्यवसायात महत्त्वाचे ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या नोकरदार...

सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन:वेस्ट इंडिजसाठी 93 कसोटी सामने खेळले, प्रथम...

0
वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन झाले आहे. एका षटकातील सर्व 6 चेंडूंवर 6 षटकार मारण्याचा पहिला...

मेंटल हेल्थ- पती खूप पझेसिव्ह:प्रत्येक सेकंदाला विचारतो– ‘कुठे आहेस’; खूप श्वास गुदमरतो, वाटते हे...

0
प्रश्न– माझा पार्टनर (पती) माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो खूप पझेसिव्ह (अधिकार गाजवणारा) देखील आहे. प्रत्येक वेळी त्याला हे जाणून घ्यायचे असते...
spot_img

सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन:वेस्ट इंडिजसाठी 93 कसोटी सामने खेळले, प्रथम...

0
वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन झाले आहे. एका षटकातील सर्व 6 चेंडूंवर 6 षटकार मारण्याचा पहिला...

मेंटल हेल्थ- पती खूप पझेसिव्ह:प्रत्येक सेकंदाला विचारतो– ‘कुठे आहेस’; खूप श्वास गुदमरतो, वाटते हे...

0
प्रश्न– माझा पार्टनर (पती) माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो खूप पझेसिव्ह (अधिकार गाजवणारा) देखील आहे. प्रत्येक वेळी त्याला हे जाणून घ्यायचे असते...

विकी कौशलने कतरिना कैफसोबतचा वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअभिनेत्री कतरिना कैफने गुरुवारी आई झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचे पती आणि अभिनेता विकी कौशलने सोशल...

चायना मूनशॉट AI किमी K3 लाँच

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराचीनी कंपनी मूनशॉट एआयने (AI ने) आपले नवीन एआय मॉडेल किमी K3 सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे...
error: Content is protected !!