Homeदेश-विदेशपॅटागोनियामध्ये सापडलेल्या 70 दशलक्ष वर्ष जुन्या डायनासोरच्या अंडीचा शोध, प्राचीन प्रजनन भूमीचे...

पॅटागोनियामध्ये सापडलेल्या 70 दशलक्ष वर्ष जुन्या डायनासोरच्या अंडीचा शोध, प्राचीन प्रजनन भूमीचे तपशील जाणून घ्या


डायनासोरचा शोध: आजवर जगभरात विविध क्षेत्रांमध्ये विविध संशोधनं दर दिवशी सुरू असून असंच एक मोठं संशोधन अर्जेंटिनातील ‘नॅशनल काऊंसिल फॉर साईंटिफिक अँड टेक्निकल रिसर्च’ अर्थात CONICET नं केलं. ज्याच्या माध्यमातून कैक संशोधनांना नवी कलाटणी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही महिन्यांपूर्वी याच संस्थेकडून एक महत्त्वपूर्ण मोहिम राबवण्यात आली होती, जी प्रचंड प्रमाणात यशस्वी ठरली असून, पाणबुडीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या मोहिमेमुळं समुद्राच्या तळाशी असणाऱ्या विश्वाचा नव्यानं उलगडा होणार आहे. इतकंच नव्हे तर असंख्य संशोधकांसाठी कुतूहलाचा विषय ठरणाऱ्या डायनासोरसंदर्भातील बहुविध पैलूंची माहिती या संशोधनातून मिळणार आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

CONICET च्या जीवाश्मशास्त्रज्ञांना संशोधनादरम्यान डायनासोरचं अंडं सापडलं असून हे अंडं साधारण 70,000,000 (7 कोटी) वर्षांपूर्वीचं असून अद्यापही ते मूळ स्वरुपात असल्याचं म्हटलं जात आहे. CONICET चे प्रमुख डॉ. फेडेरिको अॅग्नोलिन यांच्या नेतृत्त्वात हे संशोधन झालं असून, पॅटागोनियाच्या दक्षिणेकडील भागामध्ये  ही महत्त्वपूर्ण बाब आढळली. यापूर्वीही अर्जेंटीनामध्ये डायनासोरची अंडी सापडली, पण मूळ स्वरुपात सापडलेलं हे पहिलंच अंडं ठरत आहे जे सध्या जीवाश्माच्या रुपात दिसत आहे.

सदर संशोधनातून अभ्यासकांना डायनासोरच्या प्रजातीचा नेमका विकास कसा झाला आणि पुढे त्यांच्यातील बदलांमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी लक्ष वेधून गेल्या याचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. किंबहुना डायनासोरचं मुळ लक्षात घेण्यासही यातून मदत मिळेल. सखोल निरीक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार हे अंडं Bonapartenykus प्रजातीच्या डायनासोरचं आहे. मांसाहरी श्रेणीतील हे लहान डायनासोर असून, त्यांचा वावर कोट्यवधी वर्षांपूर्वी अर्जेंटिनाच्या दाक्षिणात्य भागांमध्ये होता.

दरम्यान हे अंडं ज्या स्थितीत सापडलं तेव्हा त्यावर इतर जीवाश्मांचा घेराव होता. ज्यामुळं डायनासोर नेमके कसे वाढले, त्यांच्या शरीरात नेमके कसे आणि किती बदल झाले याचीसुद्धा माहिती या अंड्याच्या जीवाश्मातून मिळणार आहे. उपलब्ध माहितीनुसार हे अंडं Patagoniaच्या संग्रहालयात पाठवण्यात येणार असून, स्थानिकांना हे जीवाश्म जवळून पाहता येणार आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

CONICET ही संस्था काय आहे आणि त्यांनी काय शोध लावला?
CONICET ही अर्जेंटिनातील ‘नॅशनल काऊंसिल फॉर साईंटिफिक अँड टेक्निकल रिसर्च’ नावाची संस्था आहे. त्यांनी अलीकडेच एका संशोधनादरम्यान डायनासोरचे अंडे शोधले आहे, जे सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वीचे आहे आणि ते मूळ स्वरूपात जीवाश्माच्या रूपात सापडले आहे.

हे डायनासोरचे अंडे कुठे आणि कसे सापडले?
हे अंडे अर्जेंटिनाच्या पॅटागोनियाच्या दक्षिणेकडील भागात सापडले. CONICET चे प्रमुख डॉ. फेडेरिको अॅग्नोलिन यांच्या नेतृत्वात चाललेल्या संशोधन मोहिमेदरम्यान ते आढळले. सापडलेल्या ठिकाणी इतर जीवाश्मांचा घेराव असल्याने ते चांगले संरक्षित राहिले आहे.

हे अंडे कोणत्या डायनासोरच्या प्रजातीचे आहे?
हे अंडे Bonapartenykus प्रजातीच्या डायनासोरचे आहे. ही प्रजाती मांसाहारी आणि लहान आकाराची होती, जी कोट्यवधी वर्षांपूर्वी अर्जेंटिनाच्या दक्षिणेकडील भागात वावरत असे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!