Homeदेश-विदेशकसा नियतीचा खेळ...! ट्रकच्या धडकेत मोठा भावाचा मृत्यू, बातमी ऐकून लहान भाऊ...

कसा नियतीचा खेळ…! ट्रकच्या धडकेत मोठा भावाचा मृत्यू, बातमी ऐकून लहान भाऊ निघाला अन्…; कुटुंबासह गावावर शोककळा


देशभरात दररोज अनेक रस्ते अपघातात होत असतात. या रस्ते अपघातात कोणाचा मृत्यूदेखील होतो. रस्ते अपघातातील एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. दोन सख्या भावांचा काही तासांच्या अंतराने रस्ते अपघातात जीव गेला आहे. या घटनेनंतर कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळलं असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

नेमकं काय घडलं?

नियतीचा मनात काय असतं हे कोणी सांगू शकतं नाही, पण नियतीचा खेळ किती क्रूर असू शकतो याचा धक्कादायक अनुभव सरगुजा जिल्ह्यातील एका कुटुंबाला आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार केवरी गावातील योगेंद्र पैकरा हा 33 वर्षीय तरुण हा सूरजपूर जिल्ह्यातील लटोरी गावात किराणाचं दुकान चालवतो. सोमवारी रात्री उशिरा दुकान बंद करुन तो घराकडे निघाला होता. पण अंबिकापूर-वाराणसी स्टेट हायवेवरील चठिरमाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला त्याची भरधाव दुचाकी जोरदार धडकली. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

बातमी ऐकून निघाला अन्…

त्यानंतर या घटनेची माहिती कुटुंबाला देण्यात आली आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पोलिसांनी पाठवला. भावाचा मृत्यूची बातमी लहान भावाला मोबाईलवर कळली आणि तो तातडीने घरातून निघाला. योगेंद्रचा धाकटा भाऊ कुशन सिंह पैकरा 29 वर्षीय तरुणासोबत नियतीने आपला खेळ दाखवला. लखनपूरहून अंबिकापूरकडे जाताना नॅशनल हायवे- 130 वर एका अज्ञात कारने त्याचा दुकाचीला प्रचंड वेगाने धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला.  त्याला स्थानिकांनी लखनपूरमधील रुग्णालयात दाखल केलं. तिथल्या डॉक्टराने त्याला प्राथमिक उपचारानंतर बिलासपूरला मोठा रुग्णालयात नेण्यासाठी सांगितलं.

पण बिलासपूरला त्याला हलवण्यात आलं आणि उपचारही सुरु झाले. पण पण दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. काही तासांच्या अंतराने एकाच दिवशी कुटुंबातील दोन कर्तृत्ववान मुले गमावली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

धक्कादायक म्हणजे योगेंद्र आणि कुशन यांच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. आता त्यांच्या पश्चात त्यांची आई आणि अन्य कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन्ही मुलांचे मृतदेह एकाचवेळी गावात पोहोचताच संपूर्ण गावातील लोकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गेलेल्या प्रत्येकाचे मन हे दृश्य पाहून हेलावले.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न १: सरगुजा जिल्ह्यातील ही दुर्दैवी घटना नेमकी काय आहे?
उत्तर: सरगुजा जिल्ह्यातील केवरी गावातील दोन सख्ख्या भावांचा काही तासांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. मोठ्या भावाचा ट्रकला धडकून मृत्यू झाला, तर लहान भाऊ मृतदेह घेण्यासाठी निघाला असता रस्त्यात कार अपघातात जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू पावला. यामुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.

प्रश्न २: मोठा भाऊ योगेंद्र पैकरा यांचा अपघात कसा घडला?
उत्तर: योगेंद्र पैकरा (वय ३३) हे सूरजपूर जिल्ह्यातील लटोरी गावात किराणा दुकान चालवत होते. सोमवारी रात्री दुकान बंद करून गावाकडे परतताना अंबिकापूर-वाराणसी स्टेट हायवेवरील चठिरमाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला त्यांची भरधाव दुचाकी धडकली. धडका इतकी भीषण होती की, योगेंद्र जागीच मृत्यू पावले. गांधीनगर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

प्रश्न ३: लहान भाऊ कुशन सिंह पैकरा यांच्याशी काय घडले?
उत्तर: योगेंद्रच्या अपघाताची बातमी ऐकताच धाकटा भाऊ कुशन सिंह पैकरा (वय २९) लखनपूरहून अंबिकापूरकडे मृतदेह घेण्यासाठी निघाला. वाटेत नॅशनल हायवे-१३० वर एका अज्ञात कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. कुशन गंभीर जखमी झाला आणि लखनपूर रुग्णालयात दाखल केल्यानंतर अपोलो हॉस्पिटल, बिलासपूर येथे हलवले गेले. तेथे उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देणगी चोरीची FIR करणारे कृष्ण मोहन नवे महासचिव:IFS मधून निवृत्त झाल्यानंतर RSS मध्ये आले,...

0
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांच्या निधनानंतर सप्टेंबर 2025 मध्ये त्यांच्या जागी निवृत्त IFS कृष्ण मोहन यांना विश्वस्त बनवण्यात आले....

मुंबई राजभवन SRPF जवानाची ड्युटीवर आत्महत्या; पोलीस तपास

0
मलबार हिल येथील अत्यंत सुरक्षित आणि 'व्हीआयपी' समजल्या जाणाऱ्या राजभवन परिसरात एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. राजभवनाच्या सुरक्षेसाठी तैनात...

TMC ने EC ला 2027 पर्यंत समित्या वैध घोषित केल्या

0
नवी दिल्ली1 तासापूर्वीलिंक कॉपी कराममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) गटाने सोमवारी निवडणूक आयोगासमोर (EC) आपले सविस्तर उत्तर दाखल करत बंडखोर गटाचे...

7 जुलै रोजी वक्री बुध राशी बदलेल:5 ऑगस्टपर्यंत बुध मिथुन राशीत राहील, जाणून घ्या...

0
बुध सध्या वक्री आहे, म्हणजेच हा ग्रह मागे सरकत आहे. 7 जुलै रोजी वक्री बुध कर्क राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. 24 जुलैपर्यंत...
spot_img

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...

फरार नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाऊ शकते:युरोपियन-कोर्टात शेवटचा खटलाही हरला; गेल्या 7 वर्षांपासून...

0
फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नीरव मोदी युरोपीय मानवाधिकार न्यायालयात आपली शेवटची केसही हरला आहे. त्यामुळे...
error: Content is protected !!