Homeदेश-विदेशपुष्कर प्राणी मेळा 2025 शोस्टॉपर्स रु. 15 कोटी घोडा ते रु. 23...

पुष्कर प्राणी मेळा 2025 शोस्टॉपर्स रु. 15 कोटी घोडा ते रु. 23 कोटी म्हशी


प्राणी मेळा २०२५: राजस्थानातील पुष्कर येथील प्राण्यांचा बाजार सध्या देशभरामध्ये चर्चेत आहे तो येथील दोन प्राण्यांमुळे! भारतभरात या कृषी मेळ्याची चर्चा होण्याचं कारण ठरत आहेत एक घोडा आणि एक म्हैस! एखाद्या बीएमडब्ल्यू, मर्सिडीज गाडीलाही लाजवेल इतकी या घोड्याची आणि म्हशीची किंमत आहे. 65 लाखांच्या टेस्लाचा विचार केला तर अशा 35 टेस्ला विकत घेता येतील एवढी महाग ही म्हैस असून घोड्याची किंमत इतकी आहे की त्यामध्ये 23 टेस्ला विकत घेता येतील.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

हजारो जनावरांची नोंद

देशातील सर्वांत प्रसिद्ध पशुधन मेळाव्यांपैकी एक अशी ओळख असलेल्या हा पशुमेळा ऑक्टोबरपासून नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. देशभरातील पशुपालक आणि पशुधनप्रेमी नागरिक पहिल्या दिवसापासून गर्दी करतात. मेळाव्यासाठी आतापर्यंत चार हजार 300 हून अधिक जनावरांची नोंदणी झाली असून, त्यात तीन हजार 28 घोडे आणि एक हजार 306 उंटांचा समावेश आहे. मात्र, सर्वांत जास्त लक्ष वेधून घेतो आहे दोन वर्षे सहा महिन्यांचा शाहबाज नावाचा घोडा. तो चंडीगड येथील गॅरी गिल यांच्या मालकीचा आहे. या घोड्याची किंमत थक्क करणारी आहे.

15 कोटींचा घोडा अन् 23 कोटींची म्हैस

हा घोडा तब्बल 15 कोटी रुपये किंमतीचा असून त्याहूनही महाग म्हणजेच 23 कोटी रुपयांची म्हैस आहे. शाहबाज घोड्याने अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत आणि तो प्रतिष्ठित वंशाचा आहे. त्याची विक्री किंमत 15 कोटी रुपये असल्याचे स्वत: गिल यांनी सांगितले. आजवर या मारवाडी जातीच्या या घोड्यासाठी त्यांना नऊ कोटी रुपयांचा प्रस्ताव आला आहे. या मेळाव्यातील दुसरे आकर्षण म्हणजे दीडशे किलो वजनाची ‘अनमोल’ नावाची म्हैस. हिची किंमत तब्बल 23 कोटी रुपये आहे. तिचे मालक पामिंद्र गिल यांनी सांगितले की, ‘या म्हशीला राजेशाही थाटात वाढवले आहे. तिला रोज दूध, देशी तूप आणि सुका मेवा दिला जातो.’

285 पिल्लांचा बाप असलेला घोडा अन् 600 किलोची म्हैस

उज्जैन येथील आणखी एक म्हैस ‘राणा’ हीसुद्धा विशेष चर्चेत आहे. तिचे वजन 600 किलो असून किंमत 25 लाख रुपये आहे. तिला रोज दीड हजार रुपयांचा खुराक दिला जातो. ज्यात बेसन, अंडी, तेल, दूध, तूप आणि लिव्हर टॉनिकचा समावेश आहे. मेळाव्यातील अजून एक आकर्षण म्हणजे ‘बादल’ नावाचा मारवाडी प्रजातीचा ज्येष्ठ घोडा. हा तब्बल 285 पिल्लांचा बाप आहे. त्याची किंमत 11 कोटी असल्याचे सांगण्यात आले. परंतु तो अद्याप विकला गेला नाही. केवळ 16 इंच उंचीची गाय ही येथील प्रमुख आकर्षण ठरत आहेत. दरम्यान, मेळाव्यात यावर्षी मागील वर्षांच्या तुलनेत अधिक पोलिस बंदोबस्त आहे.  हा मेळ्यात उत्कृष्ट वंशाच्या जनावरांचे प्रदर्शन आणि विक्री केली जाते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!