विमान बातम्या: भारतात किंबहुना संपूर्ण जगभरात विमानासंदर्भातील नियम अतिशय कठोर असून, अनेकदा काही सामानांवरही यामुळं निर्बंध लादण्यात येतात. ज्यामुळं अनेकदा आंतरराष्ट्रीय प्रवासाला निघालं असता या प्रवासादरम्यान अनेकदा सामानातील काही अशाच गोष्टींमुळ प्रवाशांना तपास यंत्रणांच्या कैक प्रश्नांचा सामना करावा लागतो. आता म्हणे अशीच एक महत्त्वाची वस्तू, विमानावर नेण्यास बंदी घातली जाऊ शकते.
आश्चर्य म्हणजे दर दुसऱ्या व्यक्तीच्या सामानात या वस्तूचा समावेश असून, आता त्यावरच बंदी आणल्यास प्रवाशांची नुसती पंचाईत होणार नाहीये, तर त्यांना यासाठी पर्यायी व्यवस्थासुद्धा शोधावी लागणार आहे. येत्या काळात ज्या वस्तूवर बंदी घातली जाऊ शकते ती वस्तू आहे, पॉवर बँक. जगभरातील विविध विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये लिथियम आणि
आयर्न बॅटीरा स्फोट होऊन अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या. त्यात नुकतंच दिल्ली विमानतळावर दिमापूरला जाणाऱ्या इंडिगो विमानात एका प्रवाशाच्या पॉवर बँकनं पेट घेतला.
एक घटना आणि यंत्रणा सतर्क…
प्राथमिक माहितीनुसार DGCA (Directorate General of Civil Aviation) कडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असून, काही तांत्रिक बाबीसुद्धा लक्षात घेतल्या जाऊ शकतात. परदेशी विमानसेवा पुरवणाऱ्या अनेक कंपन्यांनी पॉवर बँकसह तत्सम गोष्टींवर निर्बंध लागू केले आहेत. किंबहुना काही कंपन्यांकडून या पॉवर बँक विमानाच्या सीट कव्हरमध्ये किंवा समोरच्या सीटखाली ठेवा असं आवाहनही करण्यात येतं. पॉवरबँक ओवरहेट केबिन अर्थात डोक्यावर असणाऱ्या समान ठेवण्याच्या ठिकाणी न ठेवण्यास सांगितलं जातं. सीट कव्हरमध्ये ठेवल्यास पॉवर बँत तापून विमानातील क्रू कारवाई करू शकेल यासाठीच हे केलं जातं असं म्हणतात. थोडक्यात येत्या काळात भारतातही पॉवरबँक संबंधीचे नियम कठोर होऊ शकतात.
Emirates नं प्रवास करताय? हा नियम वाचाच…
दुबईची विश्वविख्यात विमानसेवा पुरवणारी कंपनी एमिरट्स एअरलाईन्सकडून 1 ऑक्टोबरपासून पॉवर बँकच्या वापरावर सक्तीची बंदी लागू करण्यात आली. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार प्रवासी फक्त 100 वॉट आवर (Wh) इतकी क्षमता असणारी एकट पॉवर बँक सोबत नेऊ शकतात. मात्र, विमानप्रवासादरम्यान त्यांना कोणतंही उपकरण किंवा मोबाईल चार्ज करता येणार नाही. या नव्या नियमानुसार पॉवर बँकवर त्याची बॅटरी क्षमता ठळक शब्दांत लिहिलेली असणं बंधनकारक आहे.
विविध एअरलाईन्समध्ये आतापर्यंत पॉवर बँकच्या झालेल्या अपघातांमुळं भारतातही DGCA कडून कठोर नियमावली जारी केली जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळं येत्या महिन्यांमध्ये विमान प्रवासादरम्यान फक्त सीट कव्हर आणि फुट स्पेसमध्येच पॉवर बँक ठेवण्याची परवानगी असेल आणि फ्लाईटदरम्यान चार्जिंग किंवा पॉवर बँकच्या वापरावरही नियम लागू होतील. शिवाय यंत्रणांकडून ठराविक कंपनी आणि क्षमतेच्याच पॉवर बँकला परवानगी दिली जाऊ शकते. त्यामुळं विमानानं प्रवास करणाऱ्यांपैकी असाल तर या नियमासंदर्भातील अपडेटवर लक्ष ठेवाच!
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
भारतात DGCA कडून नवीन नियम कधी येतील?
अद्याप अधिकृत घोषणा नाही, पण अपघातानंतर DGCA कडून कठोर नियमावली येण्याची शक्यता आहे. शक्य बदल: पॉवर बँक फक्त सीट कव्हर किंवा फुट स्पेसमध्ये ठेवावी, फ्लाइटदरम्यान चार्जिंग बंदी, आणि फक्त विशिष्ट क्षमतेच्या/कंपनीच्या पॉवर बँकला परवानगी.
इतर एअरलाइन्समध्ये (जसे इंडिगो, स्पाइसजेट) नियम काय?
बहुतांश भारतीय एअरलाइन्स DGCA नियमांचे पालन करतात: 100 Wh पर्यंत एकच पॉवर बँक, हँडबॅगमध्ये, आणि ओव्हरहेड कम्पार्टमेंटमध्ये न ठेवता सीटजवळ ठेवा. काहींनी (जसे एमिरेट्सप्रमाणे) वापरावर बंदी सुरू केली आहे.
पर्याय काय, जर बंदी आली तर?
विमानातील USB पोर्ट्स वापरा (काही फ्लाइट्समध्ये उपलब्ध). किंवा ट्रॅव्हल अॅडॅप्टर्स/चार्जर्स घ्या जे बॅटरीशिवाय असतील. लिथियम-फ्री पॉवर सोल्युशन्स (जसे सोलर चार्जर्स) तपासा, पण नियम तपासा.
































