Homeदेश-विदेशViral News Delivery Boy Saves Woman in China with Quick Thinking Emergency...

Viral News Delivery Boy Saves Woman in China with Quick Thinking Emergency Message 110 625 written on pillow Decoded | ‘110-625’… डिलिव्हरी बॉयला मिळाला रक्ताने उशीवर लिहलेला गुप्त संदेश,पोलिसांनी फ्लॅट घडताच आतमध्ये…


डिलिव्हरी कर्मचाऱ्याचा असामान्य शोध: चीनमध्ये 19 वर्षीय डिलिव्हरी बॉय झांग कुनने आपल्या हुशारीने 30 तासांपासून खोलीत अडकलेल्या एका महिलेला वाचवले. फुटपाथवर पडलेल्या तकियावर रक्ताने लिहिलेला गूढ संदेश पाहून त्याने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. झांग आणि पोलिसांनी तो संदेश डिकोड केल्यानंतर समजले की हा प्रकार जवळच्या इमारतीच्या 25व्या मजल्यावरील एका होमस्टेशी संबंधित आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

खोलीत अडकलेली महिला वाचवली

झांग कुन चीनमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो आणि त्याच वेळी विद्यार्थीही आहे. एका दिवशी डिलिव्हरी करत असताना त्याला रस्त्याच्या कडेला एक पांढरी उशी दिसली, ज्यावर रक्ताने “110” आणि “625” असे आकडे लिहिलेले होते. त्याने तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी तपास सुरू केला आणि लक्षात आले की हा तकिया जवळच्या इमारतीच्या 25व्या मजल्यावरून खाली पडलेला आहे.

हे ही वाचा: धक्कदायक! वडिलांनी 7 वर्षांच्या मुलाला दरीत…, आईनेच केला Video शूट; म्हणाला, “मी एक…”

पोलिसांना सुरुवातीला वाटले की कोणत्यातरी महिलेवर हल्ला झाला आहे, पण जेव्हा त्यांनी खोली उघडली तेव्हा लक्षात आले की ती महिला आत अडकली होती. दरवाज्याचे लॉक अचानक बिघडल्याने ती बाहेर पडू शकली नव्हती. तिच्याकडे मोबाईल फोनही नव्हता आणि ती 30 तासांपासून मदतीसाठी हाका मारत होती, पण कुणीही ऐकले नव्हते. शेवटी तिने बोटाला जखम करून रक्ताने तकियावर आपत्कालीन क्रमांक लिहिला आणि तो खिडकीतून खाली फेकला.

हे ही वाचा: महिलांनो! साडी नेसल्यावर मांड्या घासतात? ‘या’ टिप्स करतील मदत, जखमही होणार नाही

महिलेने व्यक्त केले आभार

महिलेची ओळख ‘झोउ’ या नावाने झाली आहे. तिने सांगितले की ती अनेक तासांपासून अडकलेली होती आणि तिला पाणी- अन्न काहीच मिळत नव्हते. शेवटी मदतीची आशा संपल्यावर तिने रक्ताने संदेश लिहिला. पोलिसांनी दरवाजा तोडून तिला वाचवले, तेव्हा ती इतकी आनंदी झाली की तिला स्वतःच्या कुटुंबाशी भेटल्यासारखे वाटले. झोउने झांगचे आभार मानले आणि त्याला पैसे देण्याचा प्रयत्न केला, पण झांगने नकार दिला. झांग म्हणाला, “हे काही मोठं काम नव्हतं, माझ्या जागी कोणीही असतं तरी तेच केलं असतं.”

हे ही वाचा: Indian Government Money: भारत सरकारच्या पैशांचा हिशोब कोण ठेवतं? जाणून घ्या

ही घटना 12 ऑगस्टची असल्याचे सांगितले जात आहे. बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर झांगच्या तत्परतेची सगळीकडे प्रशंसा झाली. झांग ज्या ‘मेइतुआन’ कंपनीसाठी काम करत होता, त्यांनी त्याला ‘पायनियर रायडर’ ही सन्मानाची पदवी आणि 2,000 युआनचे बक्षीस दिले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...
spot_img

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
error: Content is protected !!