Homeदेश-विदेशबिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली, कोण महाराष्ट्रातील आहे

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली, कोण महाराष्ट्रातील आहे


बिहार निवडणुकीसाठी भाजप स्टार प्रचारकांची यादी: बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं असून, आता सर्व पक्षांकडून तयारी सुरु झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती, जागा वाटप यांचीही चाचपणी सुरु झाली आहे. तसंच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यादरम्यान भाजपाने बिहार निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 40 नेत्यांचा यादीत समावेश करण्यात आला आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

बिहार निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे. पी. नड्डा, राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, धर्मेंद्र प्रधान, गिरीराज सिंह, योगी आदित्यनाथ, रेखा गुप्ता, मोहन यादव, हिमंत बिस्वा शर्मा, स्मृती इराणी, केशव प्रसाद मौर्य आणि सी. आर. पाटील यांना स्टार प्रचारक करण्यात आलं आहे.

तसंच सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा, रेणु देवी, नित्यानंद राय, मनोज तिवारी, रवी किशन, रवीशंकर प्रसाद आणि दिनेश लाल ‘निरहुआ’ यांनाही स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील तीन नेत्यांचा समावेश

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश करण्यात आला आहे. तसंच बिहार विधानसभा प्रभारी विनोद तावडे देखील स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील बिहारमध्ये प्रचार करणार आहेत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1)  बिहार विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक काय आहे?
बिहार विधानसभा निवडणुकीचे पहिले टप्प्यातील मतदान ६ नोव्हेंबर २०२५ रोजी (१२१ जागांसाठी) आणि दुसऱ्या टप्प्यातील ११ नोव्हेंबर २०२५ रोजी (१२२ जागांसाठी) होईल. मतमोजणी १४ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येईल. निवडणूक आयोगाने ६ ऑक्टोबर २०२५ रोजी हे वेळापत्रक जाहीर केले आहे. विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर २०२५ रोजी संपेल.

2) प्रमुख राजकीय आघाड्या कोणत्या आहेत आणि त्यांचे जागावाटप कसे आहे?
राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए): भाजप (१०१ जागा), जनता दल (युनायटेड) [जेडीयू] (१०१ जागा), लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) [एलजेएसपी(आरव्ही)] (२९ जागा), हिंदुस्थानी अवाम मोर्चा (६ जागा) आणि राष्ट्रीय लोक मोर्चा (६ जागा) यांचा समावेश. भाजपने तिसऱ्या यादीत १८ उमेदवार जाहीर करून एकूण १०१ उमेदवारांची यादी पूर्ण केली आहे. जेडीयूने दुसऱ्या यादीत ४४ उमेदवार जाहीर करून एकूण १०१ पूर्ण केले आहेत.
महाआघाडी (MGB): राष्ट्रीय जनता दल [आरजेडी] (४५ जागा), काँग्रेस (२२ जागा), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया [सीपीआय] (६ जागा) यांचा समावेश. मात्र, सीट वाटप अजून पूर्ण झालेले नाही; काँग्रेसने १० हून अधिक उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी अंतिम करार बाकी आहे. राहुल गांधी यांनी लालू प्रसाद यादव यांच्याशी बोलून सीट वाटपातील अडथळा सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.

3) इतर प्रमुख पक्ष आणि त्यांचे जागावाटप कसे आहे?
ग्रँड डेमोक्रेटिक अलायन्स (GDA): ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन [एआयएमआयएम] (३२ जागा), राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष [आरएलजेएसपी] आणि आजाद समाज पार्टी (२५ जागा) यांचा समावेश.
इतर पक्ष: जन सूरज पार्टी [जेएसपी] (२४३ जागांवर लढणार, ११६ जागांसाठी उमेदवार जाहीर), आम आदमी पार्टी [आप] (२४३ जागांवर, ५९ जागांसाठी जाहीर), बहुजन समाज पार्टी [बसपा] (८८ जागा) इत्यादी. प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाचे संस्थापक स्वतः उमेदवारी लढवणार नाहीत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे निधन

0
लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावरून ढकलून हत्या करण्यात आलेले प्रसिद्ध तरुण उद्योजक केतन अग्रवाल यांच्या कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला आहे. केतनचे आजोबा देवीचंद...

TMC पश्चिम बंगालच्या अध्यक्षा चंद्रिमा भट्टाचार्य यांचा राजीनामा; ममता बॅनर्जींचे विधान

0
मराठी बातम्याराष्ट्रीयTMC पश्चिम बंगालच्या अध्यक्षा चंद्रिमा भट्टाचार्य यांचा राजीनामा; ममता बॅनर्जींचे विधानकोलकाता21 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातृणमूल काँग्रेस (TMC) च्या ज्येष्ठ नेत्या चंद्रिमा भट्टाचार्य यांनी...

शुक्राचे राशी परिवर्तन आज:शुक्रासाठी शिवपूजा आणि दुधाचे दान करा, जाणून घ्या 1 ऑगस्टपर्यंतचा काळ...

0
आज (4 जुलै) दुपारी सुमारे 4 वाजता शुक्र राशी बदलून सिंह राशीत येईल. त्यानंतर हा ग्रह 1 ऑगस्टपर्यंत याच राशीत राहील. शुक्र वृषभ...

वैभव सूर्यवंशीने सचिन-शेफालीचा विक्रम मोडला:15 वर्षे, 99 दिवसांत भारतासाठी पदार्पण केले; सामन्यापूर्वी दिले होते...

0
वैभव सूर्यवंशी भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. तो १५ वर्षे ९९ दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत...
spot_img

वैभव सूर्यवंशीने सचिन-शेफालीचा विक्रम मोडला:15 वर्षे, 99 दिवसांत भारतासाठी पदार्पण केले; सामन्यापूर्वी दिले होते...

0
वैभव सूर्यवंशी भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. तो १५ वर्षे ९९ दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत...

हेवी वर्कआउट स्ट्रेस हार्मोन वाढवतो? याचे विज्ञान जाणून घ्या:मानसिक आरोग्य व्यायामादरम्यान कॉर्टिसोलची पातळी वाढणे...

0
अनेकदा असे म्हटले जाते की हेवी वर्कआउट किंवा लांबच्या व्यायामामुळे शरीरातील कॉर्टिसोल म्हणजेच स्ट्रेस हार्मोन धोकादायक पातळीपर्यंत वाढतो. याच कारणामुळे अनेक लोक याला...

इंद्रेश मलिक हीरामंडी स्टार; पिरॅमिड स्कीम घोटाळ्यातील बळीची कहाणी

0
36 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा‘हीरामंडी’ मधील उस्ताद जी आणि ‘द पिरामिड स्कीम’ मधील अभिनयामुळे चर्चेत आलेले इंद्रेश मलिक यांनी दिव्य मराठीशी बोलताना त्यांच्या करिअर,...

व्हॉट्सॲपच्या युझरनेम वैशिष्ट्यावर सरकारची बंदी:गोपनीयता वाढवणारे वैशिष्ट्य होते, चॅटिंग स्मार्ट झाली असती; थांबवण्याचे कारण...

0
व्हॉट्सॲप लवकरच इंस्टाग्राम आणि टेलिग्रामप्रमाणे युझरनेम फीचर आणणार होते. यामुळे लोक मोबाईल नंबर शेअर न करता एकमेकांना मेसेज करू शकतील. मात्र, सुरक्षेच्या चिंतेमुळे...
error: Content is protected !!