Homeदेश-विदेशइंदूरमध्ये बलात्काराच्या आरोपीच्या अटकेनंतर 24 ट्रान्सजेंडरने सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला

इंदूरमध्ये बलात्काराच्या आरोपीच्या अटकेनंतर 24 ट्रान्सजेंडरने सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला


इंदूर ट्रान्सजेंडर्स सामूहिक आत्महत्या: मध्य प्रदेशातील इंदूर येथे 24 तृतीयपंथीयांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पत्रकार असल्याचा बनाव करत दोन तृतीयपंथीयांवर बलात्कार करण्यात आल्याच्या निषेधार्थ त्यांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्या कऱण्याच्या हेतूने त्यांनी फिनाईल प्राशन केलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 24 तृतीयपंथीयांनी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले आणि फिनाइल प्यायलं. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलीस आणि वैद्यकीय पथकं घटनास्थळी दाखल झाली होती.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

सर्व 24 तृतीयपंथीयांना तात्काळ महाराज यशवंतराव रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. “तृतीयपंथी समुदायातील लोकांना आमच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांनी बुधवारी रात्री एकत्र फिनाईल घेतल्याचा दावा केला आहे. त्यापैकी कोणाचीही प्रकृती गंभीर नाही,” असं एमवाय हॉस्पिटलचे प्रभारी अधीक्षक डॉ बसंत कुमार निंगवाल यांनी सांगितलं.

पोलिसांनी सांगितलं की, पंकज आणि अक्षय या दोघांनी आपण पत्रकार असल्याचं भासवून एका तृतीयपंथी महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असून त्याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आलं. तक्रारीनुसार, आरोपीने पीडितेशी संपर्क साधला आणि तृतीयपंथी समाजातील वादाचे वार्तांकन करणारे पत्रकार असल्याचं सांगितलं. त्यांनी तिच्याकडून पैसे मागितले आणि माध्यमांमध्ये तिचं नाव बदनाम करण्याची धमकी दिली. तिने नकार दिल्यावर, त्यापैकी एकाने तिला जवळच्या इमारतीत ओढलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं की, “दोघांनीही पत्रकार म्हणून स्वत:ची ओळख करून दिली आणि पैसे मागितले. मी नकार दिल्यावर पंकज मला एका इमारतीत घेऊन गेला, मला धमकावलं आणि माझ्याशी गैरवर्तन केलं.” तिने पुढे म्हटले की, आरोपींनी घटनेची माहिती दिल्यास खोटा खटला दाखल करून तिला तुरुंगात टाकण्याची धमकीही दिली.

तिच्या तक्रारीनंतर पंढरीनाथ पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला. “आम्ही एफआयआर नोंदवला आहे आणि दोघांचा शोध सुरू केला आहे. त्यांना लवकरच अटक केली जाईल,” असं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1) इंदूर येथे काय घटना घडली?
मध्य प्रदेशातील इंदूर येथे सुमारे २४ तृतीयपंथीय व्यक्तींनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी फिनाइल प्राशन करून स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले होते. यामुळे परिसरात खळबळ उडाली आणि पोलीस व वैद्यकीय पथकं घटनास्थळी दाखल झाली.

2) हा प्रयत्न कशामुळे केला गेला?
दोन व्यक्तींनी पत्रकार असल्याचा बनावट करून एका तृतीयपंथी महिलेवर बलात्कार केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. आरोपींनी पीडित महिलेला धमकावून पैसे मागितले आणि नकार मिळाल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तृतीयपंथी समुदायाने याला विरोध दर्शवण्यासाठी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला.

3) पीडित तृतीयपंथी महिलेच्या तक्रारीची माहिती काय?
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी पंकज आणि अक्षय यांनी पत्रकार असल्याचे सांगून तिच्याशी संपर्क साधला. त्यांनी तृतीयपंथी समाजातील वादाचे वार्तांकन करत असल्याचे भासवले आणि पैसे मागितले. नकार मिळाल्यावर पंकजने तिला जवळच्या इमारतीत ओढले, धमकावले आणि बलात्कार केला. आरोपींनी घटनेची माहिती दिल्यास खोटा खटला दाखल करून तिला तुरुंगात टाकण्याची धमकीही दिली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...
spot_img

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
error: Content is protected !!